1007 annual marketing

जीएसटी सुधारणांमुळे सामान्य माणसाला दिलासा; कररचना सुलभ, जीवनावश्यक वस्तू स्वस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेल्या पुढील पिढीच्या जीएसटी सुधारणांना जीएसटी परिषदेने मंजुरी दिली आहे. या सुधारणा सामान्य माणसाच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि लहान व्यापारी व व्यावसायिकांसाठी व्यवसाय सुलभ करण्यासाठी निर्माण केल्या आहेत. या सुधारणांमुळे कररचना सुलभ होईल आणि अनेक वस्तू व सेवांवरील कर कमी होऊन सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

जीवनावश्यक वस्तूंवरील करात कपात :

हेअर ऑइल, साबण, टूथपेस्ट, सायकल, भांडी यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंवरील जीएसटी १८% किंवा १२% वरून ५% करण्यात आला. यूएचटी दूध, पनीर, चपाती, पराठा यांसारख्या खाद्यपदार्थांवरील जीएसटी ५% वरून पूर्णपणे माफ (निल) करण्यात आला. पास्ता, नमकीन, चॉकलेट, कॉर्नफ्लेक्स, बटर, तूप यांसारख्या खाद्यपदार्थांवरील जीएसटी १८% किंवा १२% वरून ५% करण्यात आला.

विमा आणि आरोग्य सेवांना प्रोत्साहन :

सर्व वैयक्तिक जीवन विमा पॉलिसी (टर्म लाइफ, यूलिप, एंडोव्हमेंट) आणि आरोग्य विमा पॉलिसींवरील (कुटुंब आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी) जीएसटी पूर्णपणे माफ करण्यात आला. यामुळे विमा स्वस्त होईल आणि अधिक लोकांना विम्याचे संरक्षण मिळेल.

WhatsApp Channel Banner

३३ जीवनरक्षक औषधांवरील जीएसटी १२% वरून माफ, तर ३ कर्करोग आणि दुर्मिळ रोगांच्या औषधांवरील जीएसटी ५% वरून माफ. सर्व औषधांवरील जीएसटी १२% वरून ५% करण्यात आला. वैद्यकीय उपकरणे, डायग्नोस्टिक किट्स, ग्लुकोमीटर यांसारख्या उपकरणांवरील जीएसटी १८% किंवा १२% वरून ५% केला.

शेती आणि हस्तकलेला चालना :

ट्रॅक्टर, शेतीसाठी लागणारी यंत्रे, हस्तकला, मार्बल, ग्रॅनाईट आणि लेदर वस्तूंवरील जीएसटी १२% वरून ५% केला. खत उद्योगातील सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड आणि अमोनियावरील जीएसटी १८% वरून ५% केला.

ऑटोमोबाइल आणि इतर वस्तूंवरील कर कमी :

छोट्या कार, ३५० सीसीपर्यंतच्या मोटरसायकल, बस, ट्रक, अँब्युलन्स यांवरील जीएसटी २८% वरून १८% केला. सर्व ऑटो पार्ट्सवर एकसमान १८% जीएसटी लागू. सिमेंटवरील जीएसटी २८% वरून १८% आणि ३२ इंचांपर्यंतच्या टीव्ही, एसी, डिशवॉशर यांवरील जीएसटी २८% वरून १८% केला.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

सेवांवरील कर कपात :

₹७,५०० रुपये दिवसा किंवा त्यापेक्षा कमी किंमतीच्या हॉटेल निवासावरील जीएसटी १२% वरून ५% केला. जिम, सलून, योग केंद्र, ब्युटी पार्लर यांसारख्या सेवांवरील जीएसटी १८% वरून ५% केला.

सुलभ कररचना :

सध्याची चार स्तरांची कररचना बदलून दोन स्तरांची ‘सिंपल टॅक्स’ रचना लागू. यात १८% मानक दर आणि ५% मेरिट दर असेल. काही निवडक वस्तूंवर ४०% डी-मेरिट दर लागू राहील.

जीएसटी अपील लवाद :

जीएसटी अपील लवाद (GSTAT) सप्टेंबर २०२५ च्या अखेरीस कार्यान्वित होईल आणि डिसेंबर २०२५ पर्यंत सुनावणी सुरू होईल.

कधीपासून लागू?

या नव्या जीएसटी दर सुधारणा २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील.

जीएसटी परिषदेची बैठक :

५६वी जीएसटी परिषदेची बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत पार पडली. या सुधारणांमुळे सामान्य माणूस, मध्यमवर्ग, शेतकरी आणि लहान व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. तसेच, यासंदर्भातील शंकांचे निरसन करण्यासाठी FAQs देखील जारी करण्यात आले आहेत.

या सुधारणांमुळे करप्रणाली अधिक पारदर्शी आणि नागरिकांना परवडणारी होईल, तसेच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Table of Contents

Author

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा