Advertisement
उद्योगसंधी

मोठी बाजारपेठ उपलब्ध असलेली लेदर इंडस्ट्री

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


भारत हा चामडे उद्योग म्हणजेच लेदर इंडस्ट्रीत जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर आहे. जगाच्या १२.९३% लेदर शेअर हा भारताचा असून भारतात स्थानिक पातळीवरसुद्धा चामड्याच्या उत्पादनांना खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. विविध प्रकारच्या चामड्याच्या वस्तूंना जसे की, चामड्याचे बूट, चप्पल, चामड्याचे जॅकेट्स, बॅग्ज, विविध प्रकारच्या अ‍ॅक्सेसरीजना आज खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

बदलत्या काळानुसार फॅशन जगतात खूप मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मागील काही वर्षांपासून लेदर इंडस्ट्रीतही मोठ्या संधी तयार झाल्या आहेत. जर आपण जागतिक क्रमवारीचा विचार केला तर फुटवेअर आणि लेदरचे कपडे, जॅकेट्सच्या उत्पादनात भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्यामुळे चामडे उद्योगात सर्वाधिक रोजगाराच्या संधी आज उपलब्ध आहेत.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

या उद्योगाचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे या क्षेत्रात महिलांचा सहभागही वाखाणण्याजोगा आहे. जगातील ९०% चामडे उद्योगातील कच्चा माल हे पशू आणि प्राणी यांच्या कातड्यांपासून मिळते. मेंढा, बकरी, घोडा, कांगारू, हरिण अशा प्राण्यांपासून कातडे उपलब्ध होते.

भारतात यावर प्रक्रिया करून विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. भारतातील तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कोलकाता आदी प्रमुख राज्यांत ही इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात विस्तारते आहे. भारताचा जपान, कोरिया, चिली आदी देशांसोबत लेदरच्या व्यापार आणि निर्यातीसंदर्भात करार झालेला आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात आज भारतात संधी उपलब्ध आहेत.

भारतात कच्चा माल, या क्षेत्रातील कौशल्य, कुशल कामगार हे इतर देशांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आणि पर्यायाने स्वस्तात उपलब्ध आहे. लेदरचे शूज, चप्पल हे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात मागणी असलेले उत्पादन आहे. येत्या काळात ही मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरही फूटवेअर निर्माण म्हणजेच उत्पादनात मोठ्या संधी आहेत याचा विचार उद्योगात येणार्‍यांनी जरूर करावा.

वाढती मागणी आणि गरज याचा विचार करता योग्य अभ्यास करून या क्षेत्रात उतरल्यास एक खूप मोठी बाजारपेठ देशात आणि देशाबाहेरही खुली आहे. स्थानिक पातळीवर फुटवेअरसोबतच फॅशन जगतातही अनेक लेदरच्या म्हणजेच चामड्यांच्या वस्तूंना मागणी आहे. लेदरच्या बॅग्ज, पाकीट, पर्स, बेल्ट जॅकेट्स् इ. अनेक प्रकारच्या वस्तूंची मागणी वाढत आहे. त्यामुळे अशा वस्तूंसाठीही खूप मोठी बाजारपेठ आपल्याकडे उपलब्ध आहे.

या क्षेत्रात नव्याने उद्योगात येऊ इच्छिणार्‍यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आपले सरकारही यासाठी अनेक पूरक धोरणं राबवत आहे. या क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूकही उपलब्ध आहेत. सरकारच्याही विविध योजना यासाठी उपलब्ध आहेत. भारत सरकार या क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करते. या क्षेत्राविषयी माहिती, अभ्यासक्रम, प्रशिक्षण आदी जास्तीत जास्त माहिती खालील वेबसाइटस्वर उपलब्ध आहे.

  • https://www.fddiindia.com/
  •  https://clri.org/default.aspx
  • http://leatherindia.org/
  • http://www.cftichennai.in/
  • https://dipp.gov.in/indian-footwear-leather-and-accessoriesdevelopment-programme

– टीम  स्मार्ट उद्योजक

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!