शिवणकाम : स्वत:ला स्वयंसिद्ध करणारा व्यवसाय

भारतात एकूण लघुउद्योगांपैकी कमीतकमी नऊ टक्के उद्योग हे आजही महिलांच्या मालकीचे आहेत. जेव्हा प्रत्येक युवक-युवती स्वत:च्या नव्या वाटा धुंडाळण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा खर्‍या अर्थाने देश प्रगतीपथावर जाईल. सर्वांमध्ये काहीना काही कौशल्य असते, फक्त गरज आहे त्या कौशल्याचा शोध घेण्याची.

शिक्षणामुळे प्रगती होते आणि त्याचा उपयोग करून स्वकमाईतून व्यवसायाचे अनेक पर्याय खुले होतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून घरगुती व्यवसाय उभा राहू शकतो. काही जण वेळीच सुरुवात करून स्वत:ला स्वयंसिद्ध करतात. त्यातलाच एक कौशल्यपूर्ण व्यवसाय आहे ‘शिवणकाम’.

एकेकाळी शिवणकाम घराघरात शिकले जायचे. मुलींनी शिवणकलेचे शिक्षण घ्यावे, असा प्रत्येक आईवडिलांचा आग्रह असायचा. शिवणकाम करून स्वत:च्या पायावर उभे राहता येईल हा यामागील उद्देश होता. सध्या वेगवेगळ्या डिझाईनच्या कपड्यांची बाजारात चलती आहे. आजही शहरात तसेच ग्रामीण भागात चांगल्या कारागीराची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एक छोटी जागा आणि एक शिलाई मशीन याद्वारे हा व्यवसाय सहज सुरू करता येतो.

आज जवळपास प्रत्येक गृहिणीकडे शिलाई मशीन असते. अनेक महिला शिवणकाम करून आपला व्यवसाय समर्थपणे करीत आहे. त्यात प्रामुख्याने साडीला पिको-फॉल लावणे, विविध डिझाईनचे ब्लाउज शिवणे, लहान मुलांचे कपडे, मुलींचे फ्रॉक, पंजाबी ड्रेस, सलवार-कमीज शिवणे, कापडी पिशव्या शिवणे, घरातील कपड्यांवर शिलाई करणे आदी व्यवसाय करीत आहेत. सध्या ब्लाऊजची शिलाई २५० पासून ६०० रुपयांपर्यंत असते.

आजही शिवणकामाचे अनेक प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शासकीय तसेच खासगी आयटीआयमध्ये एक वर्षाचा शिवणकामाचा अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यासाठीची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आहे. ड्रेसमेकिंग किंवा शिवणकामाचे प्रशिक्षण देणार्‍या अनेक संस्था जिल्हाभर कार्यरत आहेत.

indian poor women doing tailoring

प्रत्येक कुटुंबाला जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा फॅमिली टेलरही असतो. रेडीमेड कपड्यांच्या जमान्यातही टेलरिंग व्यवसायाने मात्र आपले स्थान आजही अबाधित ठेवले आहे.

एकेकाळी शर्ट साडेतीन तर पँट दहा रुपयांत शिवून मिळत होती, परंतु आज तोच शर्ट २५० ते ५०० तर पँट ३५० ते ६०० रुपयांना शिवून मिळत आहे. दरवर्षी दहा ते वीस रुपयांनी यात वाढ होत आहे. काही नावाजलेले टेलर्स तर अठराशे रुपये ड्रेसची शिलाई आकारत आहेत. कारागीराला प्रती ड्रेस अडीचशे ते सहाशे रुपये दिले जातात.

WhatsApp Channel Banner

रेडीमेड कपड्यांचा जमाना असला तरी रेडीमेड कपडे प्रत्येकाला आवडतातच असे नाही. आजही चोखंदळ ग्राहक टेलर, मास्तरची गुणवत्ता हेरून फिटिंगच्या बाबतीत कुठेही तडजोड न करता ड्रेस शिवून घेत आहेत.

आजही अनेक महिला घरीच शिवणकाम करून चांगली कमाई करीत आहे. घरगुती व्यवसायाचा श्रीगणेशा करण्याची हीच योग्य वेळ आहे, तेव्हा युवक-युवतींनो योग्य निर्णयाचे पहिले पाऊल उचलून संधीचे सोने करणारी प्रगतीची वाट धरायला काय हरकत आहे.

Author

  • मधुकर घायदार

    मधुकर घायदार यांचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनीअरिंग झाले असून ते राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शिक्षक आहेत. 'शिक्षक ध्येय' या साप्ताहिकाचे ते संपादकही आहेत.

    संपर्क : 9623237135
    ई-मेल : madhukar.ghaydar@gmail.com

    View all posts

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Register your business on the Maharashtra Business Directory and get a FREE LIFETIME SUBSCRIPTION to Smart Udyojak B2B Connect
Click here to Register
error: Content is protected !!
Scroll to Top