या कर्णबधिर उद्योजकाने सुरू केला मूक व कर्णबधिरांसाठी व्यवसाय


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


कोल्हापूरच्या इचलकंजीमध्ये जन्माला आलेले वरुण बरगाले हे मूक व कर्णबधिर आहेत. स्वत: मूक व कर्णबधिर असल्यामुळे त्यांना हे व्यंग असलेल्यांच्या व्यथांची पुरेपूर जाणीव आहे आणि ते अशा लोकांसाठी काही भरीव कामगिरी करू ईच्छितात. म्हणून त्यांनी मूक व कर्णबधिर ‘Adorable White Collection’ या नावाने एक पांढर्‍या शर्ट्सचा व्यवसाय सुरू केला आहे.

वरुण बरगाले हे स्वत: व्यावसायिक कुटुंबातून आले आहेत. कुटुंबाचा पारंपारिक व्यवसाय सांभाळून वरुण यांनी मूक व कर्णबधिर लोकांसाठी स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. कॉटनचे उच्च प्रतीचे सफेद शर्ट, जे सामान्यपणे प्रत्येकालाच लागतात ते वरुण मूक व कर्णबधिरांकडून बनवून घेतात.

सामान्यपणे संवादातील गैरसोयीमुळे मूक व कर्णबधिर व्यक्तींना नोकरी मिळणे कठीण जाते. शिक्षण घेण्यातही अनेक अडचणी येतात. त्यामुळे सरकारी व आरक्षित नोकर्‍याही मिळत नाहीत. त्यामुळे वरुण यांनी सुरू केलेल्या व्यवसायामध्ये ते फक्त मूक व कर्णबधिर लोकांनाच रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

स्वत:च्या व्यंगावर मात करत वरुण बरगाले या तरुणाने आपल्यासारख्या अनेकांचे दु:खही वाटून घेतले आहे. वरुण यांनी लौकिकदृष्ट्या टेक्साइल इंजिनिअरींगमधून डिप्लोमा केलेला असून ते स्वत: मॉडेल म्हणून स्वत:च्या ब्रॅण्डचे प्रतिनिधीत्व करत आहेत.

वरुण यांनी सर्वांना आवाहन करतात की त्यांच्या कार्याला हातभार लावण्यासाठी त्यांचे शर्ट जरूर खरेदी करावेत आणि त्यांच्या या कार्याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत share करावी.

संपर्क : 9970851118


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?