📱 Smart Udyojak WhatsApp Channel
व्यवसाय, मार्केटिंग आणि उद्योजकतेविषयी उपयुक्त अपडेट्स मिळवा
आत्ताच Join करा

नाताळ व नवीन वर्षानिमित्त सुरू करू शकता हे पाच व्यवसाय

१. भेटवस्तू तयार करणे

नाताळात व नवीन वर्षात पदार्पण करताना लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. शिवाय विविध कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांनासुद्धा नवीन वर्षाचं गिफ्ट देतात. याला संधी मानून आपण भेटवस्तू बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकतो. यात भेटकार्ड बनविणे, कुणाला व किती कीमतीचं गिफ्ट द्यायचं आहे यावरून ऑर्डरनुसार कस्टमाइज्ड गिफ्ट पुरविणे अशा वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो.

२. चॉकलेट-केक बनवणे

dark chocolateनाताळ-नवीन वर्ष आता जवळपास सर्वच लोक केक कापून अथवा चॉकलेट वाटून करतात. त्यामुळे हीसुद्धा एक चांगली उद्योगसंधी आहे. कमीत कमी खर्चात घरच्या घरी केक व चॉकलेट्स बनवणे शिकलात की हा व्यवसाय सहज सुरू करू शकता. आज गूगल व यूट्यूब वरून हे अगदी मोफत शिकता येते.

३. इव्हेंट मॅनेजमेंट

Smart Udyojak Business Ecosystem Popup

नाताळ-नवीन वर्षाची पार्टी असो, डिसेंबर-जानेवारीत लग्नाचे मुहूर्त असो वा बोरनहाण किंवा चैत्रातले उत्सव असोत, या सर्वांसाठी गरजेचे असते इव्हेंट मॅनेजमेंट. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी डिसेंबर महिना नक्कीच सुगीचा काळ आहे.

४. विकेंड प्लॅनिंग

शहरीकरण व नोकरी यामुळे लोकांच्या जीवनात विकेंड अर्थात शनिवार-रविवारची सुट्टी खूप महत्त्वाची ठरते. त्यात या विकेंडला जोडून इतर एखादी सुट्टी आली की लगेच ते बाहेर कुठं तरी जायचा विचार करतात; परंतु दोन-तीन दिवसांत जाऊन येता येईल असे ठिकाण शोधणे मात्र त्यांना कठीण जाते. त्यामुळे दोन-तीन दिवसांत करू शकतील अशा विविध सहलींचे आयोजन आपण त्यांना करून दिले तर ती नक्कीच एक चांगली उद्योगसंधी ठरेल.

५. व्यायाम वर्ग

हे नाव वाचल्यावर तुम्हाला थोडे वेगळे वाटले असेल; पण विचार करा. बहुतांश लोक नवीन वर्षाचा संकल्प करताना या वर्षात बारीक/फिट होणार असा संकल्प करतात. अशा वेळी आपण आपल्या व्यायाम वर्गाची जाहिरात त्यांपर्यंत पोहोचवली तर नक्कीच आपल्याला बरेच ग्राहक मिळतील.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

लोकांच्या याच मानसिकतेला धरून मोठमोठ्या जिममध्ये नवीन वर्षाचे डिस्काऊंट असते. आपणही या संधीचे सोने करून आपला नवीन व्यवसाय सुरू करू शकतो.

नाताळ, नवीन वर्षाचा सिझन आपण सुट्टी म्हणून न पाहता नवीन उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठीचा उत्तम काळ मानला तर अशा अनेक उद्योगसंधी आपल्याला दिसतील व कमीत कमी गुंतवणुकीत आपण उद्योग सुरूही कराल.

Table of Contents

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

    View all posts

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा