प्रा. रोहिणी आणि कॅप्टन नामदेव चव्हाण मिळवून चालवत आहेत ‘आधार व्यसनमुक्ती केंद्र’

ब्रँडचे नाव : आधार व्यसनमुक्ती केंद्र

व्यवसायाची स्थापना : २०२१

व्यसनमुक्त भारत अभियानाअंतर्गत ‘राष्ट्रीय व्यसनमुक्ती संस्थे’ने २०१७ मध्ये केलेल्या सर्वेमध्ये आपल्या देशातील ६७.७० टक्के लोक कोणत्या ना कोणत्या तरी व्यसनाने ग्रस्त आहेत. ही संख्या वाढत जाण्याची शक्यता आहे. हा धोका ओळखून शासनाने अनेक सेवाभावी संस्था, शासनाचे वेगवेगळे विभाग तसेच समाजसेवक यांच्यामार्फत व्यसनमुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले गेले.

यामध्ये प्रामुख्याने व्याख्याने व प्रबोधन केले जात होते, परंतु या माध्यमातून लोकांना व्यसनमुक्त करता येत नाही व होत नाही, कारण व्याखानाचा प्रभाव चार दिवस राहतो व नंतर ती व्यक्ती पुन्हा व्यसनाकडे वळते. अशा या सर्वांचा विचार करून ‘समर्थ बहुद्देशीय संस्थे’अंतर्गत ‘आधार व्यसनमुक्ती केंद्र’ आणि ‘न्युट्रीफील हेल्थ प्रोडक्ट प्रा. लि.’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्यसनंमुक्त भारत अभियान’ चालू केले.

यामध्ये व्यसनमुक्तीचा भारतातील सर्वोत्कृष्ठ पुरस्कार मिळालेला इलेक्ट्रो होमियोपॅथीमधील संशोधक डॉ. बी. एस. माने यांनी विकसित केलेला अल-निकोनील हा फोर्मुला वितरीत करण्याचे कार्य केले. यामुळे प्रबोधानाबरोबरच शस्त्राची (होमियोपथी फोर्मुला) जोड दिल्यामुळे व्यक्ती प्रत्यक्ष व्यसनमुक्त होण्यास मदत होते.

या प्रकारे संस्थेने ‘व्यसनमुक्त भारत’ हे अभियान राबवण्यास सुरुवात केली. केंद्र अंतर्गत व्यसनमुक्तीचा प्रसार, प्रचार करणे अशामुळे व्यसनी लोकांचे प्रमाण कमी होईल तसेच लाखो लोकांचे प्राण वाचतील उद्ध्वस्त होणारे संसार वाचतील तसेच वाईट मार्गाने जाणाऱ्या पैशाचा वापर चांगल्या कार्यासाठी होईल. देश प्रगती पथावर जाईल. या मुख्य उद्देशानेच हे केंद्र काम करीत आहे. तरी समाजातील लोकांचेसुद्धा या उपक्रमाला सहकार्य अपेक्षित आहे.

व्यवसायांतर्गत कोणत्या सेवा आहेत?

अ) व्यसनमुक्ती अभियान
ब) मधुमेहमुक्ती अभियान
क) वेदानामुक्ती अभियान
ड) रोगमुक्ती अभियान
इ) सशक्त नारी अभियान
ई) नेत्ररक्षा अभियान इ. सेवा व उपक्रम राबवून त्या संदर्भातील उत्पादने विक्री करतो.

कंपनीचे नाव : राही इंटरप्राईजेस

कंपनीचे मालक : प्रा. रोहिणी चव्हाण आणि कॅप्टन नामदेव चव्हाण

rohini chavanप्रा. रोहिणी चव्हाण या नामांकित कॉलेजमध्ये गेली आठ वर्षे एक प्राध्यापक म्हणून नोकरी करतात. तसेच त्या ऑनलाइन लाइव्ह साड्यांचा विक्रीचा व्यवसायसुद्धा करतात. त्या गेली चार वर्षे या ‘आधार व्यसनमुक्ती केंद्र’अंतर्गत समुपदेशन आणि व्यसनमुक्ती उत्पादनाची विक्री करतात.

त्या दर आठवड्याला एका गावात जावून तेथील महिलांचे मेळावे घेवून त्यांना एकत्र आणून त्यांच्यात याविषयी जाणीव जनजागृती करतात. तसेच व्यसनाधीन लोकांचे व्यसनाविषयी समुपदेशन केले जाते. त्यांनी आतापर्यंत अनेक कुटुंबांचे संसार या व्यसनमुक्तीच्या माध्यमातून चांगल्या मार्गाला लावले आहेत.

namdev chavanकॅप्टन नामदेव चव्हाण हे एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक असून आर्मी एनसीसी ऑफिसर म्हणून कार्यरथ आहेत. ते कॉलेज युवकांना संरक्षण सेवेमध्ये भरती होण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे कार्य करतात. आतापर्यंत त्यांच्या या मार्गदर्शणामुळे १५० ते १६५ युवक आर्मी, पोलीस, नेव्हीमध्ये सध्या कार्यरत आहेत.

ते आपल्या पत्नी सौ. रोहिणी यांना व्यसनमुक्ती अभियान या कार्यामध्ये सतत मदत करतात. त्यांना पुणे आणि सांगली या नामांकित संस्थेद्वारे समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे, तसेच महाराष्ट्र शासन यांच्या जिल्हा परिषद अंतर्गत त्यांना जिल्हाचा मानाचा रायगडभूषण पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे.

पत्ता : महाड, काकरतले, निर्मिती पार्क -१६ भिलारे मैदान समोर ता- महाड ,जि.- रायगड – ४०२३०१

मोबाईल : ९६८९६५०६४२ / ९३०९३२६४३५
ई मेल : nrchvn@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak India Business Directory
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?