सी-क्युअर ऑनगो : Anti Virus च्या पुढे जाणारा स्टार्टअप

माहिती-तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे मानवी जीवनातील अनेक गोष्टी सुकर झाल्या आहेत. दुसर्‍या बाजूला संरक्षणाचा प्रश्‍नही तितकाच जटिल होत चालला आहे. आपल्या कॉम्प्युटर वा मोबाइलमधले अँटिव्हायरस सॉफ्टवेअर हे आपल्याला व्हायरस, ट्रोजन किंवा मालवेअर अटॅकपासून मर्यादित रूपात वाचवू शकेल; पण एखाद्याने तुमची सिस्टम हॅक करून त्यातील महत्त्वाचा डेटा चोरला तर काय कराल?

सायबर सिक्युरिटीची ही समस्या आज जवळजवळ प्रत्येक क्षेत्राला भेडसावते आहे. मुंबईतील एक तरुण निखिल महाडेश्‍वर हा गेली कित्येक वर्षे या समस्येबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचे काम करत आहे. विविध सेमिनार्स, कॉन्फरन्सेस, वृत्तपत्रीय स्तंभलेखन यासह विविध सरकारी व खासगी कार्यालयांना प्रत्यक्ष रूपात सहकार्य करत आहे. आता हा तरुण सायबर सिक्युरिटीच्या ध्येयाने एकत्र आलेल्या एका स्टार्टअपचा डायरेक्टर आहे.

‘सी क्युअर ऑनगो’ हे या स्टार्टअपचे नाव असून अँटिव्हायरसच्या पुढे जाऊन लोकांचे कॉम्प्युटर हे हॅकिंग फ्री करण्याचे या कंपनीचे प्रयत्न आहेत. ‘स्मार्ट उद्योजक’च्या दिवाळी अंकानिमित्त निखिलशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पांमधून त्याच्याबद्दल व या स्टार्टअपबद्दल अनेक गोष्टी उलगडल्या… या गप्पांचा हा गोषवारा निखिलच्याच शब्दांत…

माझ्या करीअरची सुरुवात झाली ती वेब डिझायनर म्हणूनच. २००७ ला दहावी झाली आणि मी कामाला सुरुवात केली. फ्री-लान्स वेब डिझायनिंग करत होतो. फ्री-लान्सिंगमध्ये मला सहा क्‍लाएंट्स मिळाले. त्या वेळेला दहावीतून अकरावीत जात होतो, पण आवड म्हणून मी काम करत होतो. बेसिक टेक्नॉलॉजीवर आधारित वेबसाइट मी बनवत होतो. यातूनच माझा आत्मविश्‍वास वाढत गेला.

फ्री-लान्सिंगमध्ये एवढा चांगला मला फायदा होतोय, तर मग आपण आपली कंपनी फॉर्म करू या, असा मनाचा निर्धार झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी मला सहा क्‍लाएंटस आणि त्यांच्या रूपाने अंदाजे ५० ते ६० हजार रुपयांची मिळकत जमा झाली. फक्त पैसेच नाही मिळाले, तर नवं काही शिकताही आलं. माझ्या घरी उद्योजकीय वातावरण हे पहिल्यापासूनच होते. माझ्या वडिलांचा इव्हेंटचा मोठा उद्योग जो आजोबांच्या काळापासूनचा आहे.

निखिल महाडेश्‍वर

मी माझा उद्योग हा एक पॅशन म्हणून सुरू केला. यातूनच एका मित्रासोबत स्वत:चा सेटअप टाकू असं ठरलं. हा माझा भागीदारीचा पहिला प्रयत्न. त्याला भेटलो व सर्व सांगितलं. मित्रही तयार झाला. म्हणाला, ठीक आहे. स्वस्तामध्ये मी तुला सिस्टम आणून देतो. वर्षाचे ५२ हजार रुपये.

आपल्या पहिल्या वर्षाची पूर्ण कमार्ई त्याच्या हातात दिली; पण त्याने मला चांगलेच फसवले. पुढे तो माझे फोनसुद्धा घेईनासे झाला. मला कळून चुकलं की, आपले पैसे पुरते बुडाले आहेत. अशा प्रकारे उद्योजकीय जीवनाच्या सुरुवातीलाच एक चांगला धडा मी घेतला.

बारावीनंतर मी बी.सी.ए. केलं. बी.सी.ए. करता करता २०११ साली ‘फेदरस ग्रुप’ नावाने स्वत:ची सोल प्रोप्रायटरी फर्म सुरू केली. यामध्ये वेबसाइट डेव्हलपमेंट, वेब डिझायनिंग करत होतो. वेबसाइट तयार करण्यात मी सचिन पिळणकर यांना माझे गुरू मानतो. त्यांच्याकडून मी हे कौशल्य शिकलो.

वेबसाइट डिझायनिंग व डेव्हलपमेंटमध्ये कामं चांगली मिळत होती, पण माझा पिंड रीसर्चचा होता, त्यामुळे मी पुढे आणखी शिकत गेलो. यातूनच मला सायबर सिक्युरिटी, सोशल मीडिया मार्केटिंग आणि फ्यूचर टेक्नॉलॉजीबद्दल गोडी लागली.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


सायबर सिक्युरिटीमध्ये अनेकदा पोलिसांसोबत काम करावं लागे. शिवाय पोलिसांना ट्रेनिंग देणंही सुरू झालं. माझ्या मते उद्योजकीय जीवनात अभ्यासू वृत्ती आणि रीसर्चचा अनोन्यसाधारण महत्त्व आहे, कारण रूढ शिक्षणात जे शिकतो त्यातील बर्‍याच गोष्टी या प्रत्यक्ष फिल्डमध्ये कालबाह्य झालेल्या असतात. मी रीसर्चला बसल्यावर आठ-दहा तास उठत नाही आणि एखादा स्पेसिफिक विषय घेतला उदा. एखादा विषय घेतला वायफाय हँकिंग, तर वायफाय हँकिंग शोधताना मला अॅरन्ड्रॉइड हँकिंगपण येतं. मला उपयोगाचं आर्टिकल असेल ते मी बाजूला ठेवतो.

अॅचन्ड्रॉइडवर बसेन तेव्हा ते अभ्यासतो. प्रत्येक उद्योजकाचं त्याच्या त्याच्या क्षेत्रातलं ज्ञान हे अद्ययावत राहीलचं पाहिजे, तरच तो टिकू शकतो. सायबर सिक्युरिटीमध्ये आता स्पेशलाइज्ड ‘आयकॅच इन्फोसेक प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी आम्ही सुरू केली. कंपनीचे फाऊंडर आहेत निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ताजणे. दाऊदला सर्वात शेवटची भारतात जी अटक झाली होती, ती ताजणेसरांनी केली होती.

निवृत्त डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस डी. शिवानंदन व ए.टी.एस.चे संस्थापक के.पी. रघुवंशी हे सल्लागार म्हणून आहेत. सर्टिफाइड एथिकल हॅकर म्हणून प्रसिद्ध असलेले विनीत जैन, शिवाय अमेय आम्रे, किशन पटेल व मी असे आम्ही या कंपनीत स्टेक होल्डर आहोत.

जवळजवळ आपण सगळेच अॅलन्ड्रॉइडवरील अॅसप्स् हे फुकट वापरतो. जरी एखादं पेड अॅवप घेतलं तरी त्याच्या टर्म्स आणि कंडिशन्स मान्य कराव्या लागतात. तुम्ही एखादं अॅंप डाऊनलोड केलं की, त्यामध्ये तुमचे फोटोज जातात, कॉन्टॅक्ट जातात, लोकेशन जातं, एसएमएस जातात. सायबर गुन्ह्यांची सुरुवात इथूनच होते.

यावर उपाय म्हणून आम्ही ‘सीक्युअर ऑनगो’ नावाचा पेड अॅयप प्ले स्टोअरवर उपलब्ध केला आहे. तुम्ही विविध अॅाप्स डाऊनलोड करण्यासाठी ज्या परवानग्या दिल्या आहेत, त्या तुम्हाला ‘सीक्युअर ऑनगो’ने ब्लॉक करता येऊ शकतात. उदा. शेअरइट अॅतप तुमचे एसएमएस वाचतं, झेंडल अॅगप तुमचे लोकेशन टे्रस करते. गुगलचेही बरेच अॅकप्स आपल्याला लाइव्ह ट्रॅक करत असतात. याची गरज नसते. ते तुम्ही आमच्या अॅकपने बंद करू शकता.

‘सीक्युअर ऑनगो’मध्ये आम्ही नवीन बर्‍याच गोष्टी आणणार आहोत. पुढे आम्ही एन्क्रिप्टेड कॉलिंग हा पर्याय आणणार आहोत. तुमचा फोन जर कोणी रेकॉर्ड करत असेल, तरी प्रत्यक्ष कॉल रेकॉर्ड न होता एन्क्रिप्टेड फॉर्मेटमध्ये रेकॉर्ड होईल. सायबर सिक्युरिटीला आम्ही जे दोन प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. मोबाइल प्रोटेक्शन आणि कॉम्प्युटर प्रोटेक्शन हे तर ते कोणीही डाऊनलोड करू शकतो आणि कोणीही ते वापरू शकतो. गुगल प्ले स्टोअर आणि आमच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकता.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?