फक्त स्मार्टफोनद्वारे कॉलेज विद्यार्थी सुरू करू शकतात हे ५ व्यवसाय


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


डॉ. अब्दुल कलाम शालेय वयात घरोघरी पेपर टाकायचे. अनेक कॉलेज विद्र्यार्थीं शिक्षणासोबत काही ना काही काम करून थोडे पैसे कमवू इच्छितात.

तुम्हीही जर असे कॉलेज विद्यार्थी असाल, जे स्वतःच्या शिक्षणासाठी थोडे पैसे कमवू इच्छिता तर तुमच्यासाठी फक्त स्मार्टफोनच्या माध्यमातून करता येतील असे ५ व्यवसाय इथे देत आहोत.

१. कन्टेन्ट निर्मिती : अनेक व्यवसाय आणि वेबसाइटना सतत दर्जेदार कन्टेन्टची आवश्यकता असते. तुम्ही लेखनात चांगले असल्यास अशांना मजकूर लेखन करून देऊ शकता. यासाठी तुम्ही आर्टीफिशल इंटेलिजन्सचीही मदत घेऊ शकता.

आजची तरुणाई ही शॉर्ट्स आणि रिल्स किंवा छोटे व्हिडिओ बनवण्यात हुशार आहे. अनेक व्यवसायांना त्यांच्या मार्केटिंगसाठी अशा छोट्या छोट्या व्हिडिओची गरज असते. तुमची कल्पकता व आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कमीत कमी वेळात असे व्हिडिओ बनवून तुम्ही हजारो रुपये कमवू शकता.

२. सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर : गेल्या दहा वर्षात सोशल मीडियाचा प्रसार झपाट्याने वाढला आहे. अनेक सामान्य, अतिसामान्य मंडळी याचा वापर करून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहेत.

तुम्हीही अशा अनेक इन्फ्ल्यून्सरना फॉलो करत असाल, त्यांचे रिल्स, व्हिडिओज रोज बघत असाल.

ही मंडळी ज्याप्रमाणे हे चालवतात, तसेच तुम्हीही चालवू शकता. यासाठी एका स्मार्टफोन व्यतिरिक्त कोणत्याही गुंतवणुकीची गरज नाही. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब असे कोणतेही सोशल मीडिया निवडून यावरून नियमित चांगला कंटेंट प्रसारीत करायला सुरुवात करा.

जसजसे तुमचे फॉलोवर्स वाढतील तुम्हाला यातून पैसे मिळायला सुरुवात होईल. तुमचे फॉलोवर्स आणि व्ह्यूज हीच तुमची संपत्ती आहे. यूट्यूब चॅनेलवर जाहिराती ऑन करून त्यातूनही चांगले उत्पन्न येऊ लागते. इथे तुम्ही डॉलर्समध्ये कमवता.

३. Canva डिझायनर व्हा : एकेकाळी ग्राफिक्स हे खूप स्पेसिफिक स्किल होतं. ग्राफिक डिझायनिंग करायला तुमच्याकडे काही विशेष सॉफ्टवेअर असण्याची आवश्यकता होती. हे सॉफ्टवेअर किमतीला महाग होते आणि शिकण्यासाठीही चांगलेच पैसे मोजावे लागायचे. पण आता Canva ही एक अशी वेबसाईट आणि ॲप आलं आहे, ज्यावरून तुम्ही अगदी सहज, बेसिक ज्ञानातून छान, आकर्षक डिझाईन बनवू शकता.

थोडे पैसे मोजून Canva ची प्रीमियम मेंबरशीप घेतली तर अनेक टूल्स आणि टेम्प्लेट उपलब्ध होतात, ज्याचा वापर करून अगदी सहज डिझाईन करू शकता.

लोगो, ब्रोशर, बॅनर, सोशल मीडिया डिझाईन, छोटे व्हिडिओ, क्लिप्स, ऍनिमेशन, ईबुक्स अशा किती तरी गोष्टी तुम्ही Canva वर तयार करून देऊ शकता. यातून तुम्हाला प्रत्येक कामाचे, प्रोजेक्टचे चांगले पैसे मिळतील.

४. सोशल मीडिया व्यवस्थापन : अनेक संस्था, कंपन्या, छोटे बिझनेस, एनजीओ इत्यादींना सोशल मीडियावर आपला प्रेसेन्स वाढवायचा असतो आणि त्यातून आपली वाढ करायची असते. पण ते त्यांना जमत नाही. सोशल मीडियावरील नवनवीन गोष्टी, पर्याय, ट्रेंड्स समजून घेणे यांना अनेकदा शक्य होत नाही.

आजची तरुणाई ही सोशल मीडियावर भयंकर ॲक्टिव असते. त्यांना यातले सर्व लेटेस्ट फिचर्स माहीत असतात. ते दररोज ते वापरत असतात.

तरुणांनी आपल्या पर्सनल सोशल मीडियासोबत अशी बिझनेस अकाउंट्ससुद्धा हॅण्डल करू शकतात आणि त्याचे मासिक पैसे आकारू शकतात. नेटाने केला तर कॉलेज विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला पार्ट टाइम व्यवसाय आहे.

५. व्हिडिओ ट्युशन्स : आजची तरुण पिढी ही नॉर्मल कॉलपेक्षा व्हिडिओ कॉल्सना प्राधान्य देते. याच व्हिडिओ कॉलवर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी दिली तर?

आपल्यापेक्षा लहान असलेल्या शाळा, कॉलेज विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्हिडिओ कॉलवर तुम्ही प्रशिक्षण देऊ शकता. मोठ्या शहरात ट्युशन आणि क्लासेसचे बरेच पर्याय उपलब्ध असतात, पण छोट्या शहरात आणि ग्रामीण भागात ही संख्या तेवढी जास्त नाहीय.

तुम्हाला अशा भागातले विद्यार्थी मिळू शकतात. त्यांचे विषय आणि महिन्याची फी नक्की तुम्ही त्यांना ऑनलाइन शिकवणी देऊ शकता. व्हिडीओ कॉल, गुगल मीट, झूम अशा पर्यायांचा यासाठी उपयोग करू शकता.

Author

  • शैलेश राजपूत

    शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

    व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?