ब्रॅण्डचे नाव : शिवम असोसिएट्स
ब्रॅण्डची स्थापना : ११ अक्टोबर २०१७
ब्रॅण्ड कशाचा आहे? व्यावसायिक रजिस्ट्रेशन आणि Consulting सर्व्हिसेस
ब्रँडचे नाव ‘शिवम’ ठेवायचे कारण म्हणजे महादेवाचा भक्त आणि शिव हे नाव पहिल्यापासूनच मला चांगले वाटत होते आणि मी शिक्षण घेत असताना ठरवले होते की कोणताही व्यवसाय करायचा झाला तर शिव या नावशी जुळेल असा ठेऊ.
माझा जन्म शेतकरी कुटुंबातील खेडेगावात झाला. बारावीपर्यंत शिक्षण मी माझ्या गावी पूर्ण केले. बारावीच्या पुढे नोकरी न करता काही तरी व्यवसाय करावा अशी माझ्या वडिलांची इच्छा असल्यामुळे त्यांनी मला बाहेरगावी छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षणास पाठवले.
पुढे शिक्षण घेत असताना व्यवसाय करावा अशी माझी व वडिलांची पहिल्यापासूनच इच्छा होती. त्यामुळे मी मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मार्केटिंग स्पेसिलायझेशन घेऊन माझे मास्टर डिग्री कंप्लेंट केली आणि त्यानंतर कमी खर्च व सहज चालू करता येणारा व्यवसाय निवडावा त्यामुळे मी या क्षेत्रात पाउल ठेवले व हा व्यवसाय घरीच चालू करण्यास सुरुवात केली.
व्यवसायामध्ये भरपूर अडचणी आल्या. सुरुवातीला ग्राहक भेटत नव्हते. मार्केटमध्ये एखादे ऑफिस असावे त्यामुळे लोकांचा विश्वास आपल्यावर बसावा यासाठी मी २०१७ मध्ये संभाजीनगरमध्ये एक छोटे ऑफिस चालू केले आणि पुढे या व्यवसाय कष्ट आणि मार्केटिंगच्या जोरावर पूर्ण महाराष्ट्र व्यवसाय पसरवला. आजघडीला दहा हजार आपले संतुष्ठ ग्राहक जोडलेले आहेत आणि या पुढेही चांगली सर्व्हिस देऊन पुढे चालत राहू.
‘शिवम असोसिएट्स’च्या सेवा :
- उद्यम रजिस्ट्रेशन [MSME]
- शॉप ऍक्ट लायसन्स
- जीएसटी रजिस्ट्रेशन [GST]
- इन्कम टॅक्स रिटन [ITR]
- डिझिटल सिग्नेचर (DSC)
- फूड लायसन्स (FSSAI)
- इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड [IEC]
- APEDA रजिस्ट्रेशन
- PTEC & PTRC रजिस्ट्रेशन
- PF & ESIC रजिस्ट्रेशन
- Labour Licence-लेबर लायसन्स
- ISO Certification (All)
- ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन
- RERA रजिस्ट्रेशन
- Project Report-प्रोजेक्ट रिपोर्ट
- Startup India / GeM रजिस्ट्रेशन
- All Type Return Filling
- Company रजिस्ट्रेशन (OPC, LLP, Pvt Ltd, FPC)
कंपनीचे मालक : भागवत अप्पासाहेब सोळंके [MBA Marketing]
संपर्क : 9049870002


