Advertisement
कथा उद्योजकांच्या

प्रगतिशील स्टार्टअप ‘कार्ट 91’

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


तंत्रज्ञानाचे सावट बघता बघता जगभर पसरले. अवघे विश्वच जणू संगणकाच्या खोक्यात सामावले. मोठ्या उलाढाली व व्यवहार तर सोपे झालेच, पण दैनंदिन आयुष्याच्या गरजाही भागवण्याची किमया ई-कॉमर्स क्षेत्राने केली. आता कुठलीही खरेदी करायला दुकानात जायची गरज राहिली नाही. काही क्लिक्समध्येच हव्या त्या गोष्टी बघून, पारखून खरेदी करणे शक्य झाले. शोधाशोध करण्याची आवश्यकताच उरली नाही.

या क्षेत्रात अव्वल सुविधा देणारी ‘कार्ट 91’ शॉपिंग अॅकण्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुण्यात २०१४ साली विशाल तेरकर, प्रमोद डोंगरे आणि दीप भोंग या तीन तरुणांनी सुरू केली. कोणतेही तांत्रिक ज्ञान नसलेले हे तिघे, या कंपनीचे स्वप्न घेऊन, या स्पर्धेच्या क्षेत्रात उतरले. लोकांना सातत्याने जाणवणारी नड या तिघांनी ओळखली. ती म्हणजे पुस्तके. वाचनाचा व्यासंग जेवढा मोठा, तेवढीच त्याची भूकही तीव्र.

हवे ते पुस्तक लवकरात लवकर वाचायला मिळणे, ही वाचकांची प्राथमिक गरज. काही काळापूर्वी वाचकांना पुस्तकांसाठी चांगलीच पायपीट करावी लागत असे. त्यातून ती पुस्तके मिळतीलच, याची शाश्वती नसे. पुस्तक शोधण्यासाठी लागणारा वेळ व कष्ट वेगळेच, पण विश्वातल्या एवढ्या मोठ्या ग्रंथभांडारातून नेमके कोणते पुस्तक आपली आवश्यकता पूर्ण करू शकेल, याची माहितीही मिळवावी लागत असे.

cart91.com या वेब पोर्टलने वाचकांच्या या सर्व समस्यांचे समाधान केले. या वेबसाइटने अत्यंत सुटसुटीत पर्यायांसहित लेखक, प्रकाशक आणि पुस्तकांची माहिती पुरवली, त्यामुळे वाचकाला हवे ते पुस्तक निवडणे सोपे झाले. त्याचबरोबर पर्यायी पुस्तकांची माहितीही झाली. एवढेच नाही तर ते पुस्तक खरेदी करण्याची सोयही पुरवली आणि हवे ते पुस्तक काही काळातच वाचकांच्या हाती पडू लागले. त्याचबरोबर शैक्षणिक अभ्यासक्रमाची दुर्लभ पुस्तकेही सहजरीत्या उपलब्ध होऊ लागली व त्याचा सगळ्यात मोठा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाला.

याची सुरुवात मात्र सोपी नव्हती. लेखक व प्रकाशक विक्रीच्या या नव्या कल्पनेला दुजोरा देत नव्हते. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. पुस्तक व लेखकाची माहिती मिळणेही दुरापास्त झाले, परंतु कंपनीने प्रयत्न सुरू ठेवले. लेखकांना व प्रकाशकांना वेबसाइटचे फायदे पटवून दिले आणि मग हळूहळू, एकाहून एक सुंदर कलाकृतींनी‘कार्ट 91’ वेबसाइटवर आपापली जागा घेतली.

दर्जेदार पुस्तके सहजरीत्या उपलब्ध होऊ लागली. कंपनीने कटाक्षाने पुस्तके ग्राहकांकडे वेळेत आणि शक्य असेल तेथे वेळेआधी पोहोचवली. या उत्तम सेवेमुळे ग्राहक आकर्षित होऊ लागले. कंपनीने नवख्या लेखकांना प्रोत्साहन देत त्यांची वेबसाइटवर जाहिरात केली व त्यामुळे त्यांच्या लेखनाला वाव मिळाला. यासाठी कंपनीने त्यांना कोणतेही शुल्क आकारले नाही. तसेच कंपनीच्या ग्रंथभांडारात जास्तीत जास्त मराठी पुस्तकांचा भरणा असल्याने महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांचे सेवाधारी आहेत.

कंपनीचे डायरेक्टर दीप भोंग

२०१४ साली सुरू झालेल्या या कंपनीने काही वर्षांतच व्यवसायाचा विस्तार केला. कंपनीचे मुख्यालय पुण्यातील सेनापती बापट रोड येथे आहे. आज ही कंपनी आपल्या कार्यक्षम कर्मचार्यां सोबत दिवसागणिक नवनवीन ध्येयशिखरे गाठत आहे. कंपनीच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

ग्राहकांच्या खिशाचा विचार, कंपनीचा नफा व वाढ आणि नवीन सुधारणा, या सगळ्यांची सांगड घालणे कठीण होते. कंपनीतील प्रत्येकाने संघटित होऊन हे प्रश्न सोडवले. कंपनीचे डायरेक्टर दीप भोंग आणि विशाल तेरकर यांनी व्यवसायाची मुळे घट्ट केली, प्रसिद्धीसाठी प्रयत्न केले, तर लॉजिस्टिक तज्ज्ञ असलेले प्रमोद डोंगरे यांनी व्यापाराची गणिते सोडवली.

कंपनीने प्रत्येक मनुष्यबळाचा व त्यांच्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग केला. ग्राहकांच्या सल्ल्यांचा आणि अडचणींचा बारकाईने विचार केला. वर्षभरातच कंपनी, मेरुदंड असलेल्या तांत्रिक बाबीतही स्वावलंबी झाली. दत्ता डोंगरे कंपनीचे नवे डायरेक्टर म्हणून रुजू झाले आणि त्यांनी कंपनीची ही बाजू सांभाळली. सर्वांचे प्रयत्न लवकरच फळाला लागले आणि बघता बघता कंपनीने ७ हजार पुस्तकांचा ज्ञानसाठा ‘कार्ट 91’च्या छत्राखाली आणला.

स्पर्धेत ही कंपनी कुठेही कमी पडली नाही. कंपनीने ग्राहकांना कॅश ऑन डिलिव्हरी आणि ऑनलाइन पेमेंट गेटवेचेे पर्याय खुले केले. देशभरात कुठेही जलद गतीने पुस्तके पोहोचवण्यासाठी कंपनीकडे विशेष यंत्रणा आहे. त्याचबरोबर ग्राहकांच्या तक्रार व अडचणी निवारण्यासाठी ग्राहक सेवेची तरतूदही आहे. एखादे पुस्तक कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध नसेल तरीही ते मिळवून देण्याची जबाबदारी ही कंपनी घेते. म्हणूनच कंपनीकडे दुर्मीळ अशा स्थानिक व परदेशी पुस्तकांसाठीही मागणी असते. पुस्तकांच्या मोठ्या ऑर्डर्सवर कंपनी विशेष सवलतही देते.

इतके सगळे फायदे मिळत असल्याने कंपनीचा ग्राहकवर्ग मोठा आहे व तो दिवसेंदिवस वाढतही आहे. वाचकांचा कंपनीच्या तत्पर सेवेवर पूर्ण विश्वास आहे. आता ही कंपनी शिक्षणोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत आपले पहिले पाऊल ठेवत आहे. कंपनीने सचोटी आणि कार्यक्षमता या गुणांच्या बळावर चांगले नाव कमावले आहे. कंपनीच्या उद्योगाचे पर्व शून्यापासून सुरू झाले खरे, पण आज ते पूर्णतः संपन्न आहे आणि भविष्यात, लवकरच ही कंपनी या क्षेत्रातील सर्वोच्च स्थान गाठेल, यात तिळमात्र शंका नाही.

संपर्क : दीप भोंग – ९५०३७७६३६९


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!