ग्राहकाशी चांगलं नातं निर्माण करा


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


तुमच्या ग्राहकांशी केवळ कामापुरतं काम एवढंच नातं न ठेवता त्यांच्याशी चांगलं नातं निर्माण करा. याने खात्रीपूर्वक तुमच्या विक्रीत वाढ होणारच. तुमचा व्यवसाय नुकताच सुरू झालेला असो वा दीर्घकाळापासून चालत आलेला असोत, त्याची वृद्धी ही मात्र तुमचं तुमच्या ग्राहकांशी असणार्‍या नात्यावरच ठरते.

त्यामुळे महिन्यातून एकदा तरी तुमच्या ग्राहकाला भेटा, फोन, Email अथवा SMS करा. हेही जमत नसेल तर त्याच्या वाढदिवशी त्याला शुभेच्छा देणारा संदेश पाठवून तरी त्याच्या संपर्कात राहा. ग्राहक प्रत्यक्ष आपल्यापर्यंत येण्यासाठी आपण अगणित पैसे खर्च करतो. परंतु तोच ग्राहक आणि त्याचा database तयार करण्याकडे मात्र दुर्लक्ष करतो.

हेच सगळं तुमचे स्पर्धकही करत असतात. आपले विद्यमान ग्राहक हे आपल्या व्यवसायाचे आधारस्तंभ असतात. त्यांच्याकडून आपल्याला सतत व्यवसाय मिळत असतो, तसेच नवीन ग्राहक मिळवण्यासाठीसुद्धा त्यांची मदत होते. ग्राहकाशी सुदृढ संबंध प्रस्थापित करण्याबाबत आपल्याकडे तितकीशी जागरूकता नाही.

आपल्या ग्राहकयादीविषयी आपण म्हणावे तितकं आग्रही नसतो. याच कारण की या गोष्टीच म्हणावं तितकं महत्त्व त्यांना कळत नसतं. आपल्यापैकी कितीजणांकडे ग्राहकांचा updated database आहे? त्यापैकी किती ग्राहक आपले कायमस्वरूपी ग्राहक आहेत? अशा प्रश्नांची समाधानकारक उत्तर मिळतं नसतील तर लगेचच जागे व्हा आणि कामाला लागा.

सर्वप्रथम आपल्या विद्यमान ग्राहकांची यादी तयार करा. त्यातील कायमस्वरूपी असणाऱ्यांची वेगळी यादी करा. आता त्यांना फोन करा, मॅसेज करा, Email करा अथवा Greeting पाठवा, परंतु त्यांच्याशी संवादाला सुरुवात करा. आपले ग्राहक आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेतव आपल्याला याची पुरेपूर जाणीव आहे हे त्यांना कळायलां हवं.

आपल्या व्यवसायातलं त्याचं स्थान किती बहुमूल्य आहे, हे त्यांना कळवा. त्यांना काही सवलती द्या किंवा भेटवस्तूपाठवा. आपल्या ग्राहकांसाठी काही Event Organize करा. वेगवेगळे Seminars भरवा. ग्राहकांना आपलसं करा. आकर्षक आणि वेगळेपणाने ग्राहकांचे आभार माना. त्यांना हे नक्की आवडेल.

आपण जे काही चांगले काम करतो ते केवळ आपला ग्राहक चांगला असतो म्हणून! ग्राहकाला योग्य पद्धतीने appreciate केल तर तो समाधानी होतो आणि आपल्याकडेच टिकून राहतो. तुम्ही ग्राहकांशी सलोख्याने वागता तेव्हा तुमच्यात केवळ व्यावसायिक नातं न राहता ॠणानुंबध घट्ट होतात आणि आपण त्यांच्यासाठी महत्त्वाचे होतो.

त्यांना चांगली सेवा द्या, माहिती द्या, संपर्क वाढवा, प्रसंगी सल्ला विचारा. या साऱ्यातून तुम्ही त्यांच्या जवळचे बनता आणि जणू त्यांच्या कुटुंबाचा एक घटकच होता. म्हणूनच प्रत्येक ग्राहकाकडे पाहताना त्याच्याशी तुमचं दीर्घकालीन नातं निर्माण होणार आहे, या आशावादाने पाहावं.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?