खेळण्यांच्या दुकानाचा व्यवसाय कसा सुरू कराल?

अनेक लोक आम्हाला व्यवसाय कोणता करू? काही उद्योगसंधी सुचवाल का? असे फोन, मेसेक करतात. अशा वेळी त्यांचा कल, स्थानिक गरजा यांचा विचार करून घेऊन उत्तर दिली जातात. म्हणूनच या अनुभवातून आज एक सदाबहार आणि कोणत्याही ठिकाणी करता येईल अशी उद्योगसंधी सुचवतोय. ते म्हणजे खेळणी विक्रीचे दुकान.

लहान मुलं कधीही खेळण्यांशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे खेळण्यांची ही बाजारपेठ कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार. ते श्रीमंत, मध्यम, गरीब कोणत्याही कुटुंबात जन्मले तरी खेळणी हवीच. खेडेगाव असो की शहर, नगर किंवा महानगर कुठेही जा लहान मुलं असतातच. त्यामुळे या व्यवसायाला कधीही मरण नाही.

लहान मुलांंमध्ये खेळण्याना प्रचंड मागणी असते. विविध प्रकारची खेळणी ही त्यांना भुरळ घालतात. कार्टून पाहता पाहता ही मुले स्वत:कडे कोणत्या प्रकारची खेळणी असावीत याची यादीही तयार करतात.

कमीत कमी रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंत किंमतीची खेळणी आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या शहरात, गावात खेळण्याचे दुकान सुरू करून व्यावसायिक सुरुवात करू शकता.

आता प्रश्न असेल कशी करावी सुरुवात तर प्रथम कोणताही व्यवसाय सुरू करताना मार्केट रिसर्च करायला हवा. आपल्याला जिथे व्यवसाय सुरू करायचाय त्या ठिकाणची रेकी करून नीट अभ्यास करायला हवा. कोणताही व्यवसाय आपण सुरू करतो तेव्हा अगोदरपासूनच हा व्यवसाय करणारे आपले प्रतिस्पर्धी आपल्या आजूबाजूला असणार हे लक्षात घ्यावे. त्यांच्या व्यवसायाचे नीट निरीक्षण, अभ्यास करून मग आपली मार्केटिंग स्ट्रेटेजी तयार करावी.

toy shop 1 e1736073008613कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक महत्त्वाची असते. या व्यवसायासाठी जागेचे भाडे, फर्निचर, माणसे, खेळणी तसेच जाहिरात व इतर अनेक प्रकारचे खर्च असतात. त्यामुळे सुरुवातीलाच भांडवलाची आवश्यकता असते. ही तरतूद ठिकाण, जागा केवढी आहे. खेळणी कोणत्या प्रकारची विक्रीसाठी ठेवली जाणार अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते.

जागा निवडताना मोक्याची आणि रस्त्याला लागून असेल तर उत्तम. जागा खूप मोठी असण्याची गरज नाही. मुलांना आकर्षित करेल अशा पद्धतीने खेळणी मांडली तर दुकानात येणारा ग्राहक वाढेल हे नक्की. यासाठी सतत वेगवेगळ्या मार्केटिंग आयडिया लावायला हव्यात. रबर, प्लास्टिक, लोकर, कापड, लाकडी अशा अनेक प्रकारची खेळणी तुमच्याकडे असायला हवीत.

लहान खेळण्यांपासून मोठ्या खेळण्यांपर्यंत सगळ्या प्रकारची खेळणी तुमच्याकडे असायला हवीत, कारण प्रत्येक खेळण्यांवर प्रॉफिट मार्जिन वेगवेगळे असते त्यावर आपली कमाई ठरते. मैदानी खेळाची साधने, घरातील खेळ, बुद्धीला चालना देणारे खेळ एक ना अनेक प्रकारचे.

Smart Udyojak Business Ecosystem Popup

हा व्यवसाय सदाबहार आहे. याला मरण नाही हे खरंय, पण या व्यवसायात नावीन्याची खूप जास्त गरज असते. काळानुसार स्वत:ला आणि व्यवसायाला अपडेट ठेवता आले पाहिजे. लहान मुलांचे मन समजून वाचता आले तर तुम्ही तुमचा ग्राहक कायमचा जोडून दीर्घकाळ चालणारा व्यवसाय उभारू शकता.

Author

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak Business Ecosystem Popup
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?