स्वत: उत्पादक होणे

आपण आधीच्या लेखात दुसऱ्या उद्योजकांची उत्पादने विकून आपले उत्पन्न कसे मिळवावे ते पहिले. आता ती किंवा तशी उत्पादने तुम्ही बनवू शकत असाल व तुमची खाली सांगितल्याप्रमाणे तयारी असेल, तर तुम्ही स्वतः एकट्याने, कुटुंबासह किंवा भागीदारीत अशा व्यवसायाला सुरुवात करू शकता.

✅ अशा तऱ्हेच्या उत्पादन व्यवसायाला सुरुवात करताना खालील मुद्द्यांचा विचार करावा :

• तुमची आवड, ज्ञान, माहिती, अनुभव
• त्या उत्पादनासाठी ग्राहक, मागणी व त्यातील स्पर्धा
• जागा, भांडवल, यंत्रे, वीज, गॅस, मनुष्यबळाची आवश्यकता
• उत्पादन प्रक्रिया,
• त्यातील वस्तू, इंधन, मेहेनत, वाहतूक खर्च, भाडे वगैरेचा हिशोब
• सरकारी परवानग्या

• दर्जा, गुणवत्ता
• विक्री, वितरणाची व्यवस्था
• पुढील ३-६ महिन्याचे जमा-खर्च अंदाजपत्रक
• आर्थिक किंवा इतर भागीदाराची आवश्यकता
• मिळणारा नफा, परतावा

जमा-खर्चाचे अंदाजपत्रक बनवण्यात चूक झाली, तर नुकसान होऊ शकते म्हणून पूर्ण अभ्यास, गणित आणि हिशोब कागदावर बरोबर जमल्यावरच पुढे जावे. घरातील व्यक्ती आणि मित्र किंवा ह्या व्यवसायातील माहितगार चार्टर्ड अकाउंटंटशी बोलून तुम्ही तुमचा व्यवसाय आराखडा निश्चित करावा.

✅ खालील उदाहरणावरून आपल्याला कोणते उत्पादन हाती घ्यावे याच्या कल्पना सुचतील :

• रोजच्या जेवणाचे डबे
• टिकाऊ पदार्थ लाडू, चकली, चटणी, लोणचे असे पदार्थ
• चॉकलेट, केक
• छोटे कपडे शिवून बनवणे
• सणावारी लागणाऱ्या वस्तू

• बॅग, पर्सेस, सौंदर्य प्रसाधने, पिशव्या, पेपर बॅग
• फिनेल, सॅनिटायझर, साबण वगैरे रासायनिक उत्पादने
• उदबत्ती, परफ्यूम, अत्तरे वगैरे
• आयुर्वेदिक औषधे, पावडरी, टॉनिक वगैरे
• मुखवास, सुपारी, औषधी किंवा केसाची तेले
• कॉम्प्युटर टायपिंग, प्रिंटिंग, स्कॅनिंग

WhatsApp Channel Banner

✅ ह्या विषयावर बरीच माहिती, माहितीतील उद्योजक आणि इंटरनेटवर मिळू शकते. गरज आहे ती तुमच्या अढळ उद्दिष्टांची, सखोल अभ्यास, विश्लेषण, निर्णय क्षमता आणि कृतीची! विचार करा, कृती करा.

– सतीश रानडे

Table of Contents

Author

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Register your business on the Maharashtra Business Directory and get a FREE LIFETIME SUBSCRIPTION to Smart Udyojak B2B Connect
Click here to Register
error: Content is protected !!
Scroll to Top