
छत्री आणि रेनकोट विक्री हा पावसाळ्यातील कमी गुंतवणुकीचा आणि उच्च नफ्याचा व्यवसाय आहे. योग्य नियोजन, दर्जेदार उत्पादने, आणि प्रभावी मार्केटिंग यामुळे हा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. स्थानिक गरजा आणि ग्राहकांच्या पसंती लक्षात घेऊन तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रीचा समतोल साधून तुम्ही या हंगामी संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकता.
महाराष्ट्रात पावसाळा (जून ते सप्टेंबर) हा छत्री आणि रेनकोटच्या मागणीसाठी सर्वोत्तम काळ आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि औरंगाबाद यासारख्या शहरांमध्ये मुसळधार पाऊस आणि आर्द्रता यामुळे लोक टिकाऊ, स्टायलिश आणि परवडणाऱ्या छत्र्या आणि रेनकोट शोधतात.
शहरी आणि ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय कुटुंबे, विद्यार्थी आणि व्यावसायिक हे या व्यवसायाचे मुख्य लक्ष्य ग्राहक आहेत. पर्यावरणपूरक आणि फॅशनेबल उत्पादनांना सध्या मागणी वाढत आहे ज्यामुळे हा व्यवसाय आकर्षक बनतो. शहरी भागात स्टायलिश आणि फोल्डेबल छत्र्यांना मागणी जास्त असते, तर ग्रामीण भागात परवडणारे आणि टिकाऊ रेनकोट लोकप्रिय असतात.
छत्री व रेनकोट विक्री हा हंगामी व्यवसाय असल्यामुळे कमी वेळात नफा कमवून पुढील व्यवसाय करण्यासाठी मोकळं होता येतं. हा व्यवसाय करण्यासाठी गुंतवणूक ही कमी लागते. अवघ्या ₹२०,००० ते ₹५०,००० च्या गुंतवणुकीत हा व्यवसाय करता येतो. ऑफलाइन तसेच ऑनलाइन दोन्ही पद्धतीने तुम्ही हा व्यवसाय करू शकता. ऑनलाइन खरेदीच्या वाढत्या ट्रेंडमुळे ई-कॉमर्सद्वारे विक्रीची मोठी संधी उपलब्ध आहे.
विक्रीसाठी तुम्हाला मुंबई, पुणे इथल्या मोठ्या घाऊक बाजारपेठांतून छत्र्या व रेनकोटची खरेदी करावी लागेल. इंडियामार्ट, अलिबाबा अशा बी-२-बी पोर्टल्सवरूनसुद्धा घाऊक खरेदी करू शकता. तुम्ही पैसे देऊन खरेदी करताय म्हणून घाऊक विक्रेत्यांकडून कॅश डिस्काउंटसुद्धा मागू शकता.
एकत्र जेवढा जास्त माल खरेदी कराल तेवढे तुम्हाला पडेल. शिवाय अगदीच थोडाफार उरला तरी तो नीट जपून ठेवला तर पुढच्या वर्षी विकू शकता. एक लक्षात घ्या चांगला माल घ्याल तरच लोकं तुमच्याकडून कायम खरेदी करणार. त्यामुळे मालाची खात्री करूनच मग घाऊक खरेदी करा.
विक्रीसाठी एखादं छोटं दुकान, ठेला, बाकडा किंवा अगदी घरातूनसुद्धा करू शकता. ऑनलाइन विकू इच्छित असाल तर स्वतःची वेबसाइट तयार करून त्यावरून विकू शकता. यासाठी डोमेन, होस्टिंग आणि वेबसाइट डेव्हलपमेंट याचा खर्च ₹५,००० ते ₹२०,००० पर्यंत येऊ शकतो. अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो अशा मार्केटप्लेसेसवर विकणार असाल तर त्यावर सेलर म्हणून स्वतःला नोंदवावं लागेल. त्यानंतर प्रॉडक्ट लिस्ट करून विकू शकता.
सर्वात सोपा आणि शून्य खर्चिक पर्याय म्हणजे सोशल मीडिया जसे की इंस्टाग्राम, फेसबुक यावर प्रॉडक्ट्सचे फोटो व माहिती, किंमत इत्यादी पोस्ट करून त्यात खरेदी करण्यासाठी तुम्हाला संपर्क करण्याचे डिटेल्स देऊ शकता. WhatsApp बिझनेसवर प्रॉडक्ट कॅटलॉग तयार करून त्याद्वारेही तुमच्या छत्र्या आणि रेनकोट विकू शकता.
मार्केटिंग : मार्केटिंग साठी इंस्टाग्राम, फेसबुक आणि WhatsApp चा भरपूर उपयोग करा. स्थानिक ग्रुप्समध्ये पोस्टिंग करा. शक्य असल्यास तुमच्या बजेटनुसार पेड कॅम्पेन जरूर करा. “२ खरेदी केल्यावर १ फ्री” किंवा “विद्यार्थ्यांसाठी १०% डिस्काउंट” अशा वेगवेगळ्या ऑफर्स तयार करून त्याची मार्केटिंग करा.
तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.
🚀 अधिक माहिती
सुरुवातीची गुंतवणूक : (अंदाजे खर्च)
- उत्पादन खरेदी : ₹२०,००० – ₹५०,०००
- दुकान / स्टॉल भाडे : ₹५ ,००० ते ₹२०,००० प्रति महिना (शहर आणि स्थानानुसार)
- मार्केटिंग : ₹५ ,००० ते ₹२०,००० (सोशल मीडिया जाहिराती, फ्लायर्स, बॅनर्स).
- वेबसाइट / ऑनलाइन सेटअप : ₹५ ,००० ते ₹२०,००० (वेबसाइट डेव्हलपमेंट किंवा ई-कॉमर्स फी)
- इतर खर्च : ₹५ ,००० ते ₹१०,००० (पॅकेजिंग, वाहतूक, परवाना इत्यादी).
नफा (अंदाजे) :
- छत्री : खरेदी किंमत ₹१०० – ₹२००, विक्री किंमत ₹२०० ते ₹७०० (५० ते २०० टक्के मार्जिन)
- रेनकोट : खरेदी किंमत ₹ २०० ते ५००, विक्री किंमत ₹३०० ते ₹१,२०० (५० ते १२० टक्के मार्जिन)
परवानग्या
व्यक्तिगत नावावरही तुम्ही हा व्यवसाय करू शकता. अगदीच फॉर्मल रूप द्यायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगर पालिका, नगर परिषद इत्यादींचा ‘दुकाने आणि आस्थापना परवाना’ म्हणजे गुमास्ता आणि उद्यम रजिस्ट्रेशन करू शकता.
शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी करता येतील असे १२ व्यवसाय
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

