📱 Smart Udyojak WhatsApp Channel
व्यवसाय, मार्केटिंग आणि उद्योजकतेविषयी उपयुक्त अपडेट्स मिळवा
आत्ताच Join करा

उद्योजकाने कोणती कामं करायची आणि कोणती नाही?

मी माझ्या ‘ट्रेनिंग आणि बिझनेस कोचिंग’ या प्रोफेशनमध्ये अनेक उद्योजकांना भेटतो आणि तुम्हाला हे सांगितलं, तर फारसं आश्‍चर्य वाटणार नाही, की त्यातले अनेक उद्योजक हे सर्वच कामं चक्क स्वतःच करत असतात; परंतु माझ्या दृष्टीने ही एक गंभीर गोष्ट आहे.

सर्वच कामं म्हणजे मालाची ऑर्डर तोच घेणार, मालही तोच पोचवणार, कलेक्शनही तोच करणार, बँकेत चेकही तोच भरणार, हिशोबही तोच लिहिणार इत्यादी. अशा अ‍ॅक्टिव्हिटींना त्याच्या गैरसमजुतींमुळे किंवा कुणाचं ऐकल्याने ते याला मल्टिटास्किंग असा गौरवास्पद चुकीचा समज करून घेतात.

वरून वीस वर्षांनीही अभिमानाने सांगतात, आमची कुठेही शाखा नाही. काही लोकांना तर ते सुपरमॅन असल्याचा भास होतो आणि होणारच. फरक एवढाच की, हा त्याच चौकटीत वीस वर्षे तेवढ्याच धंद्यात अडकलेला असतो. पुढे वाढ नाही, विस्तार नाही.

असं का? कारण एकच, सगळंच काम स्वतः करणं. नवीन धंद्याच्या सुरुवातीला काही दिवसांकरिता एखाद्या वेळेस ठीक आहे, परंतु फार काळ अपेक्षित नाही. ज्या कामासाठी माणसं मिळतात ती तुम्ही स्वतः करू नका. तुम्ही तेच करा, जे तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे फक्त अति महत्त्वाची कामं.

त्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट ठरवावी लागेल आणि ती म्हणजे, आजपासून कोणती कामं तुम्ही करणार आणि कोणती नाही, जी कामं तुम्हाला करायची नाहीत आणि करणं आवश्यक आहे, त्यासाठी माणसं नेमा. तरच तुमच्या ठरलेल्या मोठ्या आणि भव्य ध्येयात यशस्वी होणं शक्य आहे.

Smart Udyojak Business Ecosystem Popup

हे होऊ शकतं!

  • तुमची करायची कामं ठरल्याने, सगळी कामं वाटली जातील. एकट्यावरच कामाचा ताण जाणवणार नाही.
  • अशाने प्रत्येकाला नवीन काही शिकण्याची संधी मिळेल.
  • तुम्हाला नवीन, कार्यक्षम टीम मिळेल.
  • नेमक्या कामावर तुमचा फोकस राहील.
  • तुम्ही जास्त ‘रिझल्ट-ओरिएंटेड’ असाल.
  • तुमची कार्यक्षमता कित्येक पटीने वाढू शकते.
  • सध्याच्या मानाने जास्त फ्री टाइम तुम्हाला मिळू शकतो, त्याचा उपयोग तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी करू शकता.
  • न करायच्या कामाच्या यादीमुळे बर्‍याच ‘टाइम किलर अ‍ॅक्टिव्हिटी’ बंद होतील. तुम्ही फार ‘फोकस्ड’ राहता.
  • अशाने कामाचे परिणाम जास्त दिसून येतात. कामाची नेमकी दिशा ठरल्याने, त्याचा वेग आणि अचूकता जास्त असते.
  • अशाने तुमची ध्येयं जगण्यासाठी तुम्हाला लागणारा वेळ आणि तुमची गुंतवणूक ही इतरांच्या मानाने कमी असू शकते.

हे करून तर बघा!

  1. प्रथम तुम्ही करत असलेल्या व तुम्ही करणे आवश्यक, परंतु सध्या करत नसलेल्या कामांची यादी करा.
  2. नंतर कामांची विभागणी करा.
  3. तुम्ही करायची कामं ठरवा.
  4. तुमची सध्या करत असलेली, परंतु न करण्याच्या यादीत असलेली कामं योग्य माणसाला सुपूर्द करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा ताण येणार नाही.
  5. महत्त्वाची कामं स्वतःकडेच ठेवा.
  6. तशी माणसं सध्या तुमच्याकडे नसल्यास ती तयार करा किंवा नियुक्त करा.
  7. तुम्ही करत असलेली कामं हळूहळू दुसर्‍यावर सोपवा आणि नवीन जबाबदार्‍या स्वीकारा.
  8. तुम्हाला मिळालेला ‘एक्स्ट्रा फ्री टाइम’ तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी गुंतवा.
Table of Contents

Author

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा