📱 Smart Udyojak WhatsApp Channel
व्यवसाय, मार्केटिंग आणि उद्योजकतेविषयी उपयुक्त अपडेट्स मिळवा
आत्ताच Join करा

२०२५ मध्ये डिजिटल मार्केटिंगमध्ये या चार गोष्टी करायलाच हव्यात

social media manager

१. सोशल मीडियाचा वापर करा

फेसबुक, इन्स्टाग्राम, लिंक्डइन असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म येऊनसुद्धा दहाहून अधिक वर्ष होऊन गेली. अजूनही तुम्ही त्याचा वापर तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी करत नसाल तर कठीण आहे.

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे फक्त सणावाराला शुभेच्छा पोस्ट करणे किंवा तुमच्या ऑफर्स आणि जाहिरातींचा भडीमार नाही. सोशल मीडिया वर आपल्याला अपेक्षित ग्राहकांना काय हवं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. यासाठी लोकांना प्रश्न विचारा. त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्या.

सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की आता तुम्ही जे पोस्ट करता ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्हाला सोशल मीडियावर paid campaign कराव्या लागतात. दिवसा अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही paid campaign करू शकता.

Smart Udyojak Business Ecosystem Popup

सोशल मीडिया मार्केटिंगसाठी तुम्हाला थोड्या तांत्रिक गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला नसेल जमत तर योग्य एजेंसी निवडून त्यांना सोशल मडिया मार्केटिंग आउटसोर्स केलं पाहिजे.

google my business

२. ‘गुगल माय बिझनेस’वर नोंदणी करा

गुगल सर्चमध्ये स्थानिक प्लेसेसमध्ये तुमचा व्यवसाय दिसावा यासाठी ‘गुगल माय बिझनेस’वर नोंदणीवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. हे पूर्णपणे मोफत आहे. मात्र त्याची रीतसर प्रक्रिया असून ती तुम्हालाच पूर्ण करावी लागते.

गुगल तुमच्या व्यवसायच व्हेरिफिकेशन केल्यानंतरच तुमचं प्लेसेसमध्ये पेज प्रसिद्ध करतो. त्यामुळे जी माहिती द्याल ती सर्व खरी द्या.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

review mechanism in business

३. ग्राहकांच्या अभिप्रायाचा उपयोग करा

सोशल मीडिया, गुगल, जिथे जिथे तुमचे ग्राहक तुमच्याशी जोडलेले आहेत तिथे त्यांना रिव्ह्यू द्यायला प्रवृत्त करा. जे चांगले अभिप्राय देतील त्यांना प्रसिद्धी द्या आणि ज्यांना तुमच्या सेवेचा वाईट अनुभव येईल किंवा काही त्रुटी वाटतील त्यात सुधारणा करा.

अशा नाखूष ग्राहकांशी संवाद साधा. त्यांच्या तक्रारी सोडवा आणि त्यांच्या निगेटिव्ह रिव्ह्यूला पॉसिटीव्हमध्ये परावर्तित करा. एक गोष्ट लक्षात घ्या कोणताही नवीन ग्राहक हा आधीच्या ग्राहकांचे रिव्ह्यू बघूनच तुमच्याशी व्यवहार करतात.

Promotional Video to grow business

४. व्हिडिओ मार्केटिंग करा

“जो दिखता है, वही बिकता है”, ही जुनी म्हण आज खऱ्या अर्थाने मार्केटिंगमध्ये उपयोगात आणली पाहिजे. युट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुकवर व्हिडिओ किंवा रिल्स बनवून तुमच्या उत्पादनांची किंवा सेवांची माहिती द्या.

हे व्हिडीओ कल्पक असावेत. शंभरात एखादा जरी तुमचा व्हिडिओ किंवा रिल व्हायरल झाली तर तुम्ही आणि तुमचा बिझनेस रातोरात जगप्रसिद्ध झालेच म्हणून समजा.

Table of Contents

Author

  • shailesh rajput

    हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण घेऊन २००७ साली पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार, असा विचार करून यावर उपाय म्हणून २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

    View all posts

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा