
ब्रँडचे नाव : ‘कोकणभूमीमित्र’ गांडूळखत प्रकल्प
ब्रॅण्डची स्थापना : जानेवारी २०२१
कोकण भूमी मित्र सिंधुदुर्गच्या उद्योगात एक महत्त्वाचे नाव म्हणून ओळखले जाते. आम्ही जानेवारी २०२१ पासून या उद्योगात कार्यरत आहोत. दर्जेदार सेंद्रिय गांडूळखतनिर्मिती क्षेत्रात ‘कोकणभूमीमित्र’ हे प्रसिद्ध ब्रँड नाव आहे. जास्तीजास्त नैसर्गिक साधनाचा आणि सेंद्रिय खतांचा वापर करून मातीची एकूण गुणवत्ता वाढवण्याबाबत जागरुकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
शेतातील रासायनिक खतांच्या सर्रास वापरामुळे मातीचे खूप नुकसान झाले आहे आणि झालेले नुकसान भरून काढणे आणि मातीचे सौंदर्य वाढवणे काळाची गरज आहे. कोकणभूमीमित्र मातीचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी सातत्याने काम करत आहे. आम्ही माती आणि पर्यावरण वाचवण्यासाठी सेंद्रिय संस्कृती विकसित करण्याच्या ध्येयासोबत काम करत आहोत.
सेंद्रिय शेती काळाची गरज आहे आणि गांडूळखत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतापैकी एक उत्कृष्ट खत आहे. आम्ही उत्कृष्ट दर्जाचे (गांडूळखत, vermicompost), (vermiwash गांडूळपाणी), (vermicompost bed गांडूळखत बेड), waste decomposers वेस्ट डिकंपोसेर्स तसेच गांडूळबीज (vermi culture) वाजवी दरात उपलब्ध करून देतो. आम्ही आमच्या उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी आणि जास्तीत जास्त लोकांना पैशासाठी अधिक मूल्य देण्यासाठी वचनबद्ध आहोत.

गांडूळखताचे फायदे
- जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो.
- गांडूळ खतवापरामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात बदल होतो.
- जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारतो.
- उत्पादन क्षमता व जमिनीची सच्छिद्रता वाढते.
- जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्यामुळे कमी पाण्यात पिकाचे उत्पादन घेता येते.
तुमचे ब्रँड पेज रजिस्टर करायचे असल्यास येथे क्लिक करा
- जमिनीमध्ये प्राणवायूचे प्रमाण वाढते, त्यामुळे जैविक क्रिया वाढते.
- गांडूळ खतामुळे उपयुक्त जिवाणूंची संख्या ३ ते ५ पटीने वाढते.
- पिकाच्या उत्पादनात वाढ होते, त्याचबरोबर उत्पादनातील प्रत सुधारते. विशेषतः रंग, साठवण क्षमता, चकाकी यामुळे उत्पादनाला जास्त बाजारभाव मिळतो.
- गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
- रासायनिक खतवापरात बचत होऊन, खतावरील काही खर्च कमी होतो. पिकाचे उत्पादन वाढते.

सेंद्रिय शेती आणि फायदे
- सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून मानवाचे आरोग्य वाढते व जीवनमान उंचावण्यास मदत होते.
- सेंद्रिय शेती ही निसर्गाच्या जीवनचक्रावर अवलंबून व अनुरूप हवी. ती जीवसृष्टीला धरून चालणारी हवी. यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही.
- आर्थिक उत्पनात वाढ व खर्चात घट याद्वारे उत्तम आर्थिक नियोजन.
- निसर्गाचे संतुलन कायम राखण्यासाठी मदत होते.
- सेंद्रीय शेती ही एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन प्रक्रिया आहे, यामुळे मातीचा सुपीकपणा कायम राखला जातो.
मालकांविषयी :
तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.
🚀 अधिक माहिती
प्रशांत पेडणेकर हे कंपनीचे मालक आहेत. ते पेशाने कॉम्पुटर इंजिनेर आहेत. सध्या रासायनिक शेतीमुळे होणारे दुष्परिणाम पाहता सेंद्रिय शेती काळाची गरज आहे हे ओळखून सेंद्रिय शेतीचा जास्तीजास्त प्रचार करण्यासाठी आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व सर्वांना पटवून देण्यासाठी तसेच आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतापैकी गांडूळखत एक उत्कृष्ट खात आहे म्हणून गांडूळखत प्रकल्प चालू केला.
गांडूळखत प्रकल्पाचा पत्ता : गाव : कुंभवडे, तालुका : कणकवली, जिल्हा : सिंधुदुर्ग – 416609
Contact and WhatsApp Number: – 7710006677
तुमचे ब्रँड पेज रजिस्टर करायचे असल्यास येथे क्लिक करा
Website: https://www.kokanbhumimitra.com/
Facebook: https://www.facebook.com/Kokanbhumimitra/
Location: https://maps.app.goo.gl/YgnrXddWuMSaUkvZ8
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

