पतंजली आयुर्वेद ही हरिद्वार येथील ग्राहक संकुल माल (consumer packaged goods) असलेली कंपनी आहे, ही कंपनी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी २००६ मध्ये सुरू केली होती. बाळकृष्ण (बाळकृष्ण सुवेदी) भारतीय अब्जाधीश उद्योजक आणि ग्राहक वस्तू कंपनी पतंजली आयुर्वेदचे अध्यक्ष आहेत. बाबा रामदेव पतंजली आयुर्वेदचे संस्थापक आहेत.
पतंजली आयुर्वेद कंपनी खाण्याच्या वस्तूंची, औषधे आणि हर्बल उत्पादने बनवते. सीएलएसए आणि एचएसबीसीच्या मते ‘पतंजली’ ही भारतातील सर्वात वेगवान वाढणारी एफएमसीजी कंपनी आहे. २०१८ पर्यंत भारताच्या सर्वाधिक विश्वासार्ह ब्रॅण्ड (द ब्रॅण्ड ट्रस्ट रिपोर्ट) च्या यादीमध्ये ते तेराव्या क्रमांकावर आहे आणि एफएमसीजी प्रकारात प्रथम क्रमांकावर आहे.

आत्ता जरा पतंजलीच्या यशाची रहस्ये बघुयात :
१. उत्पादनाची गुणवत्ता – आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उत्पादने
२. नि: शुल्क जाहिरात (बाबा रामदेव देशभरात आणि टीव्हीवर योग शिबिरे घेताना याचा प्रचार करत होते)
३. पतंजली ‘ब्रँडेड हाऊस’ धोरण आखते, तर P&G आणि HUL सारख्या ग्राहक वस्तू क्षेत्रातील इतर कंपन्या ‘हाऊस ऑफ ब्रँड्स’च्या रणनीतीचा अवलंब करतात. याला सिंगल-ब्रँड स्ट्रॅटेजी असेही म्हणतात. HUL आणि P&G यासारख्या बर्याच ब्रँड लॉन्च करण्याऐवजी हे सर्व काही एकाच नावाने विकतात.
४. ब्रँड अॅम्बेसेडर (बाबा रामदेव)
५. स्वस्त उत्पादने. पतंजलीच्या बर्याच उत्पादनांची किंमत स्पर्धेपेक्षा कमी असते. पतंजली आटा आयटीसी आणि पिल्सबरीपेक्षा स्वस्त आहे.
६. तोंडी जाहिरात करणे – जाहिरात करण्याची सर्वोत्तम पद्धत.
७. शक्तिशाली वितरण नेटवर्क
तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.
🚀 अधिक माहिती८. उत्पादनांची प्रचंड विविधता
पतंजली आणि बाबा रामदेव विचारधारा :
१. स्वदेशी : भारतीय कंपन्यांनी बनवलेली उत्पादने खरेदी करावीत.
२. दानार्थ संपन्नता : त्याचा नफा कुणाच्याही खिशात जात नसल्याचा पतंजलीचा दावा आहे.
३. राष्ट्र निर्माण आणि गरिबांना मदत करणे
ह्यातूनच शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे, पतंजली इतकी यशस्वी झाली आहे की बाबा रामदेव ज्यावर विश्वास ठेवतात, त्यावर लाखो लोक विश्वास ठेवतात. बाबा रामदेव अनेकदा हुतात्मा राम प्रसाद बिस्मिल यांची कविता गात असतात –
मेरा हो मन स्वदेशी, मेरा हो तन स्वदेशी।
मर जाऊं तो भी मेरा, होवे कफ़न स्वदेशी।।
– जयेश फडणीस
8097130476
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

