प्रत्येक यशस्वी प्रवासाची सुरुवात एका स्वप्नापासून होते आणि Breakcomfort®️ ची कहाणी याला अपवाद नाही. सातारा जिल्ह्यातील कास पठाराजवळील आंबाणी या छोट्याशा गावातून, जिथे २००-२५० लोकवस्ती आणि डोंगराळ दुर्गम भागात जीवन जगण्याची आव्हाने होती, सागर शेडगे यांनी आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली.
पारंपरिक शेती आणि मर्यादित उत्पन्नाच्या साधनांमुळे स्थानिक लोकांचा ओढा मुंबईकडे होता. सागर यांचे कुटुंबही १९७० च्या दशकात स्थलांतरित झाले. त्यांचे वडील, सातवीत असताना दिवसा काम आणि रात्री शाळा, असा संघर्ष करत दहावीपर्यंत शिक्षण घेऊ शकले. १९९६ मध्ये मुंबईच्या कांदिवली उपनगरात चाळीतील एका खोलीत त्यांनी नव्याने सुरुवात केली.
सागर यांनी लहानपणापासूनच हा संघर्ष जवळून पाहिला. त्यांच्या मनात एकच विचार होता – ही परिस्थिती बदलायची आहे. मोठी स्वप्ने पाहणाऱ्या सागर यांनी २००८ मध्ये गेटवे ऑफ इंडियाला भेट देताना समुद्रकिनारी उभ्या असलेल्या भारतातील पहिल्या पंचतारांकित हॉटेल ताजकडे पाहत ठरवले, “एक दिवस मी इथे बिझनेसमन म्हणून येईन, आणि नाही जमलं तर किमान चहा तरी घेईन!”
सागर यांनी शिक्षण पूर्ण केले आणि बीकॉमपर्यंत मजल मारली. गाडी धुण्यापासून ते वेगवेगळ्या नोकऱ्यांपर्यंत त्यांनी प्रत्येक संधीतून शिकत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. २०१७ मध्ये एका सीए फर्ममध्ये काम करताना त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. “लोकांनी मला ‘सर’ म्हणावं, आणि मी लोकांची कामे प्रामाणिकपणे आणि उत्तम रीतीने करावी,” अशी त्यांची मनोमन इच्छा होती.
जानेवारी २०२० मध्ये सागर यांनी नोकरी सोडली आणि १ फेब्रुवारी २०२० रोजी Breakcomfort®️ Business Registration Services ची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी ठरवलं की आता कधीच नोकरीच्या मागे जायचं नाही, तर स्वतःचा मार्ग तयार करायचा. पण हा प्रवास सोपा नव्हता.
सुरुवातीला त्यांना त्यांच्या माजी वरिष्ठांकडून टीका आणि अपमानास्पद शब्द ऐकावे लागले. “तू फक्त गुमास्ता (शॉप ॲक्ट) कर, तुझ्याकडून यापेक्षा जास्त होणार नाही,” असं एकाने सांगितलं. या शब्दांनी सागर यांना दुखावलं, पण त्यांनी या टीकेचा उपयोग प्रेरणेसाठी केला.
कंपनीच्या स्थापनेनंतर अवघ्या दीड महिन्यात, २१ मार्च २०२० रोजी देशात लॉकडाऊन लागलं. सर्व व्यवसाय ठप्प झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. पण सागर यांनी हार मानली नाही. सप्टेंबर २०२० मध्ये परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येताच त्यांनी फेसबुक बिझनेस ग्रुप्सद्वारे ऑनलाइन मार्केटिंगला सुरुवात केली.
त्यांनी एक अनोखी रणनीती अवलंबली – “अगोदर काम, नंतर पैसे”. माफक शुल्क, जलद सेवा आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात आपली छाप पाडली. इतकंच नाही, तर उत्तर प्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू येथील ग्राहकांचीही कामे केली.
आज Breakcomfort®️ ने १४००+ व्यावसायिक नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. शॉप ॲक्ट गुमास्ता, उद्यम आधार, जीएसटी, इम्पोर्ट-एक्सपोर्ट कोड, फूड लायसन्स, प्रोफेशनल टॅक्स सर्टिफिकेट यासारख्या सेवांमध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.
१ फेब्रुवारी २०२३ रोजी Breakcomfort®️ चा तिसरा स्थापना दिवस सागर यांनी हॉटेल ताज महाल, मुंबई येथील Sea Lounge Restaurant मध्ये साजरा केला. समुद्रकिनारी बसून त्यांनी आपल्या लहानपणी पाहिलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवलं. हा क्षण केवळ एका यशाचा उत्सव नव्हता, तर त्यांच्या मेहनती आणि जिद्दीचा पुरावा होता.
Breakcomfort®️ नावापासूनच प्रेरणा देते – Comfort Zone तोडा आणि तुमच्यातील अफाट क्षमता वापरून यश मिळवा. त्यांची टॅगलाइन Change Your Comfort Path®️. तुम्हाला तुमचा मार्ग बदलण्यासाठी आणि नव्या उंचीवर जाण्यासाठी प्रेरित करते. आम्ही फक्त व्यावसायिक नोंदणी करत नाही, तर तुमच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आणि तुमच्या यशाचा पाया घालण्यासाठी तुमच्या सोबत उभे राहतो.
Breakcomfort®️चे वेगळेपण
- सेवा : शॉप ॲक्ट गुमास्ता, उद्यम आधार, जीएसटी नोंदणी, इम्पोर्ट-एक्सपोर्ट कोड, FSSAI फूड लायसन्स, ट्रेडमार्क नोंदणी, प्रोफेशनल टॅक्स सर्टिफिकेट.
- रणनीती : “अगोदर काम, नंतर पैसे” – पारदर्शकता आणि विश्वास हा आमचा पाया.
- अनुभव : ६+ वर्षांचा व्यावसायिक नोंदणी क्षेत्रातील अनुभव आणि १४००+ यशस्वी नोंदणी.
- प्रामाणिकपणा : माफक शुल्क आणि जलद, विश्वसनीय सेवा.
Breakcomfort®️ तुमच्या व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत आहे. तुमच्या स्वप्नांना मर्यादा नाहीत, आणि आमच्या सेवांनाही नाहीत. तुमचा Comfort Path बदला आणि यशाच्या नव्या मार्गावर पाऊल टाका – Breakcomfort®️ सोबत!
संपर्क क्रमांक – 9867008910
Facebook Page – https://www.facebook.com/BreakComfort


