1007 annual marketing

शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी करता येतील असे १२ व्यवसाय

उद्योग, व्यवसायाची सुरुवात कुठून तरी करायची, पण नोकरी सोडून ते करण्याचं धाडस एका दिवसात आणता येत नाही. मग कुठून तरी याची छोटी सुरुवात करावी लागते. हळूहळू व्यवसायाचा अनुभव येऊ लागतो. खाचखळगेही कळू लागतात. त्यातूनच आपणही उद्योजक होऊ शकतो, हा आत्मविश्वास निर्माण होतो.

अशा स्थितीत असलेल्या अनेकांसाठी हा लेख आहे. या लेखात शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी करता येतील असे १२ व्यवसाय दिले आहेत, जे तुम्ही फक्त शून्य किंवा अतिशय कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता.

2026 मध्ये विकेंडला सुरू करता येणारे सर्वोत्तम व्यवसाय

विकेंड योगा क्लास

हेल्थ आणि वेलनेस म्हणजे आरोग्य ही आज सर्वात वेळाने वाढणारी इंडस्ट्री आहे. कोरोना काळामुळे लोकांना उत्तम आरोग्याचं महत्त्व लक्षात आलं आहे. आज अनेक नोकरदारांना, प्रोफेशनल्सना नोकरीमुळे दररोज आरोग्यासाठी वेळ देता येणं शक्य होत नाही. अशांचा तुम्ही शनिवार, रविवारमध्ये योगा क्लास घेऊ शकता.

yoga business

तुम्हाला स्वतःला योग करता येत नसेल किंवा योग शिकवता येत नसेल तर अनेक मोठ्या संस्थांचे छोट्या काळाचे योग प्रशिक्षक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्ही स्वतःसुद्धा योग शिकाल आणि प्रशिक्षकही व्हाल. बंगळुरूला स्वामी विवेकानंद योग्य अनुसंधान संस्थेत एक महिन्याचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

WhatsApp Channel Banner

योग इंडस्ट्रीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी : https://udyojak.org/business-ideas/yoga-is-a-big-industry/

साइड बिझनेस

नोकरीसोबत एखादा छोटा-मोठा व्यवसाय सुरू करू शकाल का, याचा विचार सुरू करा. उदाहरणार्थ एखादे दुकान सुरू करून त्यात गरजेनुसार माणसं कामाला ठेवू शकता. तुम्ही नोकरीनंतरच्या वेळेत किंवा सुट्टीच्या दिवसांत दुकानात लक्ष घालू शकता. दुकानाप्रमाणे असे हजारो-लाखो व्यवसाय निघतील जे तुम्ही साइड बिझनेस म्हणून करू शकता.

दुसऱ्याच्या व्यवसायात भागीदार

अनेक तरुण उद्योजकांना व्यवसाय सुरू करायचा असतो, पण भांडवलाची अडचण असते. अशा व्यवसायात गुंतवणूक करून तुम्ही भागीदार होऊ शकता. व्यवसाय मुख्यत्वे तुमचा नसल्यामुळे त्याच्या रोजच्या घडामोडीत तुम्हाला लक्ष देण्याची आवश्यकता नसेल.

तुमच्या आवडीनुसार किंवा उपलब्ध वेळेनुसार तुम्ही व्यवसायात लक्ष घालू शकता. ज्याने तुम्ही गुंतवलेल्या पैशाचा योग्य विनियोग होऊन व्यवसाय वाढतो आहे की नाही हे तुम्ही पाहू शकता.

earn money from blogging

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

ब्लॉगर व्हा

वर्डप्रेस किंवा ब्लॉगरवर तुमचा ब्लॉग सुरू करा. ब्लॉग सुरू कसा करायचा हे शिकवणारे हजारो व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहेत. त्यातला कोणताही व्हिडिओ बघा आणि कामाला लागा. ब्लॉग तयार केला की त्यावर सुट्टीच्या दिवशी किंवा फावल्या वेळात चांगल्या चांगल्या विषयांवर माहिती शोधून लेख लिहा. झाली तुमच्या व्यवसायाला सुरुवात.

ब्लॉग तयार करणे तसेच त्यासाठी लागणारे hosting इत्यादी संपूर्णपणे मोफत आहे. तुम्ही स्वतःचा डोमेन व hosting घेऊन करणार असाल, तर त्यासाठी वर्षाला ₹४,००० ते ₹५,००० खर्च येऊ शकतो. नुसते लेख लिहून पैसे कसे कमावणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुम्ही लेख लिहायला सुरुवात केली आणि त्यावर लोक भेट देऊ लागली की तुम्ही ‘गुगल’कडून जाहिराती घेऊ शकता. त्यासाठी ‘गुगल adsence’वर रजिस्टर करावं लागेल. तेही मोफत आहे.

ब्लॉग सुरू केला की सोबत affiliate marketing सुद्धा सुरू करा. ‘अमेझॉन’सह अनेक e-commerce portal वर affiliate होण्याची सोय उपलब्ध असते. त्यांचे affiliate होऊन त्यांची प्रॉडक्ट्स तुम्ही तुमच्या ब्लॉगवर विकायला, दाखवायला सुरुवात करू शकता. तुमचा ब्लॉग एका ठराविक विषयावर असेल, तर तुमची त्यात डोमेन ऑथॉरिटी निर्माण होते. तुम्ही ज्या विषयावर ब्लॉग चालवता आहात, त्याबाबत लागणारी प्रॉडक्ट्स तुमच्या ब्लॉगवरून विकू शकता.

या प्रॉडक्ट्सबद्दल लोकांना माहिती देणारे लेखही लिहू शकता. लोक तुमच्या affiliate लिंकवर जाऊन थेट ‘अमेझॉन’वरून खरेदी करतील आणि ‘अमेझॉन’ त्यातून तुम्हाला कमीशन देईल.

पूर्वी ब्लॉगिंगमध्ये फक्त Google Adsense वर अवलंबून राहिले जात होते. मात्र आज Affiliate Marketing, Sponsored Content, Digital Products, Membership Community आणि Newsletter यांद्वारेही उत्पन्न मिळवता येते.

ब्लॉगिंगविषयी अधिक जाणून घेण्यासाठी : https://udyojak.org/tag/blogging/

earn money from YouTube channel

युट्युब चॅनल चालवा

‘युट्युब’ला खूप मोठ्या प्रमाणात कंटेंटची गरज आहे. लॉकडाउनपासून ही गरज खूपच वाढली आहे. कोणीही सामान्य माणूस कोणत्याही गुंतवणुकीशिवाय फक्त हातात फोन घेऊन युट्युबर होऊ शकतो.

‘युट्युब’ चॅनल कसे सुरू करायचे? त्यावर व्हिडिओ कसे अपलोड करायचे आणि त्यातून अर्थार्जन कसे करायचे याची सविस्तर माहिती तुम्हाला ‘युट्युब’वरच उपलब्ध आहे आणि तीही पूर्णपणे मोफत.

तुम्ही कुठेलेही राहणारे असाल, कोणत्याही आर्थिक स्तरातील असाल, तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काहीही असेल तरीही तुम्ही ‘युट्युब’ येऊ शकता, पॉप्युलर होऊ शकता आणि पैसेही कमवू शकता. शनिवार-रविवार किंवा सुट्टीचे दिवस धरून तीन ते चार व्हिडिओ तयार केले तरी तुमचे आठवड्याचे काम पूर्ण झाले.

आज YouTube वर फक्त लाँग व्हिडिओच नाही तर Shorts, Podcasts आणि Live Streaming द्वारेही उत्पन्न मिळवता येते.

युट्युब चॅनेल चालवून पैसे कसे कमवायचे? : https://udyojak.org/business-ideas/how-to-earn-money-from-youtube-in-marathi/

विमा सल्लागार व्हा

IRDA ची परीक्षा उत्तीर्ण होऊन तुम्ही कोणत्याची विमा कंपनीचे विमाविक्रेते होऊन जीवन विमा किंवा जनरल विमा विकू शकता. शहरी भागात बारावी आणि ग्रामीण भागात दहावी उत्तीर्ण कोणताही विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. साधारण दीड ते दोन हजार रुपये परीक्षेचा खर्च असतो. ही एवढीच या व्यवसायाला लागणारी गुंतवणूक.

तुम्ही सुट्टीच्या दिवशी किंवा फावल्या वेळात व्यवसाय शोधता आहात, त्याच वेळी इतरांनाही सुट्टी असणार. तुम्ही त्यांना गाठू शकता. विम्याबद्दल माहिती देऊ शकता आणि विमा विकू शकता.

विमा सल्लागार होण्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी : https://udyojak.org/tag/insurance-agent/

टुर ऑपरेटर

शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी छोट्या छोट्या सहली आयोजित करू शकता. ट्रेक आयोजित करू शकता. लोकांना रोजच्या धावपळीतून ब्रेक हवा असतो. हीच तुमच्याठी पैसा कमावण्याची संधी आहे. कल्पकतेने मस्त ठिकाणं किंवा काही थिम ठरवून छान सहली काढू शकता. लोकांना एकदा तुमच्या सहलींची सवय लागली की हाच तुमचा बारमाही व्यवसाय होऊ शकतो.

पर्यटन व्यवसाय कसा सुरू करता येईल : https://udyojak.org/business-ideas/how-to-start-tourism-business/

इतरांना तुमच्या स्किल्स शिकवा

तुमच्यात जी कौशल्य (स्किल्स) आहेत, ती तुम्ही दुसऱ्यांना शिकवू शकता. तुम्ही काही म्हणजे अगदी काहीही शिकवू शकता. लोक शिकायला तयार आहेत. फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा अभ्यासक्रम तयार करता आला पाहिजे आणि टप्प्याटप्प्याने शिकवता आले पाहिजे. याचे तुम्ही प्रत्यक्ष वर्ग घेऊ शकता किंवा झूम, गुगल मीट अशा ॲप्सचा उपयोग करून लोकांना ऑनलाइन ही शिकवू शकता.

अनेक प्रशिक्षक सुरुवातीला फ्री सेमिनार किंवा वेबिनार घेऊन लोकांना यामध्ये जोडतात. तुम्ही जे शिकवणार आहात, त्या क्षेत्रातले तुमचे ज्ञान, तुमची शिकवण्याची पद्धत आणि कोर्स कंटेंट या तीन गोष्टी लोकांना आवडला तर लोक paid कोर्सलासुद्धा नक्की प्रवेश घेतात.

जर तुमच्या लोकांना शिकवता येईल अशी काही कौशल्ये नसतील, तर इंटरनेटवर लोक सध्या काय काय शिकतात, नवीन काय आहे अशा गोष्टींचा शोध घ्या. स्वतः ते शिका. त्याचा सराव करा आणि त्या विषयात प्रावीण्य मिळवा आणि लोकांना शिकवायला सुरुवात करा. उदाहरणार्थ सध्या artificial intelligence हा विषय नवीन आहे. लोकांना याबद्दल उत्सुकता आहे. असे विषय अभ्यासून तुम्ही लोकांना प्रशिक्षित करू शकता.

share accounting business

अकाउंटिंग आणि जीएसटी फायलींग

प्रत्येक उद्योजकाला अकाउंटिंग आणि जीएसटी फायलिंग करून देणाऱ्याची गरज आहे. जर तुम्हाला अकाउंटिंग येत असेल तर तुम्ही ही सेवा देऊ शकता. आठवड्याची बिले घेऊन शनिवार-रविवारमध्ये तुम्ही अशा उद्योजकांचे अकाउंट्स सांभाळू शकता.

जीएसटी फायलिंग हे काम महिन्यातून एकदाच करावे लागते. नियमित व्यवस्थित अकाउंटिंग केलेले असेल तर जीएसटी फायलिंग करण्यात काहीही अडचण येत नाही तसेच वेळही जात नाही.

जीएसटी फायलिंग करण्याविषयी संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला जीएसटी इंडिया या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अकाउंटिंग करण्यासाठी तुम्ही टॅली किंवा अन्य अनेक सॉफ्टवेअर किंवा ॲप्स वापरू शकता.

अनेक अकाउंटिंग सॉफ्टवेअर हल्ली मोबाइल ॲप आणि डेस्कटॉप सॉफ्टवेअर अशा दोन्हींवर काम करण्याची सोय देतात. याचा डेटा क्लाउडवर असतो आणि तुम्ही तो केव्हाही आणि कुठूनही access करू शकता. व्यापार, झोहो बुक्स ही अशा काही सॉफ्टवेअरची उदाहरणे आहेत.

GST Compliance सोबतच MSME Registration, Udyam Registration, e-Invoicing, TDS Filing आणि Digital Bookkeeping या सेवांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

AI सेवा आणि AI प्रशिक्षण

२०२५-२६ मध्ये Artificial Intelligence हा सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय क्षेत्र बनला आहे. अनेक छोटे व्यवसाय, दुकानदार, डॉक्टर, वकील, प्रशिक्षक आणि उद्योजकांना AI चा वापर करायचा आहे, पण त्यांना त्याचे ज्ञान नसते.

जर तुम्ही ChatGPT, Gemini, Claude, Canva AI, Midjourney यांसारखी साधने वापरायला शिकलात, तर विकेंडला AI Consultant किंवा AI Trainer म्हणून काम करू शकता.

तुम्ही खालील सेवा देऊ शकता :

  • AI वापरून सोशल मीडिया कंटेंट तयार करणे
  • AI Prompt Writing Training
  • ChatGPT Training
  • Business Automation Setup
  • AI Tools Workshop

सध्या या क्षेत्रात स्पर्धा कमी असून मागणी झपाट्याने वाढत आहे.

social media manager

सोशल मीडिया मॅनेजमेंट

आज जवळपास प्रत्येक व्यवसायाला Facebook, Instagram, YouTube आणि WhatsApp वर उपस्थिती आवश्यक आहे, पण बहुतेक छोटे उद्योजक स्वतः सोशल मीडिया हाताळू शकत नाहीत.

तुम्ही विकेंडला खालील सेवा देऊ शकता :

  • सोशल मीडिया पोस्ट डिझाइन
  • कंटेंट रायटिंग
  • Reels Editing
  • Page Management
  • Facebook Ads Management

फक्त ५-१० ग्राहक मिळाले तरी हा व्यवसाय पार्ट-टाइममधून फुल-टाइम होऊ शकतो.

ऑनलाइन कोर्स तयार करा

जर तुम्हाला एखाद्या विषयाचे चांगले ज्ञान असेल, तर फक्त प्रशिक्षण देण्याऐवजी Online Course तयार करा. एकदा कोर्स तयार झाला की तो अनेक वेळा विकता येतो. ही Passive Income निर्माण करण्याची उत्तम संधी आहे.

उदाहरणार्थ :

  • AI Training
  • Digital Marketing
  • Spoken English
  • Stock Market Basics
  • Entrepreneurship Training

FAQs

नोकरी करताना व्यवसाय सुरू करता येतो का?

होय. अनेक व्यवसाय विकेंड किंवा फावल्या वेळात सुरू करता येतात. व्यवसाय वाढल्यानंतर पूर्णवेळ उद्योजक बनण्याचा निर्णय घेता येतो.

विकेंड बिझनेस सुरू करण्यासाठी किती भांडवल लागते?

व्यवसायानुसार भांडवल बदलते. ब्लॉगिंग, युट्युब, प्रशिक्षण, AI सेवा यांसारखे व्यवसाय अत्यल्प गुंतवणुकीत सुरू करता येतात.

२०२६ मध्ये सर्वात जास्त वाढणारे विकेंड व्यवसाय कोणते?

AI सेवा, सोशल मीडिया मॅनेजमेंट, ऑनलाइन प्रशिक्षण, ई-कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंग सेवा हे सर्वात वेगाने वाढणारे व्यवसाय आहेत.

कोणता व्यवसाय कमी जोखमीचा आहे?

प्रशिक्षण, ब्लॉगिंग, युट्युब, AI सेवा आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट हे तुलनेने कमी जोखमीचे व्यवसाय मानले जातात.

Author

  • shailesh rajput

    हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण घेऊन २००७ साली पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार, असा विचार करून यावर उपाय म्हणून २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

    View all posts

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा