कर्ज कसे? केव्हा आणि कोणी घ्यावे?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आजचे प्रकरण थोडेसे वेगळे होते. एक जोडपे माझ्यासमोर बसले होते. पती आणि पत्नी. हरीश भाई आणि त्याची पत्नी सुमित्रा भाभी (नाव बदललेले). दोघेही पन्नाशीतले. हरीशभाई माझ्याकडे सल्ल्यासाठी नियमित येत असत. यावेळी मात्र ते माझ्याशी भेटून माझ्याशी चर्चा करायला खास आपल्या पत्नीला घेऊन आले होते.

गेले काही आठवडे त्या प्रचंड तणावाखाली होत्या आणि त्यांनी मला तिच्या ताणतणावाबद्दल सांगितले होते. माझ्याशी बोलून त्यांचा प्रश्न सुटेल असे त्यांना वाटत होते.

हरीशभाई एक प्रवास कंपनी चालवतात. त्यांनी नवी दिल्लीतील एका लहान ट्रॅव्हल एजन्सीमध्ये शिपायाच्या रूपात आपले करिअर सुरू केले होते. काही काळाने प्रवासी एजन्सीच्या मालकाने त्यांना स्वत:ची प्रवासाची एजन्सी सुरू करण्यासाठी मुंबईला जाण्यास प्रवृत्त केले.

सुरुवातीच्या काळात दिल्ली एजन्सीने आपल्या नवीन एजन्सीद्वारा काही व्यवसायदेखील दिला. त्यांचे संबंध आताही सौहार्दपूर्ण होते. ही वीस वर्षांपूर्वीची गोष्ट. हरीशभाईंनी आपले कौशल्य आणि नेटवर्क चांगले वापरले. अमाप कष्ट केले. व्यवसायात खूप वाढ होत गेली. हरीशभाईंनी चांगले नाव कमावलं; तसेच व्यवसाय बराच वाढवला.

त्यांच्याकडे अनेक कॉर्पोरेट क्लायंट होते. इंटरनेट क्रांतीनंतरही बहुतेक ग्राहक त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. ते सर्व प्रवासाच्या गरजांसाठी त्यांचेे One स्टॉप शॉप होते. कंपन्यांची वाढ झाली तशीच हरीशभाईचा व्यवसायाचा आवाका वाढला. हरीशभाई माझे रेटनेर (retainer) ग्राहक असल्याने दर महिन्याला माझी भेट घेत आणि त्यांचं व्यावसायिक समस्यांवर उद्योग ज्योतिषाचे मार्गदर्शन घेत. नवीन कर्मचारी भरती, व्यवसाय विस्तार, आर्थिक बाबी या संदर्भात सल्ला घेत.

मला आश्चर्य वाटले त्यांच्या बायकोला तणावाचे कारण काय असू शकेल. मी त्यांना विचारले, बोला काय त्रास आहे ते सांगा. ‘सर, माझे वडील शाळेत शिक्षक होते. ते अगदी कट्टर शिक्षक होते. त्या दिवसांत शिक्षकांना फारशी कमाई मिळत नसे. तरीही माझ्या आईवडिलांनी माझी बहीण आणि माझी उत्तम काळजी घेतली. तर आम्ही श्रीमंत कधीच नव्हतो. परंतु आयुष्यभर माझ्या वडिलांनी सगळी देणी वेळच्यावेळी दिली.

कधीही एक पैशाचे कर्ज घेतले नाही. ते म्हणत की, कर्जाची परतफेड करण्यासाठी मी दुसरा जन्म घेऊ इच्छित नाही. त्यांनी आम्हाला चांगले शिकवले आणि चांगल्या कुटुंबात आमचा विवाह करून दिला. त्या भावना वश झाल्या.

मी वेळ जाऊ दिला. त्या पाणी प्यायल्या. डोळे टिपले आणि त्यांनी पुन्हा सुरुवात केली आणि इथे मी लग्नाच्या दिवसापासून पाहत आहे की, आमच्यावर सतत कर्ज आहे. माझ्या लग्नाच्या वेळेपासून आत्तापर्यंत कर्जाची रक्कम फक्त वाढतच राहिली आहे.

कर्ज कमी व्हायचे नावच नाही आणि आता गेल्या आठवड्यात घरी येऊन यांनी मला सांगितले की, तुम्ही याना सल्ला दिला आहे की, किमान २ कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज घ्या. मी त्या दिवसापासून झोपले नाही. आपण या डोंगरा एवढ्या कर्जासकट कोठे जात आहोत? ही मला घोर चिंता सतावते आहे.

मी लहान घरात राहण्यास तयार आहे पण मला कर्जाखाली जगणे पसंत नाही. यांना सर्व कर्जाची परतफेड करण्याची सूचना करा, आम्ही आपले सर्व सामान, सोने आणि दागिने विकू पण आम्हाला एकदाचे कर्जमुक्त व्हावे असे वाटते. मी विवाहाच्या दिवसापासून वाट बघत आले आहे.

गेल्या वीस वर्षापासून मला वाटत होते की एक दिवशी आमची कर्जातून मुक्तता होईल, परंतु तो दिवस आता कधी येईल असे मला वाटत नाही. जे आहे त्या कर्जात वाढ तरी नको. मला मदत करा त्या हुंदके द्यायला लागल्या.

संपूर्ण प्रकरण माझ्यासाठी स्पष्ट झाले. मला समस्या आणि तिचे निराकरण दोन्ही माहीत होते. आता फक्त ती माहिती त्यांना कशी समजावून सांगायची एवढेच बाकी राहिले होते. त्यांचे पती काहीही चुकीचे करत नाही हे त्यांना समजून सांगायचे होते.

त्यासाठी आमचे प्रश्न उत्तर सत्र सुरू केले.

● तुमचे वीस वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर किती कर्ज होते?

एक लाख पंधरा हजार रुपये त्यांची आठवण अचूक होती.

● ते कसे वाढत गेले ते मला सांगा.

2000 साली आम्ही नवीन कार्यालय घेतले. तेंव्हा कर्ज 5 लाखरुपयांपर्यंत वाढले. मग 2003 मध्ये आम्ही आमच्या व्यवसायाची वाढ केली तेव्हा 15 लाखापर्यंत वाढले 2008 मध्ये आम्ही 50 लाखापर्यंत उडी मारली. 2009 मध्ये आम्ही पुन्हा आमचे कार्यालय वाढवले आणि अधिक कर्मचारी घेतले, त्यावेळी ते 2 कोटी रु. होते. 2013 मध्ये ही वाढ 4.5 कोटींवर गेली आणि आता तुम्ही त्यांना जे 2 कोटी कर्ज घेण्यास सांगितले आहे त्यामुळे कर्जाचा बोजा वाढून 6.5 कोटी होईल. हे खूप जास्त आहे.

● आपण इतके कर्ज घेतले आहे पण बँक तुम्हाला इतके कर्ज का देत आहे? उद्या आपण पळून गेल्यास, बँक त्रास देत नाही का?

नाही, त्यांनी आमच्या कार्यालयाचा संपार्श्विक म्हणून घेतला आहे.

● आपण लग्न केले तेव्हा संपार्श्विक काय होते?

तेव्हाही कार्यालय होते. मी त्याला घरावर कर्ज कधीच घेवू देणार नाही.

● तुमचे कार्यालयाची आजची किंमत 6.5 कोटी रुपये आहे?

हो, त्या पेक्षा खूपच जास्त आहे. नरिमन पॉईंटमधील रिअल इस्टेटमधील किंमती खूप वाढल्या आहेत. जर आपण आज आमच्या परिसरात विक्री केली तर आम्हाला सहज 10 कोटी मिळतील. त्यांनी अगदी अभिमानाने उत्तर दिले.

● मग आपण कसली काळजी करता आहात?

त्या अवाक झाल्या. अहो पण कर्ज घेणं चुकीचे नाही का? तेपण इतकं?

मग मी त्यांना उद्योग ज्योतिषशास्त्राबद्दल सांगण्यास सुरुवात केली….

व्यवसाय करणे म्हणजे अनेक व्यवहार करणे. या व्यवहारात जमीन, यंत्रसामग्री, पैसा किंवा कामगार यांच्या दृष्टीने संसाधने आवश्यक आहेत. यातील काही स्त्रोत घरचे असतात तर काही बाहेरून घेतले जातात. तर काही कर्ज स्वरूपात येतात. अनेक व्यवसाय तर बाहेरच्या मदतीशिवाय चालूसुद्धा करता येत नाहीत.

अगदी शेतीचे उदाहरण घ्या. भातशेतीमध्ये लावणीसाठी सगळ्या गावकर्‍यांचे सहकार्य आपण उधार घेतो कि नाही? आपण त्यांच्या शेतीवर लावणीसाठी जाऊन ते परत पण करतो. काही व्यवसायात यंत्रसामग्री उधार घेतली जाते. तसेच रोखीचे कर्ज हीदेखील उद्योगाची एक गरज आहे.

जातकांच्या जन्मकुंडलीच्या आधारावर आपण ठरवतो की त्याला कशा प्रकारचा व्यवसाय फायदेशीर ठरेल. त्या व्यवसायास स्थानिक स्थरावर कशा प्रकारची संसाधने उपलब्ध आहेत आणि कोणती संसाधने उधार घेण्याची आवश्यकता आहे.

बारावे घर कर्ज दाखवते. बाराव्या घराचा स्वामी जर सहाव्या घराच्या स्वामी बरोबर चांगल्या संबंधात असेल तर जातकास कर्ज घेतल्याने फायदा होईल आणि तो ते कर्ज मुदतीत परत करू शकेल.

म्हणजेच त्याला कर्ज यशदायी ठरते. कर्जामुळे त्याचे काम साधते आणि त्याला समृद्धी मिळते; परंतु जर बारावे घर आणि पाचवे घर यांचा परस्पर संबंध जुळत असेल तर जातक कर्ज घेतलेले पैसे उधळून टाकतो आणि कफल्लक होऊन बसतो.

कर्ज घ्यावे की नाही? किती घ्यावे? कुठल्या तारणावर घ्यावे? यासाठी प्रथम जातकाचा व्यवसाय आणि त्याची कुंडली ह्यांचा मेळ घालणे जरुरीचे असते.

हस्तरेषा व्यक्तीच्या प्रवृत्तीचे चांगले संकेत देतात. जातकाने कर्ज घयावे काय? जातकास कर्ज फायदेशीर होईल काय? जातक कर्जाची परतफेड करू शकेल काय? कर्जाची परतफेड करण्याची इच्छा आहे की नाही? इत्यादी प्रश्नांची उत्तरे आपल्याला यातून मिळू शकतात.

आपल्या पतीला त्याच्या उद्योगासाठी कर्ज जरुरीचे आहे आणि ते फायदेशीर पण आहे. ते जो पैसा कर्जाऊ घेत आहेत तो सर्व व्यवसायात टाकत आहेत. कर्ज वाढले आहे हे आपल्या लक्षात आले, व्यवसाय वाढला आहे हेदेखील लक्षात आले. पण आपली मालमत्तादेखील वाढली आहे हे ध्यानात नाही आले.

बँक मालमत्तेवर कर्ज देते. हे केवळ तेव्हाच होईल जेव्हा उत्पादनक्षम कार्यात पैसा खर्च केला जाईल. जर त्यांनी पैशाचा वापर बरोबर न केल्यास पैसे खर्च केले तरी मालमत्ता कधीच वाढली नसती.

तर सर्वप्रथम, घाबरण्याचे काही कारण नाही. हरीशभाई यांच्या बाबतीत व्यवसायासाठी अधिक कर्ज आणि कर्जाला व्यवसाय उत्तम. आता हरीशभाई कृपया आपल्या व्यवसायाची cycles त्यांना सांगा.

हरीशभाई : मी माझे ग्राहक विचारपूर्वक घेतले आहेत. ते संपूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवतात. इंटरनेट आणि क्रेडीट कार्डद्वारे ते सहजपणे तिकिटे बुक करू शकतात आणि काहीवेळा त्यांना ऑफर येतात त्या माझ्या ऑफर पेक्षा स्वस्त असतात. तरीही ते त्यांच्या सर्व समस्यांवर एक थांबा उपाय म्हणून माझ्याकडे येतात. आम्ही त्यांना चांगली सेवा देतो.

पुढील आरक्षण, हॉटेल आरक्षणे आणि विविध शहरांमध्येही टॅक्सी आरक्षणे किंवा रद्द करणे इत्यादी प्रकाराने सहज हाताळतो. आम्ही त्यांची वैयक्तिक पसंत ओळखतो आणि बुकिंग करताना ते लक्षात ठेवतो. आम्ही त्यांना त्यांच्या कौटुंबिक सुट्ट्यांचे डिझाईन करण्यास मदत करतो. आज लोक आता दूरचे प्रवास करतात. जास्त वेळा प्रवास करतात.

व्यवहारांचे प्रमाण आणि संख्या दोन्ही बरीच वाढली आहे. माझ्या व्यवसायात सर्व पुरवठादार रोखीने व्यवहार करतात तर सर्व ग्राहक उसनदारीवर. त्यामुळे मला खेळते भांडवल जास्त लागते. आम्ही आमच्या पुरवठादारांना लगेच पैसे देतो आणि आमच्या ग्राहकांना महिन्याच्या पाच तारखेस बिल देतो.

ते आम्हाला महिनाअखेरपर्यंत पैसे देतात. त्यामुळे आम्हाला 60 दिवसांचे भांडवल अधिक लागते. जे जरुरीचे आहे. यासाठे मला कर्ज घेणे जरुरीचे आहे. जसे ग्राहक वाढले, जराजा वाढल्या तसे तसे कर्ज वाढत गेले आहे; परंतु याचा मला पुरेपूर मोबदला माझ्या फी मधून मिळतो.

त्याबद्दल तक्रार नाही. जेव्हा काही क्लायंट आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होत असतात तेव्हा अचानक बिले खूप वर जातात. त्याआधीदेखील कर्जात वाढ करून ठेवणे जरुरीचे असते.

आता सुमितभाभीचा चेहरा उजळला होता.

जर तुमच्यातील काही ग्राहक पळून गेले तर काय?

पहा, मी प्रत्येक ग्राहकाला आर्थिक मर्यादा घातली आहे. त्यांना देखील हे माहित आहे. जर त्यांनी मर्यादा ओलांडली तर आम्ही देयक करण्याविषयी विचारतो. वैयक्तिक ग्राहकांच्यादृष्टीने ही रक्कम मर्यादित असून सर्व ग्राहकांची रक्कम एकत्रित केल्याने एकूण मोठी वाटते.

त्यामुळे जरी एक वा दोन ग्राहक पळून गेले तरी आपण ते नुकसान सहन करू शकू. हा विचार आधीच केला आहे. आणि अर्थातच या सर्व मध्यम आकाराच्या कंपन्यांना आहेत. त्यामुळे एकाच वेळी त्या सर्व बंद पडण्याची असल्याची शक्यता फार कमी आहे.

पुन्हा असे घडले तरीही, अगदी वाईट परिस्थितीत, बँक आमच्याकडे येऊ शकते. आणि आमची जागा ताब्यात घेऊ शकते. तरीही आमचे घर आणि वैयक्तिक बँक बॅलन्स सुरक्षित राहतील आणि जर बँक तसे करेल तर खरं तर बँकांनी आम्हाला मालमत्ता परत विकून पैसे परत करावे लागतील.

त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. We are very well within our means (आम्ही अंथरून पाहून पाय पसरले आहेत तेव्हा काळजीचे कारण नाही. आम्ही अंथरून पाहून पाय पसरले आहेत. अतिशय महत्वाचे वाक्य आहे हे.

आपण कोणत्याही व्यवसायात काम करता तेव्हा आपल्याला आपले साधन, साधनसंपत्ती, ताकद हे कसे व किती आहे हे तपासायचे आहे आणि आपण त्यामध्येच राहू हे पाहणे आवश्यक आहे. याचा अर्थ वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळा असतो.

त्यामुळे एखाद्या व्यवसायाची सुरुवात करताना आपल्या मित्राने अशाच प्रकारचा व्यवसाय सुरू केला आणि श्रीमंत झाला असे म्हणून उपयोगाचे नाही. आपली ताकद काय. आपल्या कुटुंबाची शक्तिस्थाने कोणती. आपल्याला कुठला व्यवसाय उत्तम.

या व्यवसायास किती कर्जाची आवश्यकता लागेल. आपल्या कुंडलीस कर्जापासून फायदा आहे की तोटा. कर्ज अल्पमुदतीचे घ्यावे की दीर्घ मुदतीचे, कर्ज कोणाकडून घ्यावे शासन, पतपेढी की मित्र.

कर्ज कुठल्या कामासाठी किंवा साधनसामग्रीची घ्यावे इत्यादी गोष्टीचा विचार आपल्या करावा लागतो. याप्रकारे वर्तन केल्यास आपण आपल्या अंथरुणात तर राहतोच आणि पाय पण पुरेपूर पसरू शकतो.

– आनंद घुर्ये
9820489416

Author

  • आनंद घुर्ये

    आनंद घुर्ये हे लौकिकदृष्ट्या अभियंता व एमबीए असून अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ पातळीवर नोकरी केली आहे. थायलंड येथे नोकरीनिमित्ताने असताना अनेकांनी त्यांना भारतीय प्राचीन संस्कृतीबद्दल प्रश्न विचारले. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञानाचा अभ्यास सुरू केला. तसेच ते ज्योतिषी म्हणूनही कार्यरत आहेत. उद्योग ज्योतिष हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.