स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
पुढील ५ ते १० वर्षांत ४ वर्षांच्या मुलापासून ते ८० वर्षांच्या वृद्धापर्यंत प्रत्येक जण ऑनलाइन असेल. ८० टक्क्यांहून अधिक व्यवहार ऑनलाइन होतील. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, दहशतवाद संपवण्यासाठी सर्व जग डिमॉनिटायझेशनच्या बाजूस झुकत आहे. नायझेरियासारख्या गरीब देशानेसुद्धा हा मार्ग स्वीकारला पाहिजे; पण त्याबरोबरच आपण पाहतो की, या क्षेत्रात सायबर सिक्युरिटी हा भाग खूप महत्त्वाचा झाला आहे.
आपण तिजोरीला कुलूप लावू, दागिने लॉकरमध्ये ठेवू, सोसायटीसमोर वॉचमन ठेवू, चौकाचौकांत पोलीस असतील, सीमेवर सैनिक असतील, पण तुमचे ईमेल आयडी, सोशल मीडिया अकाऊंट, बँकेचे पासवर्ड, मोबाइल पासवर्ड इत्यादीची सुरक्षितता याचा प्रश्न आहे, तो कसा हाताळणार?
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox
आज या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे हायटेक गुन्हेगार निर्माण झाले आहेत. ते तुमच्या नेट बँकिंग, क्रेडिट कार्डवर डल्ला मारतात. मोठमोठ्या बँकांचे वेबसाइट हॅक करतात. काही महिन्यांपूर्वी सुमारे ५ लाख डेबिट कार्ड्स हॅक झाले होते तेव्हा बँकेला सर्व ग्राहकांना नवीन डेबिट कार्ड्स देण्यात आले, हे इतके मोठे दरोडेखोर तयार होत आहेत.
अशा अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी सायबर सिक्युरिटी क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात ज्ञान व कौशल्ये असणारी मॅनपॉवरची गरज निर्माण झाली आहे. आज महाराष्ट्रात बी.सी.ए., बी.ई, एम.बी.ए., आयटी., बी.टेक. असे अनेक कोर्सेस केलेली मुलं नोकरीच्या शोधात आहेत. विद्यापीठाला शिकवला जाणारा पारंपरिक अभ्यासक्रम सध्याच्या प्रॅक्टिकल जगात मेळ खात नाही, त्यामुळे 3% मुलांनासुद्धा नोकर्या मिळत नाहीत.
कॉलेजला असल्यापासूनच मुलांना पुढील ५ ते १० वर्षांत अशा क्षेत्रात कोणकोणत्या विषयावर चांगले डिमांड येणार आहे ह्याचा अंदाज घेऊन त्या दृष्टीने आपले ज्ञान वाढवत ठेवावे. त्यासंबंधी छोटे-मोठे कोर्सेस, सेमिनार, प्रदर्शने यांना भेटी द्याव्यात. आज तंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी फारसे भांडवल लागत नाही, तुमचे ज्ञान व कौशल्यच खूप मोठे भांडवल असते. त्या आधारावर भारत,अमेरिका, कॅनडा, यूके, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया अशा कोणत्याही देशात तुम्हाला संधी मिळते.
आज विदेशात सायबर सिक्युरिटी क्षेत्रात काम करणारे दरमहा ६ ते ९ हजार डॉलर्सची कमाई करतात. चीनमधील तरुणांनी यात आघाडी घ्यायला सुरुवात केली आहे. आपल्या इंजिनीअरिंग आयटी क्षेत्रातील तरुणांनी विद्यापीठ सिलॅबसकडे फारसे लक्ष न देता पुढे कशाला स्कोप आहे यात लक्ष द्यावे. बारावीनंतर ऑनलाइन डिग्री कमी पैशात मिळते, हाच वेळ व पैसा सायबर सिक्युरिटीसारख्या क्षेत्रात करीअर करण्यासाठी वापरा म्हणजे तुम्हाला हमखास यश मिळेल.
– प्रा. प्रकाश भोसले
९८६७८०६३९९
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.