Advertisement
उद्योगसंधी

छोट्याशा भांडवलातसुद्धा सुरू करता येतो मोठा व्यवसाय

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


नवीन उद्योगात येऊ इच्छिणार्‍यांना भांडवल हा सर्वात प्रथम भेडसावणारा प्रश्न असतो; परंतु ज्याच्याकडे व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नाही व कुटुंबात कोणीही यापूर्वी व्यवसाय केला नाही, त्याच्यासाठी अल्प भांडवली इंडस्ट्री खूप महत्त्वाची आहे याबद्दल त्यांनी जाणून घेणे खूप फायद्याचे आहे.

अल्प भांडवली उद्योग हे काही हजारात फार तर एक लाखांपर्यंतच्या भांडवलात सुरू होतात. अशा उद्योगांना फॅक्टरी, ऑफिस, दुकाने, वाहने, मशीनरी असे कोणतेही खर्चीक व मोठ्या भांडवलाच्या बाबी लागत नाहीत.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

ह्या मुख्यत्वे करून उद्योग करण्याचे वैयक्तिक कौशल्य, ज्ञान, मेहनत, सातत्य, वेळ इत्यादी फार महत्त्वाचे असते; त्यामुळे अत्यंत कमी भांडवलात व वैयक्तिक मेहनतीच्या जोरावर हा उद्योग सुरू होतो व पुढे वाढत जातो व असेच लहान उद्योजक पुढे करोडपती होतात. अशी लाखो उदाहरणे जगभरात आहेत.

हा आता भांडवली उद्योग अनेक क्षेत्रांत कसा येतो, आपली आवड, परिचय ज्या प्रॉडक्ट किंवा सेवेचे मार्केट पोटेन्शियल, स्पर्धा इत्यादीचा अभ्यास करून हा व्यवसाय निवडायचा असतो. या व्यवसायाची तीन हजारांहून अधिक क्षेत्रे असून काही प्रमुख मी देत आहे.

आरोग्य : या क्षेत्रात आरोग्यविषयक वेबसाइट, पोर्टल्स, मोबाइल अ‍ॅप, सॉफ्टवेअर, ऑनलाइन कन्सल्टेशन, योगा फिटनेस, सेवा क्लासेस, पुस्तके, सीडी, डीव्हीडी कन्सल्टन्सी, डीलरशिप इत्यादी येते.

खाद्य : या क्षेत्रात खाद्यासंबंधी वेबसाइट, पोर्टल्स, मोबाइल अ‍ॅप, डायर कन्सल्टेशन, ऑनलाइन फूड, एक्सपोर्ट, इव्हेंट पार्टी, क्लासेस, खाद्य उत्पादने इत्यादींचा समावेश होतो.

शिक्षण : या क्षेत्रात शिक्षणविषयक पोर्टल्स, मोबाइल अ‍ॅप, ऑनलाइन एज्युकेशन, करिअर सल्ला क्लासेस, होम टुशन्स, पब्लिकेशन, पुस्तके, सीडी, डीव्हीडी, अर्निंग, फ्रंचायजी इत्यादी येते.

इंजिनीअरिंग इंडस्ट्री : यात मोठ्या कंपन्यांची खूप उत्पादने, स्पेअर पार्ट्स पुरवणे, मोठ्या मशीनचा मेंटेन्स व दुरुस्ती, मशीन खरेदी-विक्री सल्ला, सेवा, जुन्या मशीन विक्री व खरेदी, दुरुस्ती इत्यादी.

सल्ला : यात अनेक क्षेत्रांतील सल्लामसलतीचा व्यवसाय येतो. त्यात आरोग्य, कायदा, शिक्षण, आयएसओ, नोकरभरती, वैयक्तिक विकास, मॅनेजमेंट इत्यादी शेकडो क्षेत्रे येतात.

सौंदर्य : यात सौंदर्यविषयक माहिती देणारे पोर्टल्स, अ‍ॅप, उत्पादन, विक्री, सेवा पुस्तके, इव्हेंट, टॅटू, मेहंदी, ब्रायडल मेकअप इत्यादी.

शेती : यात वेबसाइट अ‍ॅप, ऑरगॅनिक आर्मिंग, शेती सल्ला, खरेदी-विक्री, ई-कॉमर्स, भाजीपाला, फळे इतर खाद्य उत्पादनात खरेदी-विक्री इत्यादीचा व्यवसाय येतो.

ऑनलाइन : यात सर्व प्रकारचे ऑनलाइन व कॉम्प्युटर घरबसल्या करण्यासारखे व्यवसाय येतात, त्यात ई-कॉमर्स, अ‍ॅडपोस्टिंग, पोर्टल्, ब्लॉग, मोबाइल अ‍ॅप, सॉफ्टवेअर ग्राफिक्स इत्यादी येते.

लाखापर्यंत भांडवल – बिझनेस आयडिया

मला हजारो तरुण संपर्क साधतात व पहिला प्रश्न विचारतात, उद्योगाला भांडवल किती लागेल? खरे म्हणजे उद्योजक होण्यासाठी सर्वात मोठे भांडवल म्हणजे जिद्द, जिगर, गरज, आयडिया, गरिबीबद्दल प्रचंड चीड, उच्च ध्येय, दूरदृष्टी. येथे कोठेही तुमच्याकडे किती भांडवल आहे याचा प्रश्न येत नाही.

सिंधी लोक फाळणीनंतर आले. त्यांच्याकडे काय भांडवल होते? पारसी व इराणी लोक भारतात आले. त्यांच्याकडे भांडवल होते? व्ही. एस.एस. मनीनी जस्ट डायल ही कंपनी केवळ ५० हजार भांडवलात सुरू केली, तीच आज ५ हजार कोटींची आहे, धीरूभाई अंबानीचे भांडवल म्हणजे थोडेसे पैसे व एका टेबलाएवढी मुंबईत जागा. बन्सल बंधूंनी फ्लिपकार्ट केवळ १० हजार रुपयांत सुरू केले, ती आज २० हजार कोटींहून अधिक मोठी आहे.

केवळ अडीच लाखांत सुरू झालेली अलिबाबा ही चायनीज कंपनी आज ५० बिलियन डॉलरची जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे. येत्या वर्षात ती फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांना टक्कर देण्यासाठी भारतात येत आहे.

तेव्हा मित्रहो हे तुम्ही समजून घ्या की, सुरुवातीला कोणत्याही उद्योगामध्ये लाखापेक्षा जास्त भांडवल नसते, फक्त दिशा योग्य असावी लागते, योग्य मार्गदर्शन असावे लागते, वेळ अजिबात वाया न घालवता कामाला लागावे लागते.

पदवी घेण्यातच आयुष्यातली पाच-सात वर्षे घालवू नका व त्यासाठी काही लाख खर्च करू नका, तेच पैसे उद्योग सुरू करण्यात लावा व करोडपती व्हा.

संशोधन करून केवळ एक लाखाच्या आसपास होतील अशा शेकडो उद्योगाच्या आयडिया शोधून काढल्या आहेत. त्यात इंजिनीअरिंग, मेडिकल, कॉमर्स, सायन्स, कॉम्प्यूटर्स, अ‍ॅग्रीकल्चर, एम. बी. ए. लॉ, फॅशन डिझायनिंग अशा विविध प्रकारच्या पदव्या व शिक्षण घेतलेल्या तरुणाकरिता, एवढेच नव्हे तर घरबसल्या महिला, व्हीआरएस व रिटायर्ड व्यक्ती, नोकरीवर असणारे शासकीय-खासगी कर्मचारीही हा एक लाखापर्यंतचा व्यवसाय करू शकतात.

हे व्यवसाय पूर्णवेळ करण्यासारखेही आहेत, काही व्यवसाय घरबसल्या करण्यासारखे आहेत, काही व्यवसाय तुमची सध्याची नोकरी सांभाळतही करू शकतो. नोकरी मिळण्याची शक्यता नसणार्‍या तरुणासाठीही बर्‍याच आयडिया आहेत, त्यात तंत्रज्ञान व कौशल्यावर आधारित तसेच तंत्रज्ञान व कौशल्य न येणार्‍यांनाही व्यवसाय करता येईल अशाही बर्‍याच आयडिया आहेत.

खेड्यात, शहरात करणार्‍यांसाठीही आयडिया आहेत; पण व्यवसाय करू इच्छिणारा माणूस चाणाक्ष, हुशार, कष्टाळू असावा. व्यवसाय म्हणजे बँकेत एफडी ठेवल्यासारखे नसते. तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष देऊन काम करावे लागते व फायदा वाढवत नेऊन करोडपती होण्याकडे वाटचाल करायची असते.

– प्रा. प्रकाश भोसले


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!