सुप्रिया जाधव यांनी कर्जापलीकडे, आर्थिक सक्षमीकरणाची निर्माण केलेली वाट म्हणजे ‘Laxjade Loans’

Laxjade Loans supriya jadhav

ही कथा आहे एका असामान्य उद्योजिकेची आणि तिच्या अनोख्या स्वप्नांची… ‘Laxjade Loans’ ची. ही कहाणी आहे सुप्रिया लक्ष्मणराव जाधव यांची. ज्या त्यांच्या दृढनिश्चयाने आणि मेहनतीने एक नाविन्यपूर्ण आर्थिक सेवा कंपनी उभी केली.

सुप्रिया, एक अभियंता, ज्यांनी पुणे विद्यापीठातून आयटीमध्ये बी.ई. पूर्ण केलं, पण त्यांचं मन फक्त कोडिंग आणि वेब डिझायनिंगपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी ‘Laxjade Infotech’ नावाची कंपनी स्थापन केली, जी वेबसाइट डिझायनिंग आणि डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात काम करते. पण त्यांचं खरं स्वप्न होतं लोकांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणण्याचं आणि यातूनच जन्म झाला ‘Laxjade Loans’ चा – १८ जानेवारी २०२४ रोजी.

सुप्रियाने बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात सहा वर्षे काम केलं होतं. त्या काळात त्यांनी अनेक बँका आणि NBFC सोबत काम करत कर्जप्रक्रियेच्या प्रत्येक पैलूवर प्रभुत्व मिळवलं. त्यांना समजलं की, कर्ज घेणं ही अनेकांसाठी गुंतागुंतीची आणि तणावपूर्ण प्रक्रिया असते. याच अनुभवातून त्यांनी ठरवलं की, त्यांना ही प्रक्रिया सुलभ, पारदर्शी आणि ग्राहकांसाठी विश्वासार्ह बनवायची आहे.

‘Laxjade Loans’ ही फक्त एक कर्जपुरवठा कंपनी नाही, तर ती आहे एक विश्वासाचं ठिकाण. सुप्रिया आणि तिच्या टीमने ग्राहकांच्या गरजा समजून घेतल्या आणि त्यांना कमी व्याजदरात, कमी कागदपत्रांसह आणि सुरक्षित पद्धतीने कर्ज उपलब्ध करून दिलं. मग तो गृहकर्ज असो, बिझनेस लोन, शिक्षण कर्ज, पर्सनल लोन किंवा म्युच्युअल फंड, शेअर्स आणि विम्यावरील कर्ज – ‘Laxjade Loans’ने प्रत्येक गरजेला योग्य तोडगा दिला.

त्यांच्या कर्मचाऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते ग्राहकांना फक्त कर्जच देत नाहीत, तर त्यांना संपूर्ण प्रक्रियेत मार्गदर्शन करतात – अगदी पहिल्या पायरीपासून ते कर्ज मंजुरीपर्यंत. पण सुप्रियाचं स्वप्न फक्त कर्जपुरवठ्यापुरतं मर्यादित नाही. त्यांनी म्युच्युअल फंड, फिक्स्ड डिपॉझिट, विमा आणि डिमॅट यांसारख्या इतर आर्थिक उत्पादनांद्वारे लोकांना करबचत आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

त्यांचा ठाम विश्वास आहे की, आर्थिक ज्ञान यामुळे ‘Laxjade Loans’ ग्राहकांना केवळ कर्ज देत नाही, तर त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षित भविष्याची हमी देते. सुप्रिया जाधव यांनी त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करून एक असा ब्रँड उभा केला, जो ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करतो आणि त्यांचा विश्वास कमावतो.

‘Laxjade Loans’ ही फक्त एक कंपनी नाही; ती आहे सुप्रियाच्या दूरदृष्टीची आणि लोकांना सक्षम करण्याच्या ध्येयाची अभिव्यक्ती. आज ती अनेकांना त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करत आहे – एक कर्ज, एक गुंतवणूक आणि एक विश्वासार्ह पाऊल यांच्या माध्यमातून.

Smart Udyojak Business Ecosystem Popup

Address: Shop No 01, Poonam Apartment, Chandrakala Raut Marg, Shivaji Nagar, Salwad, Boisar, Palghar 401501 | Email: supriyajdv@gmail.com | Contact: 8356924601

Website: www.laxjadeloans.com | www.laxjadedigital.com

Author

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak Business Ecosystem Popup
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?