1007 annual marketing

काही चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…

आजच्या सातत्याने बदलणार्‍या आर्थिक जगात, नोकरी ही व्यवसायापेक्षाही अनिश्चित झाली आहे. तुम्हाला केव्हा नोकरीचा राजीनामा द्यायला सांगतील याची शाश्‍वती नाही. बर्‍याचदा अगदी नोकरी सोडावी नाही लागली तरी नोकरीत काही अशी कामे करायला भाग पाडले जाते जे करण्याची तुमची इच्छा नसते अथवा मानसिकताही नसते.

अशा वेळेस स्वप्नातला जॉब मिळावा अशी आशा करणे म्हणजे मृगजळामागे धावण्यासारखेच आहे. आपल्यापैकी अनेकांना ह्या सत्याची जाणीव झाली आहे. अनेक तरुण नोकरीचा विचार सोडून उद्योगधंद्याला प्राधान्य देताना दिसतात.

वरवर पाहता स्वमालकीचा उद्योग हा फायदेशीर आणि अधिक फलदायी वाटतो खरा, पण याचा अर्थ असा मुळीच नाही की, तुम्ही जे काही कराल त्या सगळ्यात यशस्वीच व्हाल.

सर्वसामान्य माणसाप्रमाणे तुम्हीही छोट्या-मोठ्या चुका जरूर कराल आणि या चुकांचा भुर्दंडही तुम्हाला भरावा लागेल. अगदी चुकाप्रूफ उद्योग करता येणार नसला तरी अनुभवी उद्योजकांकडून शिकून अनेक चुका टाळता येण्यासारख्या नक्कीच आहेत.

असे लोक ज्यांनी परिश्रमातून, प्रयत्नांतून, चुका करून आणि त्या सुधारून उद्योग यशस्वीरीत्या उभे केलेत अशा लोकांचे अनुभव नवीन उद्योजकांना नक्कीच मार्गदर्शक ठरतात.

WhatsApp Channel Banner
सामान्यतः पुढील सात चुका बहुतेक नवीन उद्योजक करतात. पहा या चुकांबद्दल वाचताना डोक्यात घंटी वाजते का. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चुका कशा टाळता येतील ते शिकून घ्या आणि उद्योजक म्हणून यशस्वी होण्याचे तुमचे चान्सेस वाढवा.

१) सुस्पष्ट ध्येय आणि उद्दिष्ट नसणे

Setting goalउद्योजक म्हणून सर्वात मोठी घोडचूक जर काही असेल तर सुनिश्चित ध्येय नसणे. रीसर्च असा सांगते की, अनेक उद्योजक परिणामांचा विचार न करता उद्योगात उतरतात. त्यांना काय साध्य करायचे हे तर माहीत नसतेच, परिणामी कसे साध्य करायचे हेही कळत नसते.

नवोदित उद्योजक म्हणून तुम्हाला हे माहीत असणे फार गरजेचे आहे की, तुमच्या उद्योगाचे यश हे तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते.

सुरुवातीपासूनच तुमच्या उद्योगाने तुम्हाला काय साध्य करून दिले पाहिजे याचा आराखडा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. हा आराखडा तुमच्या डोक्यात असून चालणार नाही. तो कागदावर तपशीलवार मांडला पाहिजे.

जर तुम्हाला तुमच्या शहरातील सर्वात मोठी restaurant chain उभी करायची असेल तर बसून वेळ वाया घालवून चालणार नाही. कामाला लागावे लागेल. मेहनतीची पराकाष्ठा करून प्रथम तपशीलवार आराखडा मांडण्यासाठी लागणारी माहिती गोळा करावी लागेल. उद्योगाचा आराखडा मांडण्यासाठी पुढील काही महत्त्वाच्या बाबींचा समावेश करणे गरजेचे आहे.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती
  • अल्पावधी आणि दीर्घावधी ध्येय
  • तुमचे उत्पादन किंवा सेवा
  • ग्राहक वर्ग
  • उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कराव्या लागणार्‍या कृतीची सूची
  • कामगारांच्या जबाबदार्‍यांचा गोषवारा

२) आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष

Money barriersमराठीत म्हण आहे – ‘सगळ्या गोष्टींचे ढोंग करता येते, पण पैशाचे ढोंग करता येत नाही’. उद्योगासाठी लागणारे आर्थिक पाठबळ उपलब्धता करण्यात जर अपयश आले, तर एक गोष्ट नक्की की, तुमचा उद्योग टेक ऑफ करणारच नाही. तुमच्या उद्योगाच्या भरभराटीसाठी भांडवल उभे करणे तितकेच महत्त्वाचे आहे जितके जगण्यासाठी ऑक्सिजन.

उद्योग सुरू करण्याआधीच आर्थिक पाठबळ कुठून मिळेल याची तरतूद करणे गरजेचे आहे. तुमच्या स्वतःकडे जर भांडवल नसेल तर Financial पार्टनर शोधा. मित्रपरिवाराकडून मदत होते का ते पहा, पण भांडवलाच्या अभावात उद्योग सुरू करू नका.

आपण भांडवलाशिवाय व्यवसाय सुरू करून अतिशय यशस्वी झाल्याच्या प्रेरणा देणार्‍या कथा ऐकतो. त्या एक तर खोट्या असतात किंवा तुम्हाला अर्धवटच सांगितल्या जातात. फक्त प्रेरणादायी कथांच्या आहारी जाऊ नका. भांडवलाच्या तरतुदीच्या मागे लागा.

सुरुवातीला तुम्हाला बँका अथवा Financial Institution भांडवल देणार नाहीत. एखादा Angel गुंतवणूकदार पहा. अतिशय जास्त व्याजावर पैसे घेण्याऐवजी भागभांडवलाच्या आधारावर पैसे उभे करता येतात का ते पहा. एकदा का भांडवलाची तयारी झाली, की मग प्रत्येक खर्चाचे व्यवस्थित नियोजन करा.

इतर बेजबाबदार तरुणांप्रमाणे पैशाचा अपव्यय टाळा. महागडे चष्मे, मोटार गाड्या आणि मैत्रिणींवर व्यवसायातला पैसा उधळू नका. तुम्ही व्यवसायात नवीन असल्यामुळे तुम्हाला आधीच मोठ्या रकमा कशा हाताळायच्या हे माहीत नसते, त्यामुळे अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन घ्या. तुमचा उद्योग असला तरी पैसा उद्योगाचा आहे.

अगदी सुरुवातीपासूनच स्वतःला पगार द्या. वेळ पडली की, गल्ल्यात हात घालण्याची घाणेरडी सवय टाळा. तुमचा आणि उद्योगाचा पैसा वेगळा आहे हे सत्य नेहमी लक्षात असू द्या. मग पहा उद्योग कसा आपोआप तुमची आर्थिक भरभराट करतो ती.

३) सुपरमॅन असल्यासारखे वागणे

Confidenceहे खरे आहे की, बहुतेक नवोदित उद्योजक सर्व कामे स्वतःच कुणाची मदत न घेता करण्याचा प्रयत्न करतात. हे कोणत्याही उद्योगासाठी घातक ठरू शकते.

एक sustainable उद्योग उभा करणे हे खूप मोठ्ठे आव्हान आहे आणि हे एका माणसाचे काम नाही हे लक्षात असू द्या. त्यामुळे सर्व काही स्वतः करण्याचे टाळा आणि तज्ज्ञांची मदत घ्या.

स्वतःभोवती अनुभवी लोकांचे वर्तुळ निर्माण करा. कधीही मदत मागण्याची भीती व संकोच ठेवू नका. समविचारी लोकांबरोबर काम करण्याच्या संधी शोधा किंवा निर्माण करा.

जरी अनेकांकडून मदत आणि सल्ला मागत असलात तरी आंधळेपणाने कोणताही सल्ला पाळू नका. मिळालेल्या सल्ल्यावर विचार करा आणि मगच त्याचे अनुकरण करा. दुर्दैवाने उद्योगजगतात ईर्षा, चढाओढ अशा गोष्टींचाही समावेश आहे, त्यामुळे सदैव सतर्क राहाणेही गरजेचे आहे.

४) अति लोभ

उद्योग सुरू करण्यामागे खूप पैसे कमावून श्रीमंत होणे हा एकमेव हेतू असेल तर अपयशी होणे कधीच टाळता येणार नाही. उद्योगात अति लोभी होणे ही सर्वात मोठी घोडचूक ठरू शकते. लोभ तुमचा उद्योग उभा करण्याऐवजी तुम्हाला उद्ध्वस्त करू शकतो.

फक्त उद्योगातून किती पैसे उभे करायचे याच्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ग्राहकाला सर्वोत्तम सेवा कशी देता येईल, सहकार्‍यांना कसे प्रेरित करता येईल, चांगले सहकारी कसे जोडता येतील, चांगल्या गुंतवणुका कशा करता येतील यावर लक्ष केंद्रित केले तर अपेक्षित श्रीमंती अनुषंगाने तुमच्याकडे आकर्षित होईल. तात्पर्य, तुमचा व्यवसाय तुम्हाला सद्य:परिस्थितीत जे उत्पन्न देतोय त्यात समाधान माना आणि अति लोभ टाळा.

५) स्वतःच्या चुका न स्वीकारणे

चुका करणे एक बाब, तर त्या स्वीकारणे आणि सुधारणे दुसरी. मी चुकलो हे मान्य केल्याशिवाय त्या सुधारणे कधीच शक्य नाही. बहुतेक उद्योजक स्वतःच्या चुका मान्य करणे टाळतात. त्यांचा हा ठाम विश्वास असतो की, त्यांची मतप्रणाली, योजना आणि कार्यपद्धती सर्वोत्तम आहे आणि त्यावर कोणी बोट उचलता कामा नये.

एखाद्या महत्त्वाच्या सल्ल्याकडे किंवा कल्पनेकडे यामुळे दुर्लक्ष केले जाते आणि अपेक्षित सुधारणा आणि प्रगती होत नाही. अनेकदा स्वतःच्या चुकांचे खापर परिस्थितीवर अथवा इतर लोकांवर फोडले जाते. एकदा चुकांची जबाबदारी परिस्थितीवर टाकली, की स्वत:ला प्रश्न विचारायची गरज राहत नाही, पर्यायाने सिंहावलोकन (Introspection) होत नाही.

६) उतावळेपणा

आकडेवारीप्रमाणे दरवर्षी ६०% उद्योग उतावळ्या उद्योजकांमुळे बंद पडतात. उद्योग सुरू झाल्या झाल्या मोठ्या परिणामाची अपेक्षा उद्योगापासून ठेवली जाते. उतावळेपणा हा अतिशय घातक आजार आहे, जो उद्योगाला बाळसे धरण्याआधी आक्रमण करून संपवून टाकतो.

नवोदित उद्योजक म्हणून तुम्हाला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की, उद्योग रातोरात उभा राहत नाही. उद्योगात काही तत्त्वे लक्षात घेणे गरजेचे आहे Measurable Progress In Reasoanable Time. शेतकर्‍याप्रमाणे पेरल्यावर उगवण्याची वाट पाहावी लागते.

दरम्यानच्या काळात निगा राखावी लागते. तुम्ही कितीही ओरडलात – उगव, उगव तरी उगवायला जितका वेळ लागणार तितका लागणारच. उतावळेपणाने गरजेपेक्षा अधिक खत आणि केमिकल वापरले तर Sustainability कधीच साध्य होणार नाही.

७) ब्रँड न बनवणे

अनेक नवोदित उद्योजक काम पूर्ण करण्यावर जास्त भर देतात आणि स्वतःच्या उद्योगाची एक स्पष्ट ओळख निर्माण करण्याचे विसरतात. तुम्ही उद्योग सुरू केल्या केल्या बरेच लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे उद्योगाची ओळख निर्माण करणे गरजेचे आहे.

परिणामी तुमच्या संभावित ग्राहकांना स्पष्टपणे कळेल की, तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या. एक चांगला ब्रँड फक्त तुमची विश्वसनीयता वाढवत नाही, तर तुमच्या उद्योगाची तत्त्वप्रणाली ग्राहकांपर्यंत पोहोचवतो, ज्यामुळे तुम्ही ग्राहकाच्या लक्षात तर राहताच, पण ग्राहकदेखील तुमच्याशी व्यवहार करायला प्रेरित होतो.

– डॉ. संतोष कामेरकर
७३०३४४५४५४
(लेखक बिझनेस व लाइफ कोच आहेत)

Table of Contents

Author

  • santosh kamerkar 2

    डॉ. संतोष कामेरकर हे एक प्रतिथयश उद्योजक, प्रसिद्ध वक्ते व प्रशिक्षक आहेत. त्यांनी स्वतःला शून्यातून उभं करून आज करोडोंमध्ये पोहोचले आहेत. त्यांचा हा प्रवास अनेक नाउमेद तरुणांना प्रेरणा देणारा आहे. संपर्क : 7303445454

    View all posts

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा