मेणबत्ती व्यवसायात मुबलक संधी

जागतिक बाजारपेठेत सध्या मेणबत्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. २०१० ते २०१९ या दरम्यान या उद्योगात वार्षिक १ टक्के वाढ अपेक्षित आहे आणि बाजारपेठेचा अभ्यास केला तर सध्याच्या मागणीनुसार ५० टक्केचं पुरवठा केला जातोय. या व्यवसायात वेस्ट इंडीज हा देश आघाडीवर आहे.

दिवाळीसारख्या सणांना मेणबत्तीला खूप मागणी असते. केवळ घरातील रोषणाईसाठीच याचा वापर होत नाही तर सध्याच्या काळात सुशोभित वेगवेगळ्या मनमोही मेणबत्ती भेटवस्तू म्हणून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.

पारंपारिक stick candle पासून सुरू झालेल्या या प्रवासात मेणबत्त्या केवळ घरात उजेडासाठी म्हणूनच न वापरता रोमँटिक कँडल, पाण्यावर तरंगणाऱ्या मेणबत्त्या, वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकाराच्या मेणबत्त्या अगदी showcase मध्ये ठेवण्याच्या प्रकारापर्यंत विविध प्रकारात आज बाजारात उपलब्ध असतात.

आपल्याकडे light गेली की मेणबत्ती वापरली जाते. त्या साध्या मेणबत्त्या असतात. तर डिझायनर मेणबत्त्या समारंभात, उत्सव किंवा special occasion ला भेटवस्तू म्हणून देण्यासाठी वापरल्या जातात. मेणबत्तीचा व्यवसाय हा मोठ्या आणि लहान किंवा गृहोद्योग म्हणूनही केला जातो. प्रत्येकाला त्याचा त्याचा ग्राहक हा मिळतोच. मेणबत्तीचा व्यवसाय वेगवेगळ्या पद्धतीने सुरू करता येतो.

आपल्याकडे अशा अनेक प्रत्यक्ष विक्री करणार्‍या कंपन्या असतात की ज्यांच्या माध्यमाने आपण मालाची विक्री करू शकतो. नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांनी दिवाळी, नाताळ अशा सणांच्या दरम्यान सुरुवात केली तर व्यवसायाला चांगली सुरुवात मिळू शकते.

बीजभांडवल आणि साधने

गृहोद्योग म्हणून सुरुवात करणार असाल तर कमी भांडवलात सुरुवात करता येईल. तुम्हाला त्यासाठी गरज असेल ती मेणाची. (bees wax or paraffin) त्यासोबतच मोल्डस्, सुंगधी द्रव्ये, wicks, रंग, आणि मेण वितळवण्यासाठी भाडं.

प्रत्यक्ष विक्री करणार्‍या कंपनीद्वारे तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्हाला त्यांचे एक kit खरेदी करावे लागते. ज्याद्वारे पुरेसे व्यापार तुम्ही करू शकाल. स्वतंत्रपणे स्वत:चं करावयाचे असल्यास स्वत: फंड उभा करावा लागेल किंवा बँक अथवा MSME’S सारख्या संस्थाची मदतही मिळू शकते.

मेणबत्ती व्यवसायासाठी आवश्यक बाबी

  • एखाद्या चांगल्या इन्टिटयूटमधून याचे प्रशिक्षण घ्या.
  • आपल्या नातेवाईक, मित्र-मंडळी यांच्या सलोख्याने आणि कौशल्याने आपल्या मालाची विक्री करा किंवा आपल्या मालासाठी एखाद्या ठिकाणी विक्रीसाठी जागा निवडून तेथून विका. वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रदर्शनात भाग घेऊन आपल्या मालाला मार्केट मिळवून दया. नवनवीन कल्पना वापरून विक्रीच्या दृष्टिने प्रयत्न करा.
  • स्वत:ची वेबसाईट तयार करून घ्या. ही एक चांगली सुरुवात असेल. Online Marketing द्वारे तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यत स्वत:च product पोहोचवण्याची संधी मिळेल आणि मुख्य म्हणजे तुम्ही स्वत:च, स्वत:च्या product चे मार्केटिंग करू शकाल.
  • स्वत:च्या व्यवसायाच्या नावाने Business Card छापून घ्यावी. प्रत्येक भेटीत समोरच्याला आपले कार्ड दयावे.
  • Flyers अथवा Pamphlets हासुद्धा चांगला मार्ग आहे. आपले product लोकल मार्केटमध्ये लोकांपर्यत पोहचण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो.
  • आपल्या एरियातील हॉटेल, स्पा, कॉर्पोटेट कंपनीला approach करा.
  • मेणबत्ती व्यवसायात स्वत:ची जागा निर्माण करावयाची असल्यास थोडे संयम बाळगायला हवा. चांगला उदयोग हा एका रात्रीत उभा राहत नसतो हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन शांत डोक्याने काम करा. तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहचाल.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?