घरबसल्या सुरू करू शकता Affiliate Marketing

affiliate marketing

Affiliate Marketing हा नव्याने उदयाला आलेला आणि खर्‍या अर्थाने एकविसाव्या शतकातील उद्योग आहे. स्वत:च्या घरात स्वत:चा संगणक, इंटरनेट जोडणी इतक्याच सामग्रीमध्ये आपण हा व्यवसाय सुरू करू शकता.

अॅफिलेट मार्केटिंग म्हणजे आपल्या वेबसाइट अथवा ब्लॉगच्या माध्यमातून आपण अन्य कंपन्यांची उत्पादने विकणे. यासाठी आपल्याला संगणकीय ज्ञान, इंटरनेटची जुजबी ओळख व नवनवीन शिकण्याची तयारी हवी. यासाठी काही छोटे क्रॅश कोर्सेसही उपलब्ध आहेत.

ब्लॉग अथवा वेबसाइटच्या माध्यमातून आपण ई-बे, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांच्यासारख्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवरील उत्पादने, जसे की मोबाइल फोन, कपडे, पुस्तके इ. वस्तू विकता येतात व त्याचे तुम्हाला कमिशन मिळते. तसेच गुगलच्या Adsence या प्रोग्राममध्ये नोंदणी केल्यावर गुगलच्या विविध जाहिराती या तुमच्या वेबसाइट अथवा ब्लॉगवर दिसतात.

तुमच्या वेबसाइट अथवा ब्लॉगवरून जितक्या लोकांनी गुगलची जाहिरात पाहिली त्या तुलनेत तुम्हाला पैसे मिळतात तसेच त्यावरून जर कोणी खरेदी केली तर हे कमिशन जास्त असते.

अॅफिलेट मार्केटिंगमध्ये तुम्ही जगभरात तुमच्या वेबसाइटच्या माध्यमातून विक्री करू शकता. दिवसातून तीन ते चार तास सलग हे काम केल्यास चांगली रक्कम मिळू शकते. दिवसेंदिवस ज्ञानात वृद्धी करून ऑनलाइन मार्केटिंगच्या अधिकाअधिक ट्रिक्स शिकून तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवू शकता.

शहरी, निमशहरी, ग्रामीण कोणीही हा व्यवसाय करू शकतो. तुमच्या माध्यमातून विकले गेलेल्या उत्पादनांचे कमिशन ठरावीक काळानंतर तुमच्या बँक खात्यात जमा होते. त्यासाठी तुम्ही निरनिराळ्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सचे अॅफिलेट होताना तुमचे बँक खाते जोडले पाहिजे.

Table of Contents

Author

  • शैलेश राजपूत

    हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण घेऊन २००७ साली पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार, असा विचार करून यावर उपाय म्हणून २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.
    संपर्क : ९७७३३०१२९२

    View all posts
Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Register your business on the Maharashtra Business Directory and get a FREE LIFETIME SUBSCRIPTION to Smart Udyojak B2B Connect
Click here to Register
error: Content is protected !!
Scroll to Top