1007 annual marketing

आपल्या योग्य ग्राहकांना टार्गेट कसे करायचे?

एखादं उत्पादन योग्य लोकांपर्यंत पोहचलं तरच त्याची जास्तीत जास्त विक्री होऊ शकते. मग या योग्य लोकांपर्यंत आपलं उत्पादन नेमकं पोहचवायच कसं?

हे दोन गोष्टींमार्फत होऊ शकतं –

१. आपले ग्राहक नेमके कोण आहेत हे जाणून घेणे.
२. ग्राहकांसारखा विचार करणे.

आपले ग्राहक नेमके कोण हे ओळखण्यासाठी काय करावे हे पाहूया.

पहिली पायरी : आपले ग्राहक कोण आहेत?

WhatsApp Channel Banner

सर्वात आधी आपले संभाव्य ग्राहक नेमके कोण आहेत याचा विचार करूया. ते कोणत्या वयाचे आहेत, महिला आहेत का पुरुष आहेत, कोणती भाषा वापरतात अशा जितक्या सुचतील तितक्या गोष्टींचा विचार करावा व ते लिहून काढावे.

दुसरी पायरी : आपले ग्राहक कुठे आहेत?

आपले ग्राहक कोण आहेत हे समजल्यावर ते कुठे आहेत याचा विचार करावा. मुंबईत रहातात का पुण्यात, नाशिक का नागपूरला राहतात, महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही राहतात का याचा विचार करून ते लिहून काढावे.

Finding customer

तिसरी पायरी : आपले ग्राहक काय करतात?

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

ते कुठे आहेत हे आपल्याला माहीत झाल्यावर ते विद्यार्थी आहेत का कर्मचारी आहेत का उद्योजक आहेत की गृहिणी आहेत का निवृत्त झालेले आहेत हे पहावे. यातील दोन किंवा तीन किंवा सगळे गटसुद्धा आपले ग्राहक असू शकतात. उदा. पार्लेजी बिस्कीट हे सगळेच लोक खातात.

चौथी पायरी : आपले ग्राहक होण्यासाठी त्यांची क्रयशक्ती काय हवी?

आपलं उत्पादन कोणत्या प्रकारचं आहे यानुसार ते विकत घेण्यासाठी आपल्या ग्राहकाने किती पैसे कमवणं गरजेचं आहे हे काढावे.

उदा. आपण जर ब्रॅण्डेड कपडे विकत असू तर आपल्या ग्राहकांची मासिक कमाई किती असावी, ज्यातून ते आपल्याकडून कपडे घेऊ शकतील, आपण गाडी विकत असू तर दर वर्षाला आपल्या संभाव्य ग्राहकाने किती कमवायला हवेत ज्याने ते पूर्ण पेमेंट किंवा ई.एम.आय. भरू शकतील, इत्यादी.

पाचवी पायरी : त्यांना कशात रस असू शकतो?

वरील चार गोष्टी लिहून काढल्यावर त्यांचा एकत्रित अभ्यास केला तर आपल्याला समजेल की आपल्या संभाव्य ग्राहकांना साधारणपणे कोणत्या गोष्टींत रस आहे. या गोष्टींची एक यादी बनवावी.

आपले ग्राहक नेमके कोण आहेत हे आपण आता जाणतो. त्यांच्या परिस्थितीनुसार ते कसे वागतील याचाही आपण अंदाज बांधला. आता त्यांना आणखी उत्तमरीत्या जाणण्यासाठी आपण जर ग्राहक असतो तर कसा विचार केला असता हे काढूया.Advertising 1

आपण जाहिराती कुठे कुठे बघतो?

आपण रोजच्या जीवनात जाहिराती कुठे बघतो याची एक यादी काढावी. वर्तमानपत्रात असेल, टीव्ही वर असेल किंवा आणखी अनेक ठिकाणी असेल. याने ग्राहक कोणती जाहिरात कशी व किती बघतात याचा आपल्याला अंदाज येईल.

एखादी जाहिरात पाहिल्यापासून प्रत्यक्ष ते उत्पादन खरेदी करेपर्यंत आपण काय काय करतो, किती वेळ घेतो याचाही बारकाईने विचार करावा.

या सर्वामुळे आपण ग्राहकांना उत्तमोत्तम समजून घेऊ शकू. आपली जाहिरात कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त योग्य लोकांपर्यंत पोहचेल व यामुळे आपला कन्व्हर्जन रेट अर्थात जितक्या लोकांपर्यंत जाहिरात पोहचली त्यातील किती लोकांनी खरेदी केली याचा आकडा वाढत जाईल.

– शैवाली बर्वे

Table of Contents

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

    View all posts

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा