२०१७ मध्ये मयूर मोरे यांच्या एका छोट्या पण महत्त्वाकांक्षी स्वप्नातून ‘फ्रेस्को – द क्रिएटिव्ह बॉक्स’चा जन्म झाला. एका स्वतंत्र लोगो डिझाईन प्रोजेक्टपासून सुरू झालेला हा प्रवास आज एका यशस्वी क्रिएटिव्ह कंपनीपर्यंत पोहोचला आहे.
मयूर आणि त्यांच्या सहसंस्थापक जागृती कदम यांनी Fresco Innovations LLP ची स्थापना करत व्यवसायांना त्यांच्या स्वप्नांना साकार करणारी व्हिज्युअल ओळख प्रदान करण्याचे ध्येय ठेवले. ‘Fresco’ नावापासूनच या ब्रँडचा ताजेपणा आणि सर्जनशीलतेची भावना दिसून येते.
“Need-Based Creative Design” या तत्त्वावर ‘फ्रेस्को’ स्टार्टअप्स, SMEs आणि ब्रँड री-डिझाईन करणाऱ्या कंपन्यांसाठी खास डिझाईन्स तयार करते. लोगो डिझाईनपासून ते ब्रँड आयडेंटिटी डेव्हलपमेंट, पॅकेजिंग डिझाईन, सोशल मीडियासाठी क्रिएटिव्ह्ज, बिझनेस स्टेशनरी आणि डिजिटल प्रमोशन डिझाईन्सपर्यंत ‘फ्रेस्को’ प्रत्येक व्यवसायाच्या गरजेनुसार प्रभावी आणि लक्षवेधी सोल्यूशन्स देतो.
मयुर मोरे ‘फ्रेस्को’चे क्रिएटिव्ह डायरेक्टर यांचा १४ वर्षांचा अनुभव आणि स्ट्रॅटेजिक दृष्टिकोन यामुळे ‘फ्रेस्को’ने अनेक व्यवसायांना त्यांची खास ओळख निर्माण करून दिली. त्यांचा विश्वास आहे की, डिझाईन फक्त सुंदर दिसण्यासाठी नसते, तर ती व्यवसायाची आत्मा आणि ओळख बनते.
दुसरीकडे जागृती कदम यांनी डिजिटल डिझाईन, क्लायंट रिलेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधील आपला अनुभव वापरून ‘फ्रेस्को’ला अधिक मजबूत बनवले. त्यांच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि सेवा वितरणातील कौशल्यामुळे ग्राहकांना नेहमीच विश्वासार्ह आणि दर्जेदार सेवा मिळतात.
‘Me Udyojak’ नेटवर्किंग ग्रुपचे सक्रिय सदस्य म्हणून मयूर यांनी अनेक उद्योजकांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या व्यवसायांना ‘फ्रेस्को’च्या सेवांमुळे नवे बळ मिळाले. ‘फ्रेस्को’चा प्रत्येक प्रोजेक्ट हा ग्राहकांच्या गरजा आणि त्यांच्या व्यवसायाच्या ध्येयाशी जोडलेला असतो. मग तो छोटा स्टार्टअप असो किंवा मोठी कंपनी. ‘फ्रेस्को’ प्रत्येकासाठी तितक्याच उत्साहाने आणि समर्पण भावनेने काम करते.
आज ‘फ्रेस्को’ केवळ एक डिझाईन कंपनी नाही, तर व्यवसायांना त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी सर्जनशीलतेचा रंगीत बॉक्स आहे. मयूर आणि जागृती यांच्या नेतृत्वाखाली ‘फ्रेस्को’ प्रत्येक नव्या प्रोजेक्टमधून नव्या उंचीवर पोहोचत आहे आणि व्यवसायांना त्यांच्या यशाची एक अनोखी ओळख देत आहे.
संपर्क : ९७७३९२९९४५ / ९७७३९२९९४६
पत्ता : गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०००६३


