मोठमोठ्या कंपन्यांना आता ते आणि त्यांचे ग्राहक याच्या मध्ये कोणीही नको आहे. म्हणजे स्टॉकिस्ट, एजंट, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर इत्यादी. आपल्या ग्राहकांशी त्यांना थेट संवाद साधायचा आहे. स्टॉकिस्ट, एजंट, डिस्ट्रीब्युटर्स, होलसेलर आणि रिटेलर; जो नफा कमवतात तो थेट ग्राहकांना मिळावा अशी त्यांची इच्छा आहे.
जगातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी हे स्वीकारले असून नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून आपला व्यवसाय करायला सुरुवात केली आहे. भारतातीलही मोठमोठ्या कंपन्यांनी हे सत्य स्वीकारलं आहे की भविष्यात त्यांची उत्पादने विकण्याचा एक चांगला पर्याय म्हणजे नेटवर्क मार्केटिंग आहे. अनेक कंपन्यांनी याचा वापर करायला सुरुवात केली आहे.
इतकेच नाही तर अनेक प्रसिद्ध कंपन्याही ही व्यवस्था स्वीकारण्यासाठी आपली तयारी करत आहेत. तर नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाचे भवितव्य नक्कीचं उज्ज्वल आहे. आजची नोकरी आणि व्यवसायाची परिस्थिती पाहता नेटवर्क मार्केटिंग हा चांगला पर्याय ठरू शकतो.
नेटवर्क मार्केटिंग करण्याची १० कारणे
१. कमी गुंतवणूक : हा व्यवसाय करण्यासाठी जास्त भांडवलाची गरज नाही. यासाठी तुम्हाला दुकान किंवा ऑफिस उघडण्याची गरज नसते. तुम्ही तुमच्या घरातून हा व्यवसाय करू शकता.
२. कोणत्याही अनुभवाची गरज नाही : इथे अनुभवाची कोणतीही अट नाही. कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते निवृत्त लोकांपर्यंत कोणीही हा व्यवसाय करू शकतो. कामगार ते मालक ज्यांना लिहिता वाचता येते असा प्रत्येक व्यक्ती हा व्यवसाय करू शकतो.
३. गरजेचं बेसिक ट्रेंनिग दिले जाते : तुमचा अपलाईन/ सिनियर तुम्हाला झूम मीटिंग, थ्री वे कॉल, ऑनलाईन वेबिनरच्या माध्यमातून ट्रेनिंग देतो. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही हा व्यवसाय करू शकता.
४. तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होते : या व्यवसायामुळे हळूहळू तुमचे संभाषण कौशल्य विकसित होते. तसेच तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. तुमचा माईंडसेट बदलतो. जे विद्यार्थी आहेत ते या कारणासाठी जॉईन होऊन आपल्यात सुधारणा करू शकतात, ज्या त्यांना भविष्यात त्यांच्या करिअरमध्ये उपयोगी ठरतील.
५. प्रसिद्धी आणि ओळख मिळते : जसजसं तुम्ही या व्यवसायामध्ये पुढे जात राहाल, तसतसं तुम्ही तुमची एक वेगळी ओळख निर्माण करू शकता. तसेच तुम्हला प्रसिद्धी मिळते. तुमचा आत्मसन्मान वाढतो.
६. तुम्हाला पॅसिव्ह इन्कम मिळतो : एका ठरावीक काळानंतर जेव्हा तुमची टीम तयार वाढते, तेव्हापासून तुम्हाला पॅसिव्ह इन्कम मिळतो. तिथून पुढे तुम्ही काही काम केलं नाही तरी तुम्हाला इन्कम येत राहते. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकता. तुमच्या आरोग्यावर लक्ष्य देऊ शकता.
७. आनुवंशिक इन्कम मिळतो : या व्यवसायाची एक चांगली गोष्ट म्हणजे जर तुमचं काही बरंवाईट झालं, तर तुमच्या नंतर तुमच्या घरचे तुमचा id वापरू शकतात. जो इन्कम तुम्हाला मिळायचा तो तसाच तुमच्या घरच्यांना मिळू शकतो.
तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.
🚀 अधिक माहिती८. कामगारांची गरज नसते : इथे तुम्हाला कामगार ठेवण्याची गरज नसते. त्यांना पगार देण्याची गरज नसते. जे लोक तुम्हाला जॉईन होतात, ते त्यांच्यासाठी, तुमच्यासाठी आणि कंपनीसाठी काम करत असतात आणि त्यांना पगार कंपनी देते.
९. कोणत्याही परवान्याची गरज नसते : इथे शॉप ऍक्ट किंवा ग्रामपंचायत, नगरपालिकेकडून कोणत्याही परवान्याची गरज नसते.
१० तुमची जीवनशैली बदलते : तुमचं आयुष्य बदलून जातं. तुमचा पेहराव, तुमचं घर, तुमची गाडी, तुमचं पूर्ण जीवन बदलून जातं. तुमची स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. ही नेटवर्क मार्केटिंगची कमाल आहे.
– ओंकार जगताप
मो. 7083186819
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

