‘पूजाघर’ या सात्विक प्रॉडक्टला जगभर पोहोचवणारे ‘क्रिएटा पूजाघर’

ब्रॅण्ड चे नाव : क्रिएटा पूजाघर

ब्रॅण्डची स्थापना : १ फेब्रुवारी २००४, नागपूर

ब्रॅण्ड कशाचा आहे : देवघर / मंदिर / पूजाघर / देव्हारा (लाकडी मंदिरांचा ब्रॅण्ड क्रिएटा पूजाघर)

आपण भारतीय लोक अध्यात्मिक संस्कृतीचे, धर्माचे पालनकर्ते आहोत. सांस्कृतिक, धार्मिक विधी, प्रार्थना आणि ध्यान करण्यासाठी आपण मंदिरात जातो; पण वाढत्या दगदगीच्या जीवनशैलीमुळे दररोज मंदिरात जाणे शक्य होत नाही. मग आपण आपल्या घरातच योग्य पद्धतीने घरातील देव्हाऱ्याला सांस्कृतिक, अध्यात्मिक, धार्मिक पद्धतीने जपले आणि जोपासले तर नक्कीच आपण समाधानी राहून संस्कृतीचे पालन करू शकतो.

आजच्या युगाला अनुसरून ट्रेण्डच्या हिशोबाने आपण घराचे इंटेरियर करून घेतो, पण देव्हारे अजूनही इंटेरियरला साजेशे, मॉडर्न, वास्तुशास्त्रानुसार मिळत नाहीत. हीच गोष्ट मनात हेरून ‘क्रिएटा पूजाघर’ने देवघर बनवण्यास सुरुवात केली.

‘क्रिएटा पूजाघर’ हा मध्य भारतातील नागपूर स्थित ब्रँड आहे. मॉडर्न, इंटेरियरला साजेशे, वास्तुशास्त्रानुसार मंदिरे येथे गेल्या २० वर्षापासून तयार केले जात असून १ लाखांच्या वर समाधानी ग्राहक आहेत. पूजाघरच्या मंदिरांना भारतातच नव्हे तर जगभर मागणी आहे.

सर्व देवघरे ही मॉडर्न आणि क्रिएटिव्ह तर आहेतच सोबतच वास्तुशास्त्रानुसार इंटेरियरला मॅच होतील असे सर्वगुण संपन्न देवाच्या निवासाचे घर अधिक आत्मीयतेने आम्ही तयार करतो, जिथे देवाची पूजा केली जाते. वरील सर्व गोष्टी लक्षात घेता आम्ही आमच्या ब्रॅण्डला ‘क्रिएटा पूजाघर’ असे नाव दिले.

‘पूजाघर’ हा हिंदी शब्द आहे. जिथे ‘पूजा’ म्हणजेच ‘प्रार्थना’ केली जाते आणि ‘घर’ म्हणजे ‘आलय’ किंवा ‘निकेतन’ जे देवाचे आहे. ‘पूजाघर’ हे घरातील सकारात्मक ऊर्जेचे स्त्रोत आहे. भारतीय संस्कृतीत धार्मिक विधी, प्रार्थना आणि ध्यान करण्यासाठीची नियोजित जागा म्हणजेच ‘पूजाघर’. पूजाघर हा एक सामान्य शब्द असून अर्थाने मात्र मोलाचा शब्द आहे. घरातील पवित्र जागेची कल्पना जागृत करण्याचे उद्दिष्ट मनात बाळगून जिथे आपण अध्यात्माशी जोडले जावू, समरस होवू ती जागा म्हणजेच ‘पूजाघर’.

Smart Udyojak Business Ecosystem Popup

‘क्रिएटा पूजाघर’ हा देवघराचा ब्रॅण्ड असून ग्राहकांना त्यांच्या घरातील अध्यात्मिक वातावरण वाढवण्यासाठी डिझाईन केले गेले आहेत आणि या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपला जातो अगदी मनापासून….ते मनापर्यंत..!

creata poojaghar showroom scaled

‘क्रिएटा पूजाघर’चे वेगळेपण

१) भारतातील सर्वात जास्त मंदिरांची range असलेला ब्रॅण्ड.
२) मंदिरांच्या सर्व डिझाईन या स्वतः स्केच करून तयार केल्या आहेत. हे काम मोठे बंधू श्री जीवन गुजलवार करतात. ते स्वतः आर्टिस्ट आहेत.
३) कॉपी केलेल्या डिझाईन आम्ही वापरत नाही.
४) मंदिरांचे आधी prototype तयार केले जाते मग नंतरच फायनल मंदिर तयार केले जाते. त्यामुळे प्रॉडक्शनमधील चुकांचे प्रमाण कमी होते.
५) २ एकर जागेत प्रशस्त मॅनुफॅक्चरींग युनिट.
६) आधुनिक मशिनरी आणि कुशल कारागिरांची टीम जे बनवतात उच्च दर्जाचे प्रॉडक्ट्स (मंदिरे).
७) उच्च दर्जाचे, उत्तम प्रतीचे लाकुड, आर्टिफिशियल वूड, इतर सामुग्रीचा वापर केला जातो. जे क्वालिटी प्रॉडक्ट तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शेवटी प्रश्न हा अध्यात्माचा आणि संस्कृतीचा आहे त्यामुळे क्वालिटी ही चांगली असायलाच पाहिजे.
८) मॉडर्न इंटेरियर, वास्तुशास्त्र आणि तुमच्या मागणीनुसार घराला साजेशे मंदिर आम्ही तयार करतो ते ही आस्थेने संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी.
९) ग्राहक हेच केंद्र बिंदू मानून सर्वोतोपरी सर्व्हिस देणे हाच आमचा मानबिंदू मानून मार्गक्रमण करत आहोत.

वरील सर्व बाबी ‘क्रिएटा पूजाघर’ला सर्वांपासून वेगळेपण प्रदान करतात.

“क्रिएटा पूजाघर” हे ब्रॅण्ड प्रामुख्याने देवघर तयार करण्याचे काम करते. यात खालील प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस येतात.

१) मंदिर/ देवघर/ देवालय
– पारंपरिक देवघर (Traditional Mandirs)
– मॉडर्न देवघर (Modern Mandirs)

२) मंदिरातील accessories
– देवपाट
– पोथी स्टँड
– लामन दिवा
– अगरबत्ती स्टँड
– गणपती, अंबाबाई कुलस्वामिनी फोटो फ्रेम इत्यादी.

कंपनीचे नाव : क्रिएटा इंटेरियर कॉन्सेप्ट्स

कंपनीचे डायरेक्टर :

१) जीवन पुरुषोत्तम गुजलवार
२) विकास पुरुषोत्तम गुजलवार

एका नाण्याला जेव्हा दोन बाजू असतात, तेव्हाच त्या नाण्याची किंमत ठरत असते. अगदी त्याचप्रमाणे ‘क्रिएटा पूजाघर’चे संचालक जीवन आणि विकास गुजलवार. जीवन – विकास हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघेही जुळे भाऊ, मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील सालोड या छोट्याश्या खेडेगावातील.

आईवडिलांची परिस्थिती सावरत दोघेही लहानाचे मोठे झाले, पण कधी परिस्थितीचा कांगावा केला नाही. प्रत्येक अडचणीचा सामना केला आणि सोबत स्वतःचे छंद जोपासत मोठे झाले. दोघांनाही नेहमी काहीतरी वेगळं करण्याची उमेद असायची, जेवढं जास्त क्रिएटिव्ह ते काम करायचे, तेवढा जास्त आनंद त्यांनां होत होता. असेही म्हणू शकतो की creativity हेच त्यांच्या जगण्याचे आधार होते.

गावातील शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर यवतमाळ येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आणि पुढील पदवी शिक्षणासाठी त्या काळातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणारे शहर म्हणजेच औरंगाबाद आणि आताचे संभाजीनगर गाठले.

घरची परिस्थिती, आई-बाबांचे कष्ट सगळे डोळ्यांसमोर होते त्यामुळे लहान भाऊ विकास याने काम करून शिक्षण घेण्याचे ठरवले आणि त्याच काळात जीवन या मोठ्या भावाचे शासकीय चित्रकला महाविद्यालयात BFA साठी ऍडमिशन झाले.

विकासने मोठा भाऊ बनून जीवनच्या शिक्षणाची सर्व धुरा आपल्यावर घेतली. हातात मिळेल ते काम केले, कधी रात्र रात्र जागून स्क्रीन प्रिंटिंग केली तर कधी विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट्स बनवून दिले तर कधी आर्ट वर्कची कामे केली. विकासने प्रत्येक कामातून काही ना काही शिकायला मिळते या विचाराने प्रेरित होऊन कामे केली आणि दोन्ही भावंडांनी त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

vikas and jeevan creata poojaghar

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी दोघांनी मायानगरी मुंबई गाठली. जीवनचे शिक्षण हे कलेशी निगडित असल्यामुळे जीवनला चित्रपटसृष्टीमध्ये काम मिळाले आणि अवघ्या काही महिन्यातच मेहनतीच्या जोरावर जीवन आर्ट डायरेक्टर या पदावर मोठ मोठ्या अभिनेत्यांसोबत कामास सुरुवात केली.

त्याच वेळेस विकासने SFX चे टेक्निकल कोर्स पूर्ण करून स्पेशल इफेक्ट analyst या पदावर चित्रपटसृष्टीमध्ये पाय रोवण्यास सुरुवात केली होती. सर्वकाही एकदम सुरळीत सुरू होते, पण आईबाबांचे कष्ट, त्यांची सेवा करण्याचे स्वप्न, आपली माणसे त्यांची आठवण हे दोघांनाही स्वस्थ बसू देत नव्हती.

दोघांचे एकच स्वप्न होते की ज्या गोष्टींसाठी आम्ही संघर्ष केला ती गोष्ट सोपी करून सामान्य जनतेस काम देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे धारिष्ट उराशी बाळगून त्यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आणि परत गावाच्या दिशेने निघाले.

गावाकडे काम करू, पण आपल्या कलेला मार्केट मिळणं कठीण होईल म्हणून त्यांनी नागपूर गाठलं आणि प्रवास सुरू झाला Creata च्या creativity चा. नागपूरला आले तेव्हा काचेचे काम करू लागले. कालांतराने पेंटिंगचे कामे केली आणि मग इंटेरियर डेकोरेशनच्या कामाला सुरुवात केली. ग्राहकांना यांचे काम आवडू लागले आणि काम मिळत गेले.

इंटेरियर करताना ग्राहक नेहमी यांना एक प्रॉब्लेम सांगायचे तो म्हणजे घर तर छान होत आहे, पण घराला शोभेल असे देवघर भेटत नाही आणि सोबत म्हणायचे तुम्ही का नाही डिझाईन करून देत एखाद छान देवघर. या परिथितीत दोघांनाही एक संधी दिसली आणि मग ठरलं की आपण आता देवघर डिझाईन करायचे.

प्रथमदर्शी स्वतःच्या क्लाएंटसाठी देवघर बनवून दिले आणि मग मागणीनुसार देवघराचे ऑर्डर यायला लागले. लोकांनीं खूप भरभरून कौतुक केले आणि याच संकल्पनेतून २००४ मध्ये ‘क्रिएटा पूजाघर’ हा ब्रॅण्ड जीवन आणि विकास या दोन्ही भावंडांनी जन्मास घातला.

जीवन हे एक आर्टिस्ट असल्यामुळे मंदिरांची सर्व डिझाईन्स त्यांनी स्वतः रेखाटले आणि विकास याने ते सत्यात उतरवले. अशाप्रकारे या भावंडांच्या संकल्पनेतून एक मोठ्या ब्रॅण्डची निर्मिती झाली.

आज घडीला ‘क्रिएटा पूजाघर’चे परदेशात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि भारतात दिल्ली, नागपूर, पुणे, नांदेड, नाशिक, अमरावती, ठाणे, नारायणगाव या ठिकाणी शाखा आहेत.

जीवन आणि विकास यांचे स्वप्न होते की लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे. याच धर्तीवर आज १००+ च्या वर कुटुंबांना या दोन्ही भावंडांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध करून दिला. २०३० पर्यंत १ हजार १११ कुटुंबांना रोजगार देण्याचा या दोघांचा मानस आहे. ‘क्रिएटा पूजाघर’ हे २०३० पर्यंत जागतिक बाजारपेठेत भारताचे नेतृत्व करेल ही आशा दोन्ही भावंडाना आहे.

संकेतस्थळ : www.creatapoojaghar.com
संपर्क : ८८८८१६६६६५

Author

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak Business Ecosystem Popup
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?