Advertisement
उद्योगसंधी

अल्टरनेटिव्ह मेडिसीन प्रचंड संधी असणारे उद्योगविश्व

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

परवा सायकलवरून पडून कॉलनीतील एका मुलाचा पाय मुरगळला, सूज आली. त्याला पटकन शेजारील डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने पाय फ्रॅक्चर असल्याची शंका व्यक्त करून एक्सरे वगैरे काढण्यास सांगितले. रिपोर्टही साधारण पाय फ्रॅक्चर आहे असा आला होता. तेव्हा त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. हॉस्पिटलने सर्व तपासणीचे बिल ३ हजार रुपये केले व ऑपरेशनचा खर्च सुमारे १ लाख ९० हजार रुपये सांगितला. कोणताही रक्तस्राव नव्हता तेव्हा ऑपरेशनची गरज नाही असे मला मनात कुठून तरी वाटत होते.

मी मुलांच्या वडिलांना एक चान्स म्हणून फिजिओथेरपीस्टकडे एकदा दाखवण्यास सांगितले, जे मैदानी खेळात हात, पाय मुरगळला, हाड सटकले तर ते बरे करतात. मग त्या मुलाला फिजिओथेरपीस्टकडे दाखवले. त्यांनी, बाब फार गंभीर नसून आठ दिवस मसाज घेतल्यास ठीक होईल, असे सांगितले. एकूण खर्च रुपये फक्त २४०० आणि मुलगा ठणठणीत बरा झाला.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

माझ्या सल्ल्याचा असा एखाद्याला फायदा झाल्याचे पाहून खूप समाधान व तो मुलगा ठीक झाला हे कळताच त्या दिवशी मला शांत झोप लागली (का कुणास ठाऊक), त्यामुळे अशा अल्टरनेटिव्ह मेडिसीनच्या व्यवसायातून अनेक जणांचे प्राण वाचवण्याचे पुण्य तुम्हास मिळेल व पैसाही मिळेल.

अल्टरनेटिव्ह मेडिसीन म्हणजे..

अशी कोणतीही आरोग्यविषयक थेरपी, सेवा, उत्पादन ज्यांचा उपयोग आरोग्यविषयक विविध आजारांवर उपाय म्हणून अनुभवाने-अनुभूतीने उपचार करणार्‍याच्या व उपचार घेणार्‍याच्या श्रद्धेने प्रचलित झाला आहे. अशा प्रकारच्या उपचार पद्धतीला कोणतेही ठोस शास्त्रीय प्रमाण नसते; परंतु करोडो लोकांना होत असणार्‍या फायद्यामुळे अशा औषध व उपचार पद्धतीवर लोकांचा मोठा विश्वास बसत आहे.

व्यवसायवाढ

हा व्यवसाय पूर्ण जगभर वाढत आहे. अगदी अमेरिकेसारख्या प्रगत देशातसुद्धा ५० बिलियन डॉलर्सचे मार्केट या व्यवसायाचे आहे. भारतात केवळ ५ ते १०% लोक श्रीमंत आहेत जे महागडे डॉक्टर, हॉस्पिटल व औषधे यांचा खर्च पेलू शकतात. शिवाय नवीन उपचार, मशीनरी, हाइप्रोफाइल हॉस्पिटलच्या नावाखाली पेशंटची प्रचंड लुबाडणूक लोकांना दूर नेत आहे. शिवाय एवढे पैसे खर्च करून उपचाराची कोणतीही गॅरंटी हे मोठे डॉक्टर-हॉस्पिटल देत नाहीत.

उदा. गुडघ्याचे व मणक्याचे ऑपरेशन झाल्यावर जवळजवळ ७०% हून अधिक पेशंट्सना त्रास कमी होत नाही. उलट त्रास वाढण्याच्या बर्‍याच पेशंट्सच्या तक्रारी असतात. त्यापुढे भारतात गरीब नव्हे तर श्रीमंत लोकही आता आयुर्वेद, थेरपी, रेकी, होमिओपॅथीसारख्या उपचाराकडे वळले आहेत.

व्यवसाय आकडेवारी व क्षेत्रे

हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.

केवळ भारतात अल्टरनेटिव्ह मेडिसीनचे मार्केट २१,००० कोटींचे असल्याचा अंदाज आहे. ह्यात बर्‍याच मोठ्या ऑर्गनाइज्ड कंपन्या ब्रँड असून त्याहून जास्त असंघटित वैद्य, आयुर्वेदिक डॉक्टर, छोट्यामोठ्या थेरपीस्ट व क्षेत्रीय भागात उपचार व उत्पादने विकणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत.

ह्यामध्ये अ‍ॅक्युपंक्‍चर, प्रेशर, अल्टरनेटिव्ह कॅन्सर ट्रीटमेंट, अ‍ॅस्ट्रॉलॉजी, आयुर्वेद, मसाज थेरपी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, योगा, रेकी सायकोथेरपी, फेंगशुई, फादर थेरपी, हॉलिस्टिक लिव्हिंग, मड थेरपी, अरोमा व स्टीम थेरपी, युनानी, साऊंड थेरपी इत्यादी अनेक थेरपीज आहेत. ह्या थेरपी उपकरणे, पुस्तके, डीव्हीडी, वेबसाइट उत्पादने सेमिनारच्या माध्यमातून जगभर व्यवसाय करत असतात.

कसा कराल व्यवसाय

ह्या पद्धतीच्या व्यवसायात पदार्पण करण्यासाठी तुम्हाला डॉक्टर असण्याची काहीही गरज नसते. तुम्हाला फार्मा कंपनीप्रमाणे खूप मोठ्या रीसर्च लॅब कंपनी व लायसन्सची परवानगी लागत नाही. हा व्यवसाय कमी सर्वसाधारण फर्मची नोंदणी करून व लागणार्‍या बेसिक परवानग्या घेऊन चालू करू शकता. अल्टरनेटिव्ह थेरपी उत्पादनांमध्ये बर्‍याच अशा छोट्या कंपन्या आहेत, परंतु ज्यांच्याकडे मार्केटिंगचे चांगले कौशल्य नाही त्यांचे तुम्ही मार्केटिंगचे काम करू शकता. ई-कॉमर्सद्वारे ही उत्पादने संपूर्ण जगभर विकू शकता.

तुमच्या पाहण्यात खेडेगावात असे एखादे औषध नजरेस पडल्यास किंवा माहिती झाल्यास तुम्ही त्याचे चांगले उत्पादन करून स्वत:चा ब्रँड बनवून जगभर विकू शकता. यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून देणार्‍या तुम्हाला खूप कंपन्या भेटतील. तुम्हाला त्यासाठी फॅक्टरीही चालू करावी लागत नाही. बाजारात असणार्‍या ६०% हून अधिक औषध कंपन्यांकडे फॅक्टरी नसते.

व्हाइट लेबलिंग

तुम्ही असे अनेक अल्टरनेटिव्ह उपचार, औषधे एकत्र करून पुढे स्वत:च्या ब्रँडने विकू शकता. तुम्ही तुमच्या एखाद्या इ-कॉमर्स वेबसाइटवरून असे हजारो अल्टरनेटिव्ह मेडिसीन विकू शकता. सर्वसाधारण या उत्पादनामध्ये ५०% हून अधिक मार्जिन असते. असे हजारो वैद्य व छोटे व्यावसायिक आहेत ज्यांच्याकडे असे अल्टरनेटिव्ह मेडिसीन आहेत, पण मार्केटिंगची सुविधा नाही.

तसेच या क्षेत्रात उपकरणांचे मार्केट खूप मोठे आहे. त्यात घरबसल्या व्यायाम, वेट लॉस, स्टीमबाथ, शेक, मॅग्नेटिक उपकरणे, मसाज उपकरणे इत्यादी अशी हजारो प्रकारची उपकरणे तुम्ही विकू शकता. ही उपकरणे शक्यतो चीनमधील असतात. यात ३०% हून अधिक प्रॉफिट आहे.

पुढील दहा वर्षे

ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोक ह्या अल्टरनेटिव्ह मेडिसीनकडे आवर्जून जात आहेत त्या अनुमानानुसार ही इंडस्ट्री प्रचंड वेगाने वाढणार आहे, अलीकडेच पतंजली ब्रँडचा व्यवसाय केवळ २ वर्षांत तिप्पट झाला आहे, तो येत्या १० वर्षांत १ लाख कोटींचा टप्पा पार करेल. अल्टरनेटिव्ह प्रॉडक्टमध्ये अगदी लहानसहान कंपन्यासुद्धा काही कोटींचा व्यवसाय करू लागल्या आहेत.

आज प्रत्येक जिल्हा, तालुका स्तरावर अनेक उद्योजक स्वत:ची उत्पादने तयार करीत आहेत व अशा उत्पादनांना स्थानिक लोकांचा चांगला सहभाग व प्रतिसाद मिळत आहे. असे छोटे व्यावसायिकही सहजरीत्या २५-५० लाखांचा व्यवसाय प्रतिवर्षी करत आहेत.

एक साधा मसाज थेरपीस्ट महिना २५-४० हजार कमावतो आहे. एक योगा टीचर महिनाकाठी ४० ते ५० हजार कमवत आहे. अनेक आयुर्वेदिक डॉक्टरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वत:चे उत्पादन आणले पाहिजे.

एखादे उत्पादन नावारूपाला आले की तोच व्यवसाय काही कोटी रुपयांपर्यंत जातो, कारण भारताची लोकसंख्या १२५ कोटी आहे, त्यातील फक्त ५% लोकांनाच महागडे उपचार परवडतात. इतर ९५% ही अल्टरनेटिव्ह मेडिसीनकडे वळतात. तर ह्या परिस्थिती व संधीचा फायदा घेऊन बहुसंख्य तरुण, उद्योजक, विद्यार्थी, महिला यांनी ह्या अल्टरनेटिव्ह मेडिसीनच्या व्यवसायात उतरावे.

– प्रा. प्रकाश भोसले


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!