२ कोटींपर्यंत विनातारण कर्ज मिळू शकते अशी CGTMSE योजना
उद्योगोपयोगी

२ कोटींपर्यंत विनातारण कर्ज मिळू शकते अशी CGTMSE योजना

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा आणि दिवाळी अंकापासून रजिस्टर्ड पोस्टाद्वारे घरपोच मासिके मिळवा फक्त ₹५०० मध्ये!
Book Now: https://rzp.io/l/15JEP6xIy

सूक्ष्म आणि लघू उद्योजकांना वित्तपुरवठा करण्यासाठी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय आणि लघुउद्योग विकास बँक (सिडबी) यांनी एकत्र येऊन “Credit Guarantee Fund Trust for Micro and Small Enterprises’ (CGTMSE) या न्यासाची स्थापना केली. सूक्ष्म व लघू उद्योगांना तारण राहणे हेच या न्यासाचे मुख्य काम आहे. २००६ पासून ही योजना अस्तित्वात आहे.

पहिल्या पिढीतील उद्योजकांना आपली उद्योजकीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. त्यांची ही गरज बँक वा वित्तसंस्थांकडून कर्जरूपी भांडवल उभे केल्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मात्र बँक वा अन्य वित्तसंस्था या तारण वा जामीन मिळाल्याशिवाय कर्ज देत नाहीत. अशावेळी CGTMSE योजनेअंतर्गत हा न्यास त्या बँक वा वित्तसंस्थेला तारण म्हणून राहतो आणि तुम्हाला २ कोटीपर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध होऊ शकतं. महिला उद्योजक आणि पूर्वोत्तर राज्यांतील उद्योजकांसाठी या योजनेत विशेष तरतुदी आहेत. उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील नवीन वा सध्या कार्यरत असलेले सूक्ष्म व लघु उद्योजक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.


वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/smartudyojak

CGTMSE योजना ही देशभरातील १३३ बँक वा वित्तसंस्थांमध्ये उपलब्ध आहे. या संस्थांची सूची खाली जोडत आहे. या सूचीपैकी आपल्या जवळच्या बँक वा वित्तसंस्थेत आपल्याला प्रक्रिया व अन्य गोष्टींबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.

योजनेच्या सत्यतेबाबत पुरावा म्हणून भारत सरकारच्या संकेतस्थळाची लिंक खाली जोडत आहे. अधिक माहितीसाठी Toll Free No. : 1800222659/ (022) – 6143 7805 यावर संपर्क करू शकता.

https://www.cgtmse.in/About_us.aspx

CGTMSE योजना उपलब्ध असलेल्या बँक

 

 1. अलाहाबाद बँक 67 माळवा ग्रामीण बँक68 मेघालया रुरल बँक
 2. अलाहाबाद युपी ग्रामीण बँक 69 एमजीबी ग्रामीण बँक
 3 आंध्र बँक 70 मिझोराम रुरल बँक
 4 आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक 71 नैनिताल-अलमोरा क्षेत्रीय ग्रामीण बँक
 5 आंध्र प्रदेश स्टेट फायनॅन्शियल कॉर्पोरेशन 72 नर्मदा माळवा ग्रामीण बँक
 6 आंध्र प्रगती ग्रामीण बँक 73 नॅशनल स्मॉल इंडस्ट्रिज कॉर्पोरेशन
 7 आर्यवर्त ग्रामीण बँक 74 लिलांचल ग्राम्य बँक
 8 आसाम ग्रामीण विकास बँक 75 नॉर्थ-ईस्टर्न डेव्हलपमेंट फायनॅन्शियल कार्पोरेशन
 9 अ‍ॅक्सिस बँक 76 नॉर्थ मलबार ग्रामीण बँक
 10 बैतरनी ग्रामीण बँक 77 ओरीएंटल बँक ऑफ कॉमर्स
 11 बलिया इटावा ग्रामीण बँक 78 पल्‍लवन ग्रामीण बँक
 12 बांगीया ग्रामीण विकास बँक 79 पांड्यन ग्राम्य बँक
 13 बँक ऑफ बरहान अ‍ॅण्ड कुवेत 80 पर्वतीय ग्राम्य बँक
 14 बँक ऑफ बडोदा 81 प्रगती ग्रामीण बँक
 15 बँक ऑफ इंडिया 82 प्रथम बँक
 16 बँक ऑफ महाराष्ट्र 83 पुदुवयी भारतीआर ग्राम्य बँक
 17 बारक्‍लेस बँक 84 पंजाब अ‍ॅड सिंध बँक
 18 बडोदा गुजरात ग्रामीण बँक 85 पंजाब ग्रामीण बँक
 19 बडोदा राजस्थान ग्रामीण बँक 86 पंजाब नॅशनल बँक
 20 बडोदा उत्तर प्रदेश ग्रामीण बँक 87 पूर्वांचल ग्रामीण बँक
 21 भारतीय महिला बँक 88 राजस्थान ग्रामीण बँक
 22 बिहार क्षेत्रीय ग्रामीण बँक 89 रेवा सिद्धी ग्रामीण बँक
 23 कॅनरा बँक 90 ॠषीकुल्य ग्राम्य बँक
 24 कॅथलिक सिरीयन बँक 91 समस्तीपूर क्षेत्रीय ग्रामीण बँक
 25 कावेरी कल्पतरू बँक 92 सप्तगिरी ग्रामीण बँक
 26 स्टेंट्रल बँक ऑफ इंडिया 93 सर्व युपी ग्रामीण बँक
 27 चैतन्य गोदावरी ग्रामीण बँक 94 सातपुडा नर्मदा क्षेत्रीय ग्रामीण बँक
 28 छत्तीसगड ग्रामीण बँक 95 सौराष्ट्र ग्रामीण बँक
 29 चिकमंगलुर-कोडागू ग्रामीण बँक 96 शारदा ग्रामीण बँक
 30 सिटी युनियन बँक 97 श्रेयस ग्रामीण बँक
 31 कॉर्पोरेशन बँक 98 स्मॉल इंडस्ट्रिज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया
 32 डेक्कन ग्रामीण बँक 99 साऊथ मलबार ग्रामीण बँक
 33 दिल्‍ली फायनॅन्शियल कॉर्पोरेशन 100 स्टॅण्डर्ड चार्टड बँक
 34 देना बँक 101 स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅड जयपुर
 35 देना गुजरात ग्रामीण बँक 102 स्टेट बँक ऑफ हैद्राबाद
 36 डॉईश बँक 103 स्टेट बँक ऑफ इंडिया
 37 डेव्हलपमेंट क्रेडिट बँक 104 स्टेट बँक ऑफ मैसूर
 38 दुर्ग राजानंदगाव ग्रामीण बँक 105 स्टेट बँक ऑफ पटियाला
 39 एर्क्स्पोट-इर्म्पोट बँक ऑफ इंडिया 106 स्टेट बँक ऑफ त्रावणकोर
 40 गुडगाव ग्रामीण बँक 107 सूरगुजा क्षेत्रीय ग्रामीण बँक
 41 हडोती क्षेत्रीय ग्रामीण बँक 108 सतलज ग्रामीण बँक
 42 हरियाणा ग्रामीण बँक 109 सिंडिकेट बँक
 43 एचडीएफसी बँक 110 तामिळनाडू मर्कलटाइल बँक
 44 आयसीआयसी बँक 111 धनलक्ष्मी बँक
 45 आयडीबीआय बँक 112 फेडरल बँक
 46 इंडियन बँक 113 जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर बँक
 47 इंडियन ओव्हरसिझ बँक 114 करूर व्यासा बँक
 48 इंडसइंड बँक 115 नैनिताल बँक
 49 आयएनजी व्यास्या बँक 116 रत्नाकर बँक
 50 जयपुर थर ग्रामीण बँक 117 साऊथ इंडियन बँक
 51 हिमाचल ग्रामीण बँक 118 तामिळनाडू इन्डस्ट्रियल कॉर्पोरेशन
 52 जम्मु अ‍ॅण्ड काश्मीर डेव्हलपमेंट फायनॅन्शियल कार्पोरेशन 119 त्रिपुरा ग्रामीण बँक
 53 जम्मु अ‍ॅण्ड काश्मीर ग्रामीण बँक 120 त्रिवेणी क्षेत्रीय ग्रामीण बँक
 54 झारखंड ग्रामीण बँक 121 युको बँक
 55 कर्नाटका बँक 122 युनियन बँक ऑफ इंडिया
 56 कर्नाटका विकास ग्रामीण बँक 123 युनायडेड बँक ऑफ इंडिया
 57 काशी गोमती संयुक्त ग्रामीण बँक 124 उत्तर बिहार ग्रामीण बँक
 58 केरळा फायनॅन्शियल बँक 125 उत्तरांचल ग्रामीण बँक
 59 कोटक महिंद्रा बँक 126 उत्तरांचल क्षेत्रीय ग्रामीण बँक
 60 कृष्ण ग्रामीण बँक 127 वनांचल ग्रामीण बँक
 61 लक्ष्मी विलास बँक 128 विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक
 62 लंगपी देहंगी रुरल बँक 129 भोपाल क्षेत्रीय ग्रामीण बँक
 63 मध्य भारत ग्रामीण बँक 130 विजया बँक
 64 मध्य बिहार ग्रामीण बँक 131 विश्‍वेश्‍वर्य ग्रामीण बँक
 65 महाराष्ट्र गोदावरी ग्रामीण बँक 132 वैनगंना क्षेत्रीय ग्रामीण बँक
 66 महाराष्ट्र ग्रामीण बँक 133 येस बँक

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!