इतर खेळाप्रमाणे या खेळाचेही काही नियम असतात, परंतु अनेक उद्योजकांना ते माहीतच नसतात. त्यामुळे ते गोंधळतात आणि चुकीच्या पद्धतीने बिझनेसचा हा खेळ खेळत राहतात.
कोणत्याही खेळामध्ये जिंकायचं असेल तर त्या खेळाचे नियम माहीत करून घेऊन हुशारीने, सातत्याने सराव करून, शिस्त आणि नियोजनबद्ध रीतीने खेळल्यास यश मिळतं, बिझनेसचही असंच आहे. असं मी अनेक उद्योजकांना नेहमी सांगत असतो. आजपर्यंत मी लाखो उद्योजकांना मार्गदर्शन करून त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार्य केलं आहे.
कॉफीला दूध आणि साखर मिळेपर्यंत त्याची चव कशी आहे हे कळत नाही. आपण एक व्यक्ती म्हणून चांगले असू शकता, परंतु जेव्हा आपण सर्वोत्तम लोकांच्या संपर्कात येतो तेव्हा आपण आणखी चांगले होतो. तुमच्यासोबत कोण आहे हे महत्त्वाचं आहे.
यशस्वी व श्रीमंत व्यक्तींसोबत राहा. खरंच तुम्हाला यशस्वी व श्रीमंत व्हायचंय का? मग तुम्हाला श्रीमंतांसारखा विचार करावा लागेल. श्रीमंत लोक संपत्तीबद्दल बोलतात. श्रीमंत माणसं कौशल्य व पैसा आपल्या खिशात असेल तर ती आपली सर्वात मोठी ताकद आहे असं मानतात.
जगातील कोणताही श्रीमंत माणूस एकटा काम करत नाही. श्रीमंत व्यक्तीकडे नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमी वेळ असतो. श्रीमंत लोकं अगोदर गुंतवणूक करतात मग खर्च करतात.
उद्योजकांनी इतरांना मदत करण्याची भावना ठेवायला हवी. कारण एकमेकांनी एकमेकांना पाडण्याच्या प्रयत्नात सगळेच पडतो, परंतु एकमेकांनी एकमेकांना सावरण्याच्या प्रयत्नात सर्वच सावरतो.
चला. तर मग तुम्हीही सज्ज व्हा!
उद्योजक व्हा, श्रीमंत व्हा!
व्यवसाय छोटा किंवा मोठा कधीच नसतो. तुमच्या अथक प्रयत्नाने आणि विविध कौशल्य आत्मसात करून व्यवसाय कमी कालावधीत मोठा करता येतो आणि करोडो रुपये कमवता येतात.
यासाठी स्वत:ला बदलावे लागेल. स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणावे लागेल. सकारात्मक उद्योजकीय मानसिकता आणावी लागेल. सकाळी लवकर उठावे लागेल. आळस झटकावा लागेल.
चांगल्या कल्पनेत आणि विचारात आयुष्य बदलण्याची ताकद असते. यामुळेच माझे जीवन वेळोवेळी सकारात्मक विचाराने बदलले आहे. तुम्हालाही कायम सकारात्मक विचार करावे लागतील.
नेपोलियन हिलच्या म्हणण्यानुसार कल्पना हे सर्व भाग्याचा प्रारंभबिंदू आहे. छान कल्पना आणि विचारांमुळे माझे जीवन अधिक अर्थपूर्ण, मनोरंजक आणि रोमांचक बनले आहे.
माझ्या जीवनातील यशासाठी मी अभ्यास केलेल्या महान पुस्तकांना याचे श्रेय देतो. एक चांगले पुस्तक किंवा अगदी एखादा सुविचार हे एक साधन आहे, जे तुमच्या कल्पनाशक्तीला प्रज्वलित करू शकते. तुम्हाला ते घेण्यास, कृती करण्यास प्रवृत्त करू शकते.
कृती करा आणि तुम्ही स्वत:ला जीवनात पुढील स्तरावर जाण्यासाठी प्रेरित करा. मी क्वोट्स गोळा करतो, जे मला आवडतात आणि ते मी लिहून काढतो व इतरांना ही पाठवतो.
सकाळी लवकर उठा, व्यायाम करा, मेडिटेशन करा, पुस्तक वाचा, व्हिझ्युलायझेशन करा, सकारात्मक विचार करा, कामाचे नियोजन करा. वाचनाच्या, लिहिण्याच्या आणि लवकर उठण्याच्या सवयीमुळेच मी आज पंधरा पुस्तकं लिहू शकलो, यशस्वी होऊ शकलो. तुम्हीही या चांगल्या सवयी अंगी बाणवल्या तरच बिझनेसच्या खेळात यशस्वी व्हाल.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.