उद्योगसंधी

बेकरी उद्योग

स्पेशल ऑफर : ₹५०० प्रिंट मासिकाची वार्षिक वर्गणी भरा आणि डिजिटल अंकात अर्ध पान रंगीत जाहिरात मोफत मिळवा!
Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

बहुतेकांची उद्योग करण्याची इच्छा असते. त्यातूनच अनेक जण उद्योग सुरूही करतात पण यशस्वी होतीलच याची खात्री नसते. जे योग्य उद्योगसंधी शोधतात तेच त्याचे सोने करतात. उद्योगाची निवड कशी करावी, हा खूप मोठा प्रश्न अनेकांसमोर असतो.

बेकरी उद्योग हा आजघडीला भारतात खूप मोठ्या प्रमाणात संधी असलेला उद्योग आहे.

बेकरी उत्पादनांची मागणी दिवसागणिक वाढतेय. ढोबळमानाने धान्याची पिठे भिजवून, मळून, आंबवून व भाजून तयार करण्यात येणार्‍या खाद्यपदार्थांना बेकरी उत्पादने म्हटले जाते.


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://imojo.in/3x3a5zn


बेकरी उत्पादने म्हटले की आपल्या डोळ्यासमोर प्रथम येते ते म्हणजे बिस्किट, पाव, केक, पेस्ट्रीज्, कुकीज् अशा प्रकारची एक ना अनेक प्रकारची उत्पादने बाजारात लोकांना आकर्षित करतात. त्यामुळे योग्य संधी आणि निर्णय याची सांगड घालून या उद्योगात उतरल्यास यश नक्कीच मिळेल.

एखादा उद्योग करायचा निर्णय झाला तरी त्यासाठी प्रचंड मेहनत, बाजारपेठेचे सर्वेक्षण, उत्पादनाची माहिती, त्याविषयी ज्ञान व कौशल्य मिळवणे खूप गरजेचे असते. प्रथम त्याची माहिती घ्या. बेकरी उद्योगासाठी मध्यम स्वरूपाचे भांडवल लागते. मनुष्यबळ कमी लागते. याला कौशल्य आणि ज्ञानाची योग्य जोड दिली तर यशस्वी बेकरी उद्योग उभा करता येऊ शकतो. प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान व तंत्रज्ञान असतेच, त्याची योग्य सांगड व्यवसायात केल्यास दर्जेदार उत्पादन करता येईल.

बेकरी उत्पादनांत मुख्यत्वे पीठ, पाणी, अंडी, दूध, मीठ, लोणी, मार्गनिन, साखर, मलई, क्रीम, यीस्ट याशिवाय इतरही काही पदार्थांची आवश्यकता असते. याचा योग्य अभ्यास किंवा प्रशिक्षण घेतल्यास उत्तम. बेकरी उत्पादनांतील वैविध्य पाहता मोजक्या किंवा एखाद्या उत्पादनाला डोळ्यासमोर ठेवून त्याचा उद्योग सुरू करण्याचा मार्केटचा ट्रेंड आहे.

कोणत्या प्रकारचा बेकरी उद्योग सुरू करायचा? कोणते प्रकार असतात? याची माहिती आपल्याला असली पाहिजे.

जसे की ढोबळपणे चार प्रकार असतात
हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.
  • काऊंटर सर्व्हिस बेकरी : ग्राहक तुमच्या दुकानात येऊन हवा तो माल खरेदी करून जाईल.
  • स्पेशालिटी सर्व्हिस : एखाद्या उत्पादनात स्पेशालिटी करून त्याचेच उत्पादन लोकांना विकायचे. उदा. केक. म्हणजेच केवळ केक शॉप. त्यामध्ये वेगवेगळे आकार, रंग, फ्लेवर असलेले फक्त केकच मिळतील.
  • सीट डाऊन बेकरी : म्हणजे जसे की कॉफी शॉपच्या धरतीवर आधारित बेकरी शॉप; या बसा हवे ते ऑर्डर करा आणि तिथेच बसून त्याचा स्वाद घ्या.
  • ऑनलाइन बेकरी : आजच्या डिजिटल युगात घरबसल्या एका क्‍लिकसरशी लोक खरेदी करतात. त्यातून खाद्यपदार्थही सुटलेले नाहीत. त्यांनाही ऑनलाइनच्या दुनयेत खूप मागणी आहे. त्यामुळे ऑनलाइन आपले उत्पादन लोकांसाठी उपलब्ध करून देणे.
स्वतःचा व्यवसायाचा आराखडा म्हणजेच बिझनेस प्लॅन तयार करा.

व्यवसायासाठी योग्य नाव शोधा. आवश्यक परवाने घ्या. जागेची निवड करा. त्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचा बेकरी उद्योग करावयाचा आहे याचे स्पष्ट चित्र समोर असायला हवे. वर म्हटल्याप्रमाणे तुम्हाला कॉफी शॉपसारखे बेकरी शॉप करायचे असेल तर त्यानुसार त्याची मांडणी, टेबल, प्रतीक्षा खोली, किचन, अशी त्याची रचना करण्याच्या दृष्टीने जागेची निवड करावयास हवी.

जर तुम्हाला केवळ बेकरी उत्पादनांचे दुकान सुरू करावयाचे आहे तर त्यानुसार जागा निवडा. जागा निवडताना अजून एक मुख्य घटक लक्षात घ्यावयास हवा तो म्हणजे आजूबाजूला आपला ग्राहकवर्ग कशा प्रकारचा आहे. ग्राहकांना काय आवडते याचा अभ्यास हवा.

बेकरीसाठी लागणार्‍या यंत्रांची निवड आणि त्याची गुंतवणूक करताना योग्य अभ्यास आणि माहिती करून घ्यावी. यासाठी विविध प्रकारची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून लगेच मिळू शकेल. कोणताही उद्योग एका रात्रीत मोठा होत नाही. त्यासाठी त्याला त्याचा योग्य तो वेळ आपण द्यावयास हवा त्याचप्रमाणे उद्योगाचे प्लानिंग आवश्यक असते. संयमाने आणि शांततेने त्याचे पालन करा.

आपल्या उत्पादनाची योग्य किंमत ठरवा.

मेनू कार्ड तयार करा. उद्योगाची माहिती आपल्या आजूबाजूच्या परिसरात होण्यासाठी त्याची योग्य प्रकारे प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. त्यासाठी पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या प्रसारमाध्यमांचा उपयोग करून आपल्या उद्योगाची जाहिरात करा. आज डिजिटल मीडिया खूप मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम आहे. त्याचा योग्य वापर उद्योगवाढीसाठी करा.

उद्योगासाठी आवश्यक असते ते म्हणजे भांडवल.

योग्य बिझनेस प्लान आणि योग्य निर्णय असेल तर तुम्ही गुंतवणूक करू इच्छिणार्‍या बँक, एनबीएफसीज्, गुंतवणूकदार आदींना तुमचा प्लान दाखवून त्याप्रमाणे भांडवल उभे करता येईल.

कोणताही उद्योग यशस्वीपणे उभा राहण्यासाठी आवश्यकता असते ती कुशल कामगारांची. आपल्या उद्योगाला आवश्यक त्यानुसार गरज ओळखून चांगल्या आणि कुशल कामगारांची निवड करा.

– प्रतिभा राजपूत

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

WhatsApp chat
error: Content is protected !!