1007 annual marketing

फायनान्शियल मॉडेलिंग भाग १ – संकल्पना

बर्‍याचदा अनेक लघुउद्योजक प्रत्यक्ष भेटून, कुठे तरी कार्यक्रमात किंवा एखाद्या भाषणानंतर प्रश्नोत्तरात ‘फायनान्शियल मॉडेलिंग’ या विषयावर प्रश्न विचारतात, पण एवढ्या कमी वेळात यावर उत्तर देणं निव्वळ अशक्य असतं. त्या प्रश्नाला अनुसरून थोडी फार उत्तरे दिली तरी या विषयाची व्याप्ती एवढी असते की त्याला तो वेळ नक्कीच पुरेसा नसतो.

उद्योजकांसाठी या विषयावर बरंच साहित्य उपलब्ध आहे. तसंच अनेक पुस्तकसुद्धा उपलब्ध आहेत, पण यातील फारसं मराठी भाषेत उपलब्ध नाही. त्यासाठीच हा लेखप्रपंच…

सुरुवातीला आपण एक सोपी, पण अतिशय महत्त्वाची व्याख्या बघणार आहोत. बरेच जण मला आवर्जून (आणि अभिमानाने!) सांगतात हे उद्योगातले अकाउंट्सचे आकडे आम्हाला कळत नाहीत, ते आमचा अकाउटंट बघतो. आजची ही व्याख्या वाचल्यावर मी तुम्हाला खात्री देतो आकड्यांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन शंभर टक्के बदलेल. अगदी गमतीत सांगायचं तर आकडे बघितले की आकडी येणं बंद होईल.

व्याख्या : अकाउंट्स म्हणजे उद्योगातील व्यवहारांचं पैशांत केलेलं रूपांतर आणि मांडणी. अकाउंट्स इज मॉनेटरी प्रेझेन्टेशन ऑफ बिझनेस ट्रान्झेक्शन्स.

मुळात उद्योजक उद्योग करतात म्हणजे काय तर अनेक व्यवहार करतात. त्यातल्या साधारण सगळ्याच व्यवहारांशी पैशांचा संबंध असतो. खरेदी-विक्री, पगार देणे, भाडे देणे, वीज बिल किंवा इतर खर्च करणे, उद्योगासाठी काही यंत्रसामग्री किंवा इतर स्थावर जंगम मालमत्ता घेणे, कर्ज घेणे, कर्ज फेडणे इत्यादी सर्व व्यवहार पैशांच्या म्हणजेच आकड्यांच्या स्वरूपात होतात.

याच आकड्यांची अकाउंट्सच्या नियमानुसार मांडणी करून ते जमा-खर्च, ताळेबंद (प्रॉफिट आणि लॉस आणि बॅलन्स शीट) या स्वरूपात मांडले जातात. ज्या उद्योजकांनी हे व्यवहार केलेले असतात, ज्यांना यातले व्यवहार (त्यात घडलेल्या घटनांसकट) अक्षरश: पाठ असतात आणि हेच उद्योजक म्हणतात की हे अकाउंट्सचे आकडे आम्हाला कळत नाहीत, ते आमचा अकाउंटंट बघतो. तेव्हा आम्हीच थोडे गोंधळून जातो, पण हे सत्य असतं.

WhatsApp Channel Banner

Financial Management

फायनान्शियल मॉडेलिंग म्हणजे काय?

आपल्या सगळ्यांना बजेट किंवा बजेटिंग हा विषय माहीत आहे. पुढील वर्षात व्यवसायाचं उत्पन्न कसं येईल आणि त्यासाठी काय काय खर्च होतील याचं अंदाजपत्रक मांडणं म्हणजे बजेटिंग. पण बजेटिंग हे बर्‍याचदा सुरू असलेल्या व्यवसायाविषयी असतं.

‘फायनान्शियल मॉडेलिंग’ हा विषय बर्‍याचदा नवीन सुरू केलेल्या उद्योगांसाठी किंवा उद्योगात नवीन सुरू करायचा असलेल्या विभागासाठी किंवा एखाद्या नवीन योजनेचं विश्‍लेेषण करण्यासाठी वापरला जातो. सध्याच्या प्रचलित भाषेत सांगायचं झालं स्टार्टअप किंवा बिझनेस एक्सपान्शनचं अ‍ॅनालिसिस करण्यासाठी ‘फायनान्शियल मॉडेलिंग’ वापरलं जातं.

बजेटिंग आणि फायनान्शियल मॉडेलिंगमध्ये मूळ फरक असा की बजेटिंगमध्ये उद्योगात सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर आधारीत पुढील वर्षाचे आर्थिक गणित मांडलेलं असतं. फायनान्शियल मॉडेलिंग आणि बजेटिंगमध्ये इथे मूलभूत फरक असतो.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

बजेटिंगमध्ये उद्योगात आजपर्यंत झालेल्या घडामोडींचा अभ्यास करून त्यातून निष्कर्ष काढले जातात, त्यावर आधारीत पुढील बजेट मांडलं जातं; अर्थात त्यात लहान-मोठे नवीन योजनांचे आराखडे लक्षात घेतले जातात.

फायनान्शियल मॉडेलिंगमध्ये मात्र एखादा संपूर्ण नवीन उद्योग, सुरू असलेल्या व्यवसायातील एखादा संपूर्ण नवीन विभाग किंवा सध्या सुरू असलेल्या व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार यासाठी वापर केला जातो. यामध्ये बर्‍याच नवीन गोष्टी कराव्या लागतात.

आता पुन्हा वळूया आकड्यांकडे. आकडे वाचताना त्या आकड्यांच्या मागचा व्यवहार वाचायचा प्रयत्न करा. उद्योगातील आकडे हे होणार्‍या व्यवहारांचा परिणाम (आउटकम ऑफ बिझनेस ट्रान्झेक्शन्स) असतात. उद्योगातील प्रत्येक आकड्याचं मूळ = वस्तू / सेवेची किंमत. त्यामुळेच उद्योगातील प्रत्येक आकडा या पद्धतीने वाचता येऊ शकतो. आपण काही उदाहरणे पाहू.

एखादी वस्तू विकली किंवा सेवा दिली तर त्याची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये सेल्स म्हणून होते. अशा समजा आपण चार वेगवेगळ्या वस्तू विकत आहोत. अ, ब, क आणि ड. या चारही वस्तूंची किंमत आणि होणारी त्यांची विक्री संख्या यांच्या गुणाकारातून आपल्याला एकूण सेल्सचा आकडा मिळतो.

तो समजा एक करोड आहे. तर आपण असं म्हणू शकतो की या वर्षी माझा सेल एक कोटी पार झाला, पण जेव्हा आपण याचा अ‍ॅनेलिसिस करू तेव्हा कळेल की अ, ब, क आणि ड यापैकी सगळ्यात जास्त विकली गेलेली आणि सगळ्यात कमी विकली गेलेली वस्तू कोणती आहे. त्यानुसार व्यवसायातील पुढील निर्णय घेता येऊ शकतात.

या वर्षी माझा सेल एक कोटी झाला. पुढच्या वर्षी तो दुप्पट म्हणजे दोन कोटी होईल, असं जर लक्ष्य ठरवलं जात असेल तर ते पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. माझा एक मित्र त्याला ‘इमोशनल टारगेट’ असं म्हणायचा. उद्योगातील प्रत्येक आकडा याप्रमाणे अभ्यासला जाऊ शकतो.

आमचे सर सांगायचे आकडे तुमच्याशी बोलले पाहिजेत, मग बिझनेससुद्धा तुमच्याशी आपोआप बोलायला लागेल. लक्षात घ्या आकड्यांना स्वत:च अस्तिस्त्व नाही. ते वस्तू किंवा सेवेची किंमत यातून निर्माण होतात. मग ते विक्री किंवा उत्पन्न याबाबत असो किंवा उद्योगात होणार्‍या खर्चाबाबत, नियम बदलत नाही.

smart udyojak economics finance

फायनान्शियल मॉडेलिंगमधील मूलभूत गोष्टी

आपण आधी ‘इन्वेस्टपेडिया’ने दिलेली फायनान्शियल मॉडेलिंगची व्याख्या बघूया :

“Financial modeling is the process of creating a summary of a company’s expenses and earnings in the form of a spreadsheet that can be used to calculate the impact of a future event or decision.”

याचा मराठीतील स्वैर अनुवाद – उद्योगाच्या भविष्यातील निर्णयाचा किंवा घडामोडींचा उद्योगाच्या उत्पन्न आणि खर्चावर (आणि अर्थात नफ्यावर) होणार्‍या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी आकडेवारीचा सारांश मांडण्याची प्रक्रिया म्हणजे फायनान्शियल मॉडेलिंग.

याचं थोडक्यात विश्‍लेषण केलं तर दोन महत्त्वाचे पैलू आहेत. Financial modeling is a numerical representation of some or all aspects of a company’s operations.

Financial models are used to estimate the valuation of a business or to compare companies to their industry competitors or assess a new segment addition or business expansion.

(कंपनीचे व्हॅल्युएशन करण्यासाठी, स्पर्धकांशी व्यवसायाचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी, नवीन विभाग सुरू करण्यासाठी आणि उद्योगवृद्धीचा अभ्यास करणे यासाठी फायनान्शियल मॉडेल मुख्यत: बनवले जाते.)

हे झालं मोठ्या उद्योगांसाठी, पण सूक्ष्म आणि लघुउद्योगांनी हे केलं पाहिजे का? याच उत्तर आहे – अर्थात हो, हो आणि हो! अगदी व्यवसायाचे मुल्यांकन किंवा स्पर्धकांचा अभ्यास करण्यासाठी नसेल, पण स्वत:च्या उद्योगाची दिशा ठरवण्यासाठी याचा नक्कीच उपयोग केला जाऊ शकतो. आपण आता याच्या कार्यप्रणालीविषयी जाणून घेऊ.

पहिली पायरी : व्यवसायाची दिशा ठरवणे

व्यवसायाची दिशा म्हणजे सोप्या भाषेत नक्की साध्य काय करायचं आहे ते ठरवणे. व्यवसायाचे मुल्यांकन वाढवायचे आहे, मार्केट शेअर वाढवायचा आहे, आहे ती संसाधने वापरून आहे त्या व्यवसायात जास्त नफा कमवायचा आहे, नवीन सेगमेंट सुरू करायचं आहे किंवा अगदी आहे तो टर्नओवर वाढवायचा आहे. या सगळ्या गोष्टींसाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात.

1. सध्या असलेल्या संसाधनांचा अभ्यास करणे.
2. सध्या असलेल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसचा अभ्यास करणे आणि त्याच दृष्टीने मार्केटचा अभ्यास करणे.
3. लक्ष्य साध्य करण्यासाठी गरज असणार्‍या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे, त्याचे अनुमान करणे आणि अर्थात त्याची कागदावर मांडणी करणे.

अर्थात हे पूर्ण झाल्यावर हे सर्व काही आकड्यांमध्ये रूपांतरित करणे आणि त्याची वैधता तपासून घेणे.

या प्रक्रियेमध्ये फक्त तीनच पायर्‍या दिसत असल्या तरी प्रत्येक ठिकाणी भरपूर अभ्यास करावा लागतो. मला बरेचदा विचारलं जातं की हे सगळं आकडे-आकडे करत असता. खरंच काही उपयोग आहे का त्याचा? आकडे तर कसेही बनवता येतात.

यावर माझ उत्तर असं आहे, हे सगळं मॉडेल आकड्यांमध्ये मांडण्याची मुख्य कारणे आकडे बोलतात आणि आकडे खोटं बोलत नाहीत. त्यामुळे एखादं अनुमान चुकीचं असेल, अतिशयोक्त असेल किंवा अगदी खोटं असेल तर त्याच्याशी संबंधित सगळे आकडे ते ओरडून ओरडून सांगतात. अर्थात ज्याला वाचता येत त्यालाच हे कळतं आणि उद्योजकाला ते आकड्यांच म्हणणं वाचता यावं हीच माझी माफक अपेक्षा आहे.

‘फायनान्शियल मॉडेलिंग भाग २’ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Table of Contents

Author

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा