Advertisement
उद्योग कथा

कोळशाच्या राखेतून उभा राहिलेला उद्योजक!

तुम्ही उद्योजक आहात का?

जर असाल, तर 'महाराष्ट्र उद्योजक सूची'मध्ये आजच आपली नोंद करा आणि अगणित लाभ मिळवा.

अधिक माहितीसाठी : udyojak.org/join-udyojak-list/

Print this Page

fly-ash-bricks-production-udyojak.org

अत्यंत बेताची कौटुंबिक परिस्थिती, बेरोजगारी, अपुरे शिक्षण व त्यामुळे उद्भवणार्‍या समस्या जयेंद्र पटले यांना अस्वस्थ करीत होत्या. कुठलाही व्यवसाय कसा करावा, प्रशिक्षण कसे घ्यावे, कच्च्या मालासाठी येणारा खर्च असे असंख्य प्रश्‍न त्यांना भेडसावत होते, पण म्हणतात ना, ‘इच्छा तेथे मार्ग’ सापडतोच. अथक प्रयत्नातून त्यालाही एक नवा मार्ग गवसला. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत कोळशाच्या राखेपासून विटा बनविण्याच्या उद्योगाबाबतचे प्रशिक्षण त्यांनी घेतले व पूर्वीच्या विटा बनवण्याच्या व्यवसायाला नव्या कल्पनेतून नवे रूप दिले.

काही तरी करून दाखवण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर धूळही वाया जात नाही, असे म्हणतात. याची प्रचीती गोंदिया जिल्ह्यात येत आहे. आतापर्यंत केवळ मातीपासून विटांची निर्मिती होत असे, पण आता प्रथमच कोळशाच्या राखेपासून विटांची निर्मिती करणारा उद्योग गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील जयेंद्र पटले यांनी यशस्वीरीत्या चालू केला आहे.

अत्यंत बेताची कौटुंबिक परिस्थिती, बेरोजगारी, अपुरे शिक्षण व त्यामुळे उद्भवणार्‍या समस्या जयेंद्र पटले यांना अस्वस्थ करीत होत्या. कुठलाही व्यवसाय कसा करावा, प्रशिक्षण कसे घ्यावे, कच्च्या मालासाठी येणारा खर्च असे असंख्य प्रश्‍न त्यांना भेडसावत होते, पण म्हणतात ना, ‘इच्छा तेथे मार्ग’ सापडतोच. अथक प्रयत्नातून त्यालाही एक नवा मार्ग गवसला. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत कोळशाच्या राखेपासून विटा बनविण्याच्या उद्योगाबाबतचे प्रशिक्षण त्यांनी घेतले व पूर्वीच्या विटा बनवण्याच्या व्यवसायाला नव्या कल्पनेतून नवे रूप दिले.

जाळलेल्या कोळशाची राख, जिप्सम, वाळू, सिमेंट, चुना यांच्या मिश्रणातून या विटा बनविण्यात येतात. जिल्हा उद्योग केंद्रातून या विटा बनवण्याचे प्रशिक्षण त्याने घेतले. या उद्योगाकरिता आवश्यक मशीन व इतर कच्च्या मालाकरिता जिल्हा उद्योग केंद्रातर्फे केंद्र शासनाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत २५ ते ३० टक्के अनुदान देण्यात येते. एवढेच नव्हे तर उद्योग चालू करण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्यास बँकेकडून कर्ज देण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. विटा बनविण्यासाठी लागणार्‍या राखेचे प्रमाण बघता एवढी राख कोठून व कशी आणायची, असाही प्रश्‍न पटले याच्यासमोर उभा ठाकला. त्यांच्या या समस्येचे निराकरणही अगदी सहज झाले. जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील अदानी वीज प्रकल्पातून बाहेर पडणार्‍या कोळशाची राख या उद्योगासाठी पुरविण्यात येत आहे. फ्लाय अ‍ॅश, जिप्सम, वाळू, सिमेंट, चुना सर्व प्रमाणशीर एकत्र करून वीट बनविण्याच्या मशीनमध्ये हे मिश्रण टाकून ७० टन फ्लाय अ‍ॅश ब्रिक्स प्रेशर मशीनद्वारे प्रेशर दिले जाते व विटा तयार करण्यात येतात.

अत्यंत अल्पावधीत जयेंद्र पटले निर्मित विटांची मागणी वाढली असून गोंदिया एमआयडीसी व शहरातील इतर बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात विटांची विक्री सुरू झाली आहे. लाल विटांनी केलेल्या बांधकामाचे आयुष्य बघता या विटांची मागणी बाजारपेठेमध्ये प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

जयेंद्र पटले या उद्योगामुळे पंधरा स्त्री-पुरुषांना रोजगार उपलब्ध झाला. महिन्याकाठी ६० हजार रुपये निव्वळ नफा कमावणार्‍या या उद्योगामध्ये त्याची पत्नी कांता हीचही मोलाचं योगदान आहे.

बिकट आर्थिक परिस्थितीचे जुने दिवस आठवताना जयेंद्रला समाधान या गोष्टीचं आहे की, आज तो स्वत: यशस्वी उद्योजक असून या उद्योगाच्या आधारे त्याने अनेकांना खंबीरपणे उभं केलं आहे.

राख व सिमेंटपासून निर्मित विटांमुळे अनेक इमारतींचा पाया मजबूत बनला आहे. जयेंद्र पटले याचं जीवनमान उंचावलं आहे. भविष्यात या उद्योगाचं रूपांतर वटवृक्षात करण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण होईल यात शंका नाही.

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: