परिवर्तन… बदल स्वीकारा


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आपण किती सहज बोलतो प्लेक्सीबल असायला हवंय. म्हणजे परिवर्तन, बदल हा निसर्गनियमच आहे. बघा ना, ऋतू बदलतात, रात्रीनंतर दिवस उजाडतो; जन्म, बालपण, तरुणपण, प्रौढ, वृद्धत्व, मृत्यू सारे काही आपल्या समोरच असते. आपण हे सारे समजतो; पण जगताना अनेकवेळा बदल स्वीकारणे आपल्याला जमत नाही किंवा कठीण जाते. यामुळे जास्त त्रास होतो आणि नुकसानही. म्हणूनच बदल स्वीकारता आलाच पाहिजे.

आपल्या रोजच्या जगण्यात आपण या गोष्टी विसरतो की, सगळेच दिवस सारखे नसतात. चांगले दिवस, वाईट दिवस, सुखदुःख ही जगरहाटी चालूच राहते. हे सत्य आहे. त्याची अनेक उदाहरणे आपण आपल्या आसपास बघत असतो. परिवर्तन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे; पण तरीही अनेक आघाड्यांवर आपण तो स्वीकारत नाही.

आता आपण हेच पाहू की, आपल्या कामात आपण बदल स्वीकारला नाही तर किती समस्या उद्भवू शकतात. आपण कधी कधी एखाद्या कामाची सहज थट्टा करतो; पण खरं तर शाळेत शिकलेल्या मूल्यशिक्षणातील श्रमप्रतिष्ठेचे मूळ विसरलेले असतो.

आपल्या उदरनिर्वाहासाठी आपण नोकरी, व्यवसाय किंवा अर्थार्जन करण्यासाठी शिक्षण घेतो; पण शालेय शिक्षण, त्यातील आपली प्रगती याचा बर्‍याच जणांना न्यूनगंड असतो. काही लोकांना शिक्षणाच्या पलीकडे जाऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यात रस असतो, तर काही जणांना हेच कळत नाही की, मी काय करू?

कोणी मित्रमैत्रिणी काही करतात, शिकतात म्हणून आपणही तेच करतो. या सगळ्यात खूप गोंधळ असतो. परिणामस्वरूप जगण्यात, विचारात, समाजात आपण मागे पडू लागतो.

खरे तर काळानुसार आपल्याला आपल्या या विचारात परिवर्तन झाल्याचे कळते; पण आपण ते स्वीकारत नाही. का तर; आता मी यात बदल केला तर लोक काय म्हणतील? आता माझे वय झाले, मला आता इतर काही जमेल का? गरजा वाढल्या आणि जबाबदार्‍याही. आता मी बदल केला तर असलेली घडी विस्कटेल. एक ना अनेक विचार आणि मग पुन्हा आपण स्वतःला परिवर्तन स्वीकारण्यापासून थोपवतो.

यामुळे आपली भावनिक कोंडी होते, वैचारिक कुचंबणा होते आणि आपण स्वतःला सतत फसवत राहतो. यामुळे आनंदीही राहणे जमत नाही आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या कामावर होत राहतो. चिडचिड, ताणतणाव वाढू लागतो आणि आपली जितकी क्षमता असते त्यापेक्षा कमी आपण काम करतो. ही एक श्रुंखला असते. त्यामुळे त्याची एकत्रित छाप पडते आणि नुकसानच होते.

खरं तर शिक्षण कधी वाया जात नाही. त्यामुळे आवडीच्या क्षेत्रात काम केल्याने आपले शिक्षण व्यर्थ जाण्याची भावना मनात न ठेवता आपल्याला आनंद मिळेल असे काम करायला हवे.

अनेक वेळा आपल्यातील सुप्त गुण उशिरा कळतात. बर्‍याच वेळा आपण एखादी गोष्ट करून पाहिल्यावर ती चांगल्या पद्धतीत करू शकतो, असा विश्वास आपल्यात निर्माण होतो; पण आपण याकडे दुर्लक्ष करतो. हेच आपल्याला आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करत असतात.

एकूणच आपली अशी कोंडी छोट्या छोट्या बदलाला स्वीकारत नाही आणि आपल्याला काही काळाने हे कळतही नाही. त्यामुळे व्यवसायवाढीस खीळ बसते, आपली प्रगती खुंटते. म्हणून परिवर्तन स्वीकारा. काळाच्या दोन पावले पुढे राहायला जमायला हवे; पण ते जमत नसले तरी काळासोबत तरी चालायला जमायला हवे.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?