प्रगतिशील उद्योग

हे आठ सेलिब्रेटी आहेत एकमेकांचे बिझनेस पार्टनर्स

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


ज्यांनी आपला पैसा गुंतवण्यासाठी इंडियन सुपर लीगचा वापर करून घेतला, अशा सुप्रसिद्ध क्रिकेटपटुंपासून ते सिनेकलाकार, भारतीय दिग्गज यापर्यंत सर्वांनी नजीकच्या काळातच क्रीडा क्षेत्रात आर्थिक गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. पण जेव्हा दोन व्यक्तींचे एकाच गोष्टीवर मत जुळतं, तेव्हा एकत्र येऊन व्यावसायिक भागीदार होण्यातच शहाणपण असते.

अशाच काही भारतीय दिग्गजांची उदाहरणे आपण या लेखात पाहणार आहोत. अक्षय कुमार ते शाहरुख खान हे आठ भारतीय सेलिब्रिटीज एकमेकांचे व्यावसायिक भागीदार आहेत.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

१. अक्षय कुमार आणि राणा डग्गुबाती

एक्शन-थ्रिलर बॉलिवूड चित्रपट ‘बेबी’मध्ये एकत्र दिसलेले अक्षय कुमार आणि बाहुबली फेम राणा डग्गुबाती यांनी वास्तविक आयुष्यातसुद्धा ‘सोशलस्वॅग’ हे ऑनलाईन शॉपिंग पोर्टल सुरू करण्यासाठी हातमिळवणी केली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच याची घोषणा केली गेली आणि फेब्रुवारी २०२१ पासून कार्यरत होणार आहे. हे पोर्टल ग्राहक आणि दिग्गज कलाकार, प्रभावी व्यक्ती आणि इतर प्रेरणादायी व्यक्ती यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करते.

२. महेंद्रसिंग धोनी आणि अभिषेक बच्चन

यापूर्वी म्हटल्याप्रमाणेच, भारतीय दिग्गजांकडून व्यवसायानंतर दुसर्‍या क्रमांकाचा गुंतवणुकीचा पर्याय म्हणून स्पोर्ट्स टीम्सचा विचार केला जातो. सिनेकलाकार आणि उद्योजक अभिषेक बच्चन आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे इंडियन सुपर लीगमधील ‘चैन्नईयन एफ.सी.’ या फुटबॉल संघाचे मालक तर आहेतच, शिवाय मैदानात आपला संघ खेळत असताना ही जोडी प्रेक्षकांमधून त्यांचा उत्साह वाढवतानासुद्धा दिसली आहे. याशिवाय अभिषेक बच्चन हा ‘जयपूर पिंक पँथर्स’ या कबड्डी संघाचेसुद्धा मालक आहे.

३. शाहरुख खान आणि जुही चावला

या जोडीचा पहिला एकत्रित सिनेमा येऊन आता २७ वर्षे होतील. ही जोडी सिनेमातील कामापुरती मर्यादित न राहता सुरवातीला एका दीर्घकालीन मैत्रीमध्ये आणि नंतर व्यावसायिक भागीदारीत बदलली आहे.

‘आयपीएल’मधील एका संघाच्या समान मालकीशिवाय या जोडीने आता ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या चित्रपट निर्मिती संस्थेमध्ये आपले नशीब आजमावले आहे, जी आता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या मालकीची आहे. ‘ड्रीमज अनलिमिटेड’ या नावाने सुरू झालेल्या या संस्थेचे समान मालकी हक्क शाहरुख खान, जुही चावला आणि अझीझ मीरा यांच्याकडे होते.

४. अक्षय कुमार आणि राज कुंद्रा

अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्यामध्ये पूर्वी बॉलिवूडमध्ये खास असे जवळचे नाते नव्हते, पण शिल्पा शेट्टीचे उद्योजक राज कुंद्राशी लग्न झाल्यावर हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. यातूनच त्यांच्यातील व्यावसायिक भागीदारीसाठी नवीन संधी निर्माण झाल्या. २०१५ मध्ये सोनाक्षी सिन्हासोबत, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी एकत्र येऊन पहिल्या भारतीय सेलिब्रिटी टेलीशॉपिंग चॅनेल ‘बेस्ट डील टीव्ही’ची सुरुवात केली.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!