कुक्कुटपालन व्यवसाय

कुक्कुटपालन हा भारतातील फार प्राचीन व्यवसाय आहे. शेतीस पूरक म्हणून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तो केला जातो. शेतीसोबत हे एक चांगले उपजीविकेचे साधनही आहे. व्यवसाय म्हणून करताना दोन फायदे होतात ते म्हणजे मांस व अंडी उत्पादन.

भारतात कुक्कुट संशोधनात विविध प्रकारच्या कोंबड्यांच्या जाती विकसित केल्या आहेत. पारंपरिक पद्धतीने कोंबडीपालन केले तर त्यात विकासाच्या संधी फार कमी आहेत, त्यामुळे कुक्कुटपालन करू इच्छिणार्‍यांनी या संदर्भातील मूलभूत माहिती व प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.

शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापनातील बारकावे व व्यावसायिक बाबींवर अभ्यास करून हा व्यवसाय केला तरच तो चांगल्या प्रकारे यशस्वी करता येईल. कुक्कुटपालन हे अंडी उत्पादनासाठी करायचे की मांसासाठी याचा अगोदरच अभ्यास करायला हवा.

शहरी व ग्रामीण भागांत ब्रॉयलर कोंबड्यांना जास्त मागणी आहे. कोंबड्यांच्या विविध जाती आणि त्यांची उपलब्धताही जाणून घ्यावी. कोंबड्यांचे खाद्य, वयोमानानुसार त्यांचे व्यवस्थापन, त्यांचे लसीकरण आदी गोष्टींची काळजी घ्यावयास हवी.

कुक्कुटपालन हा व्यवसाय म्हणून करताना आवश्यक जागा, आजूबाजूच्या इतर कोंबड्यांच्या फार्म्स, त्यांचे प्रकार, उपलब्ध बाजारपेठ, आपण निवडलेल्या जागेपासून बाजारपेठेचे अंतर, खाद्य, लसीकरण आदी उपलब्धतेचा आढावा घ्यावा.

Table of Contents

Author

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Register your business on the Maharashtra Business Directory and get a FREE LIFETIME SUBSCRIPTION to Smart Udyojak B2B Connect
Click here to Register
error: Content is protected !!
Scroll to Top