स्मार्ट उद्योजक : ११ वर्षांचा विश्वास, तपपूर्ती वर्षात नवी झेप

Smart Udyojak magazine Anniversary

आजच्या श्रीराम नवमीच्या शुभदिनी, ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाने ११ वर्षांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करून बाराव्या वर्षात पदार्पण करत आहे, याचा आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो.

या ११ वर्षांच्या प्रवासात स्मार्ट उद्योजकने संपूर्ण महाराष्ट्रभर आपला ठसा उमटवला आहे. आज आमच्याकडे १५,०००+ वर्गणीदारांचा मजबूत परिवार आहे, तसेच सोशल मीडियावर २ लाखांहून अधिक लोक आमच्याशी जोडले गेले आहेत.

या कालावधीत देशाने जीएसटीचे अंगीकरण, नोटबंदी, तसेच कोव्हिडसारखी मोठी स्थित्यंतरं अनुभवली. या प्रत्येक टप्प्यावर स्मार्ट उद्योजकने उद्योजकांना योग्य मार्गदर्शन करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. आगामी काळातही कोणतेही बदल किंवा आव्हाने आली, तरी उद्योजकांसोबत खंबीरपणे उभे राहण्याची आमची वचनबद्धता कायम राहील.

बाराव्या वर्षात, म्हणजेच या तपपूर्तीच्या वर्षात, आम्ही काही महत्त्वाचे उपक्रम सुरू करत आहोत :

स्मार्ट उद्योजकची हिंदी आवृत्ती
‘स्मार्ट उद्योजक – इंडिया बिझनेस डिरेक्टरी’ : राष्ट्रव्यापी प्रसिद्धी आणि नेटवर्किंगसाठी एक सक्षम व्यासपीठ
• तसेच लोकोपयोगी विषयांसाठी स्वतंत्र ‘लोकोपयोगी’ मासिक सुरू करण्याचा आमचा मानस आहे

हा संपूर्ण प्रवास वाचक आणि जाहिरातदार यांच्या अमूल्य सहकार्यामुळेच शक्य झाला आहे. यापुढेही तुमचे प्रेम, विश्वास आणि साथ आम्हाला अशीच मिळत राहील, अशी आम्हाला खात्री आहे.

धन्यवाद!

शैलेश राजपूत
संस्थापक व संपादक

Author

  • shailesh rajput

    हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण घेऊन २००७ साली पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार, असा विचार करून यावर उपाय म्हणून २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

    View all posts

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak India Business Directory
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?