कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) केंद्र सुरू करणे हा ग्रामीण भागात डिजिटल सेवा पुरवण्याचा आणि स्वत:चा व्यवसाय वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे. यशस्वी CSC चालवण्यासाठी नियमित प्रशिक्षण, चांगली ग्राहक सेवा आणि डिजिटल तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे.
CSC सुरू करण्याची संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. CSC हे ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत गावपातळीवर डिजिटल सेवा पुरवण्याचे केंद्र आहे, ज्याला ग्रामपंचायत स्तरावर ‘डिजिटल गाव’ म्हणूनही ओळखले जाते. CSC सुरू करण्यासाठी खालील पायर्या फॉलो कराव्या लागतात :
१. पात्रता तपासणी : CSC सुरू करण्यासाठी काही मूलभूत पात्रता निकष पूर्ण करावे लागतात :
वय : अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असावे.
शैक्षणिक पात्रता : किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तांत्रिक कौशल्य : संगणकाचे मूलभूत ज्ञान आणि इंटरनेट हाताळण्याची क्षमता.
आर्थिक पात्रता : उडउ सेंटरसाठी आवश्यक उपकरणे आणि जागेसाठी गुंतवणूक करण्याची तयारी.
ओळखपत्र : आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक.
२. CSC साठी नोंदणी : CSC सुरू करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागते. यासाठी खालील पायर्या फॉलो करा :
CSC पोर्टलवर भेट द्या : अधिकृत CSC पोर्टल वर जा. VLE Registration (Village Level Entrepreneur) पर्याय निवडा.
आधार नोंदणी : आधार कार्ड क्रमांक टाकून नोंदणी प्रक्रिया सुरू करा. आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
अर्ज भरणे : वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, शैक्षणिक पात्रता) भरा.
बँक खाते तपशील (IFSC कोड, खाते क्रमांक) आणि पॅन कार्ड क्रमांक टाका. तुमच्या गावातील पिनकोड आणि जवळील CSC केंद्राची माहिती द्या.
कागदपत्रे अपलोड करा : आधार कार्ड, पॅन कार्ड, दहावीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक पासबुक / रद्द केलेला चेक अपलोड करा.
नोंदणी शुल्क : काही वेळा नोंदणीसाठी नाममात्र शुल्क भरावे लागते. याची माहिती पोर्टलवर उपलब्ध असते.
३. आवश्यक संसाधने : CSC केंद्र सुरू करण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहे :
जागा : किमान १०० ते १५० चौरस फुट जागा, जी ग्राहकांना सेवा देण्यासाठी योग्य असेल.
उपकरणे : संगणक किंवा लॅपटॉप (किमान 4GB RAM आणि विंडोज 10), प्रिंटर, स्कॅनर आणि वेबकॅम.
इंटरनेट कनेक्शन (किमान 512 Kbps स्पीड). UPS (अखंडित वीज पुरवठ्यासाठी).
सॉफ्टवेअर : CSC पोर्टलद्वारे उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशन्स.
४. CSC आयडी आणि पासवर्ड मिळवणे : नोंदणी यशस्वी झाल्यानंतर CSC पोर्टलद्वारे तुम्हाला एक अद्वितीय CSC आयडी आणि पासवर्ड मिळेल. याचा वापर CSC डिजिटल सेवा पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी होईल.
५. प्रशिक्षण आणि प्रमाणन : CSC संचालक (VLE) म्हणून काम सुरू करण्यापूर्वी, तुम्हाला CSC चे प्रशिक्षण घ्यावे लागेल. हे प्रशिक्षण ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्वरूपात उपलब्ध असते, ज्यामध्ये CSC सेवा, डिजिटल साक्षरता आणि व्यवसाय व्यवस्थापन याबाबत माहिती दिली जाते. काहीवेळा टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिल (TSSC) द्वारे प्रमाणन आवश्यक असते.
६. सेवा सुरू करणे : CSC आयडी मिळाल्यानंतर तुम्ही खालील सेवा देऊ शकता :
तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.
🚀 अधिक माहितीसरकारी सेवा : आधार नोंदणी, पॅन कार्ड, मतदार कार्ड, पासपोर्ट अर्ज, इत्यादी.
आर्थिक सेवा : बँकिंग, विमा, डिजिटल पेमेंट.
शैक्षणिक सेवा : ऑनलाइन कोर्सेस, डिजिटल साक्षरता प्रशिक्षण.
उपयुक्तता सेवा : बिल पेमेंट, मोबाइल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज.
इतर सेवा : ऑनलाइन शॉपिंग, तिकीट बुकिंग (रेल्वे, बस, विमान).
७. आर्थिक व्यवस्थापन आणि कमाई : CSC केंद्राद्वारे तुम्ही प्रत्येक सेवेसाठी ठराविक कमिशन मिळवू शकता. कमाई ही तुमच्या व्यवसायाच्या प्रमाणावर आणि सेवांच्या मागणीवर अवलंबून आहे. तुम्ही बँकिंग सेवा, विमा आणि इतर डिजिटल सेवांमधून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता.
८. कायदेशीर बाबी : सर्व कायदेशीर परवाने (उदा. दुकान परवाना, जीएसटी नोंदणी) घ्या.
९. संपर्क आणि साहाय्य : CSC संबंधित कोणत्याही अडचणींसाठी, तुम्ही CSC हेल्पलाइनशी संपर्क साधू शकता किंवा स्थानिक CSC डिस्ट्रिक्ट मॅनेजरशी संपर्क साधून स्थानिक पातळीवर मदत मिळवता येते.
१०. गुंतवणूक आणि खर्च : CSC सुरू करण्यासाठी अंदाजे १-२ लाख रुपये गुंतवणूक लागू शकते (उपकरणे, जागा भाडे, इंटरनेट). खर्च कमी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या उपलब्ध संसाधनांचा वापर करू शकता.
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

