महिलांसाठी उद्योगसंधी; मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशीयन

मेकअप आर्टिस्ट व ब्युटिशीयन होण्यासाठी त्याचे प्रशिक्षण व सराव या दोन्हींची आवश्यकता असते. आपल्याकडे शिक्षण व्यवस्थेत या संदर्भातले ठरावीक अभ्यासक्रम उपलब्ध नाहीत. अनेक लहान-मोठ्या शिक्षणसंस्था, ब्युटिपार्लर व या क्षेत्रातील अनुभवी हे प्रशिक्षण कार्यक्रम राबवतात. त्यामध्ये बेसिक, अ‍ॅडव्हान्स व स्पेशलाईजड् असे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

परदेशात या क्षेत्रासाठीचे शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. फ्रीलान्स मेकअप आर्टिस्ट किंवा ब्युटिशीयन म्हणून या कामाला एकट्याने सुरुवात केली जावू शकते. स्वत:चे ब्युटिपार्लरही सुरू करता येऊ शकते. सौंदर्याशीसंबंधीत विविध प्रकारच्या सेवा फ्रीलान्स रुपात वा ब्युटिपार्लरमध्ये देता येऊ शकतात.

फ्रीलान्स रुपात व्यवसाय सुरू करायचा झाल्यास प्रशिक्षण व सरावानंतर निव्वळ दहा हजार रुपये भांडवलातसुद्धा सुरुवात करता येऊ शकते. शहरी व निमशहरी भागात या व्यवसायाला बराच ग्राहकवर्ग आहे.

लग्न, मुंज, वाढदिवस, पार्टी आदी सर्व प्रकारच्या सोहळ्यांच्यावेळी स्त्री व पुरुष दोघांनाही मेकअप व ब्युटिशीयनची गरज लागू शकते. चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, मालिका आदी क्षेत्रांसाठीही तुम्ही ही सेवा देऊ शकता.

– शर्मिला पवार
९६१९१११५०७
(लेखिका स्वतः ब्युटिशीयन व प्रशिक्षक आहेत.)

Table of Contents

Author

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Register your business on the Maharashtra Business Directory and get a FREE LIFETIME SUBSCRIPTION to Smart Udyojak B2B Connect
Click here to Register
error: Content is protected !!
Scroll to Top