लोकांना आर्थिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी या क्षेत्राकडे वळले चंद्रकांत राऊत


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


मी चंद्रकांत श्रीधर राऊत (CFP, QPFP). मी जुलै २००६ ते डिसेंबर २०१५ इन्शुरन्स कंपनीमध्ये (पहिली २ वर्षे बजाज अलायन्स आणि नंतर रिलायन्स लाइफ इन्शुरेंस) नोकरी केली. तिथे काम करताना मला लक्षात आले की विविध प्रकारे फसवणूक करून पॉलिसी विकल्या जातात.

फक्त कमिशन मिळवणे हाच त्यांचा उद्देश असतो. विमा पॉलिसीमध्ये पैसे गुंतवून आपले आर्थिक उद्दीष्ट कधीच साध्य होऊ शकत नाही, त्यामुळे अनेकांची आर्थिक घडी मात्र विस्कळीत होते. हे मनाला न पटणारे होते, पण मी काहीच करू शकत नव्हतो.

त्याचदरम्यान मला FPSB, USA च्या CFP (Certified Financial Planner) या कोर्सविषयी माहिती मिळाली. मी हा कोर्स मार्च २०१७ ला पूर्ण केला. त्याचबरोबर Network FP, India या संस्थेचा QPFP (Qualified Personal Financial Planner ) हा कोर्ससुद्धा मे २०२० ला पूर्ण केला आहे.

मी फायनान्सियल प्लानिंग तर करतोच, त्याबरोबर सर्वसामान्यांकडून आर्थिक चुका होऊ नयेत यासाठी Financial Awareness Program च्या माध्यमातून मार्गदर्शनदेखील करतो. हा प्रोग्राम आपल्याला शाळा, कॉलेज आणि कंपनी स्टाफ यांच्यासाठी, तसेच हाऊसिंग सोसायटी, सार्वजनिक कार्यक्रम इत्यादी ठिकाणी आयोजित करता येतो.

मी यापूर्वी Hindustan Uniliver (MIDC Lote Plant), अनुयोग विद्यालय – मुंबई, स्वामी स्वरूपानंद विद्यालय (पावस, रत्नागिरी) इत्यादी ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या केला आहे.

चंद्रकांत श्रीधर राऊत

मी ज्यांचे ज्यांचे फायनान्सियल प्लानिंग केले आहे, त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून अभिमान वाटतो. मंडळी आयुष्यात पैशाचे योग्य नियोजन न जमल्यामुळे, जगण्यासाठी अनेकांना आयष्याच्या अखेरपर्यंत नोकरी किंवा व्यवस्याय करावा लागतो.

काहींनी तर आयष्यात खूप पैसे कमावले, परंतु काही चुकांमुळे म्हारपणासाठी काहीच शिल्लक राहिले नाही. अनेकांना म्हातारपणात मुलांवर, नातेवाईकांवर अवलबून राहावे लागल्यामुळे अपमानित आयुष्य जगावे लागते. हे मी बघितले आहे आणि म्हणूनच नोकरी सोडून फायनान्सियल प्लानिंग हे क्षेत्र निवडले.

आयुष्याच्या अखेरीपर्यंत स्वाभिमानाने जगावयाचे असल्यास वेळीच आर्थिक नियोजन करून स्वावलंबी व्हावे लागेल आणि त्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी आहोतच. ज्याप्रमाणे आपल्या परिवारासाठी आपला विश्वासातील फॅमिली डॉक्टर असतो, आपण स्वकष्टाने कमावलेल्या लाखो रुपयांच्या गाडीसाठीसुद्धा नेहमीचाच ठरलेला मेकॅनिक असतो.

साधे आपले केस कापायचे असतील तरीही केस कापण्यासाठी केशकर्तनालय ठरलेले असते, परंतु गुंतवणुकीचे निर्णय घ्यायचे झाल्यास आपण जवळच्या व्यक्तीचे ऐकतो ज्याने आधीच चुका केल्या आहेत आणि तुम्हालासुद्धा ती चूक करण्यास तो भाग पाडत असतो.

आपण तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घेण्यास टाळाटाळ करतो. आपल्या परिवारासाठी तज्ज्ञ गुंतवणूक मार्गदर्शक असणे ही काळाची गरज आहे. परंतु तो कमिशनवर किंवा मोफत काम करणारा नसावा, कारण आपण सुज्ञ आहातच. तुम्ही आमच्याशी जोडले गेल्यावर तुमच्याकडून आर्थिक चुका होऊ न देणे ही आमची जबाबदारी आहे.

चंद्रकांत श्रीधर राऊत
कंपनीचे नाव : ARTHARTHNEETI
आपला हुद्दा : FOUNDER & DIRECTOR
व्यवसायातील अनुभव : ४ वर्षे
विद्यमान जिल्हा : रत्नागिरी

तुमची उत्पादने व सेवा :
Personal Financial Planning
Financial Awareness Program

व्यवसायाचा पत्ता : 203, सरस्वती संकुल, अभ्युदय नगर, नाचणे रोड , रत्नागिरी 415612.
ई-मेल : chandrakant.raut19@gmail.com
मोबाइल : 9920475174
फेसबुक बिझनेस पेज URL:  https://www.facebook.com/artharthneeti

प्रॉडक्ट किंवा सेवेविषयी थोडक्यात माहिती :

आम्ही महाराष्ट्रात कोठेही ऑनलाइन सेवा देतो. आम्ही तुमच्या कुटुंबाचे FINANCIAL LIFE PLANNING करतो, ज्यामध्ये;

1. Your financial Data Analysis
2. Financial Health Checkup
3. Risk Profiling
4. Contingency planning
5. Loan/Debt Advisory
6. Child future planning (Marriage and Education {Separate for each child})
7. Retirement Planning
8. Insurance (Life and Health) need Analysis
9. Goal Base Investment Planning
10. Net-worth Analysis
11. Financial Coaching
12. One year action plan & Review (1st year minimum 4 review)
13. Taxation Planning
14. Asset Allocation review
15. Budgeting & Cash Flow Management
16. Existing portfolio realignment**
17. Product Selection & Recommendation**
18. Guidance for direct investments in MFs
19. Guidance and help for KYC / address / contact updation**
20. Estate Planning
21. Guidance and help for Will writing**
एत्यादी सेवा अंतर्भूत असतात.

** Extra charges applicable.

आम्ही गुंतवणुकीच्या कोणत्याही स्कीम किंवा विमा पॉलिसी विकत नाही त्यामुळे कमिशन नाही म्हणूनच सल्ला देण्याचे शुल्क आकारतो.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?