Advertisement


Business Consultancy and Hand-holding for MICRO Businesses

व्यावसायिक मार्गदर्शन व सहकार्य


पहिल्या पिढीतील उद्योजक हा अनेकदा एकटा असतो. त्याला मार्गदर्शनाचीच नाही तर प्रत्यक्ष सहकार्याचीही गरज असते, पण अनेकदा ही मदत मिळत नाही. नवोदित उद्योजकांना अशा प्रकारचे सहकार्य मिळण्यासाठीची इको-सिस्टमच आपल्याकडे विकसित झालेली नाहीय.

गेली सहा वर्षे स्मार्ट उद्योजक ही एक माध्यमसंस्था म्हणून काम करत असताना ही बाब आम्हाला प्रकर्षाने जाणवली. आता कोरोनाचे संकट आणि येऊ घातलेली भीषण महामंदी यात तर उद्योजकासमोर अडचणी अनेक पटींनी वाढणार आहेत. म्हणून आम्ही लघुउद्योजकाला मार्गदर्शन तसेच प्रत्यक्ष सहकार्य करता यावे यासाठी व्यक्तिगत मार्गदर्शन तसेच सहकार्य करण्यासाठी ही कन्सल्टन्सी सुरू करत आहोत.

मोठ्या उद्योजकांसाठी अशा अनेक कन्सल्टन्सी व तज्ज्ञ सल्लागार आहेत, मात्र छोट्यातील छोट्या किंवा नवोदित उद्योजकाला त्याच्या आर्थिक मर्यादांमुळे ही सेवा पुरवणारे कोणीही नाहीत, ही बाब लक्षात घेऊन आम्ही फक्त सूक्ष्म, नवोदित, होतकरू उद्योजकांनाच ही कन्सल्टन्सी देणार आहोत. यामध्ये फक्त सल्ले दिले जाणार नाहीत, तर उद्योजकासोबत चर्चा करून त्याच्या विकासाची योजना तयार केली जाणार आहे व ही योजना प्रत्यक्षात राबवण्यात त्याला यथाशक्ती सहकार्य केलं जाणार आहे.

व्यवसाय वाढावा, आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी ग्राहक आणि विक्री वाढणे आवश्यक आहे. म्हणून आम्ही तुमच्या व्यवसायवाढीवरच अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत. थोडक्यात व्यवसायवाढ हे आमचे प्रमुख काम असेल.

कामाची प्रक्रिया

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये कोणतीही प्रक्रिया निश्चित आराखड्यात ठरलेली नसेल, तर उद्योजकाशी बोलून त्याच्या गरजेप्रमाणे नियोजन केले जाईल व त्याच्या पूर्ततेसाठी त्याला सहकार्य केले जाईल. यात कर्ज मिळवण्यापासून ते माणसं संभाळण्यापर्यंत; आर्थिक नियोजनापासून ते उत्पादन वाढवण्यापर्यंत कोणतेही विषय येऊ शकतात. थोडक्यात जिथे समस्या, तिथे उपचार.

‘स्मार्ट उद्योजक’चे संपादक शैलेश राजपूत हे स्वतः ही कन्सल्टन्सी देणार आहेत व संपूर्ण टीम स्मार्ट उद्योजक ही सहकार्यासाठी उपलब्ध असेल.

शुल्क व नोंदणी

मासिक ₹१,००० शुल्क असेल. सुरुवातीला तीन महिन्यांचे एकत्र शुल्क आकारले जाईल. चौथ्या महिन्यापासून दर महिन्याच्या सुरुवातीला मासिक शुल्क आकारले जाईल. वर्षभराच्या कालावधीसाठी ही कन्सल्टन्सी असेल.

नोंदणीसाठी संपर्क : ९७७३३०१२९२

error: Content is protected !!