कोविड काळात हिम्मत करून ऊर्जा क्षेत्रात सुरू केला स्वतःचा व्यवसाय

१. तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा.

मी मेकॅनिकल इंजीनीरिंग आणि मार्केटिंगमध्ये एमबीए ही पदवी संपदान केलेली आहे. तसेच वीस वर्षांचा औद्योगिक क्षेत्रातील अनुभव आहे. ऊर्जा, सिमेंट, स्टील, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कंपन्यांना लागणारे विविध साधनसामग्री चा पुरवठा करणे आणि उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी लागणाऱ्या सेवा पुरवण्याचे कार्य केले आहे.

२. तुम्हाला तुमच्या व्यवसायाची कल्पना कशी सुचली?

गेली वीस वर्षे विविध क्षेत्रात नोकरी करत असताना मनात बऱ्याचदा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार यायचा, पण होऊ शकले नव्हते. कोविडमध्ये आलेल्या आर्थिक मंदीत बऱ्याच घडामोडी झाल्या आणि व्यवसायात उडी मारण्याची हिम्मत केली. गेली दहा वर्षे विद्युतनिर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या संपर्कात असल्यामुळे विद्युतनिर्मिती क्षेत्रातील अडचणी आणि त्यावर असणारे उपाय यांची बऱ्यापैकी माहिती होती.

ऊर्जा बचत आणि सौर ऊर्जेबद्दल होणाऱ्या घडामोडी जवळून अनुभवत असताना आणि विद्यमान कार्यरत असणाऱ्या कंपन्यांमध्ये काय कमतरता आहेत, याचे अवलोकन केले होते. आपण ग्राहकांची कशी सहाय्यता करू शकतो, याबद्दल विचारमंथन केले.

आपण या क्षेत्रात उतरून ग्राहकांपर्यंत योग्य प्रॉडक्टस आणि सर्व्हिसेस पोहोचवून त्यांना योग्य लाभ मिळवा, या उद्देशाने ‘एयरफाइन एनर्जी प्रायवेट लिमिटेड’ची स्थापना केली.

३. तुमची उत्पादने किंवा सेवा याविषयी सांगा.

चेतन अमृतकर

एनर्जी सेविंग प्रॉडक्टस आणि सर्विसेस : ऊर्जेची बचत करणे हे ऊर्जानिर्मिती करण्या प्रमाणेच आहे. याचे बरेच फायदे आहेत. ऊर्जेची बचत केल्याने तुमचा पैसा तर वाचतोच तसेच ऊर्जा उत्पादन कमी करावे लागते. त्यामुळे होणारा खर्च टळतो आणि प्रदूषणही टळते.

आम्ही इंडस्ट्रियल आणि कमर्शियल संस्थांचे एनर्जी ऑडिट करून ऊर्जाबचतीसंबंधीत उपाय सुचवतो. या उपायांचे प्रॅक्टिकल सॉल्यूशन स्थापित करून देऊन आमच्या ग्राहकांना फक्त ऑडिटच नव्हे तर ऊर्जेची बचत करून त्याचा लाभ मिळवून देतो. आम्ही आमच्या ग्राहकांचे परिपूर्णरित्या अध्ययन करून योग्य उपाय सुचवतो.

ऊर्जाबचत ही फक्त कारखान्यातील मशीनरी पुरता सीमित न ठेवता सर्व संबंधीत जोडलेल्या घटकांचे ऊर्जाबचतीतील योगदान वाढवण्यावर भर देतो. जसे कंपनीचे कर्मचारी कार्यालयात किंवा कारखान्यात येता-जाता किती ऊर्जेचा वापर करतात आणि कंपनी यामध्ये ऊर्जेचा अपव्यय कसा टाळू शकते, याचा अभ्यास करणे.

कंपनीचे पुरवठादार, लागणाऱ्या उत्पादनांचे उत्पादन करताना किती ऊर्जेचा वापर करतात याचाही आभ्यास करतो आणि त्यांना योग्य उपाययोजना सुचवतो. आमचा इंडस्ट्रियल क्षेत्रातील सखोल अनुभवाचा वापर करून आम्ही आमच्या ग्राहकांना आर्थिक आणि तांत्रिक फायदे मिळवून देतो.

सोलार एनर्जी प्रॉडक्टस आणि सर्व्हिसेस : आमची कंपनी एनर्जीसेविंग सेवांपर्यंत सीमित न ठेवता प्रदूषण कमी करण्यावर भर देण्यास प्राधान्य देते. आमचे सोलार क्षेत्रातील असणारे प्राविण्य वापरून आमच्या ग्राहकांना त्यांची ऊर्जेची गरज परंपरागत ऊर्जा स्त्रोतावरून अक्षय ऊर्जा स्त्रोताकडे नेण्यास सहाय्यता करतो.

रूफ टॉप सोलार सिस्टम इंस्टॉलेशन : ऑन ग्रिड, ऑफ ग्रिड आणि हायब्रिड सोलार सिस्टम

ग्राउंड माऊंट सोलार सिस्टम इंस्टॉलेशन : स्वउपयोगासाठी , ऊर्जा विकण्यासाठी

सोलार सिस्टम ऑडिट आणि टेस्टिंग सर्विसेस : सोलार एनर्जी सिस्टमचे नियमित ऑडिट करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सोलार सिस्टममध्ये फारच कमी मेंटेनेंसची गरज असल्यामुळे ग्राहक सिस्टमची हवी तशी काळजी घेत नाहीत. तसेच ग्राहकाला सोलार सिस्टमचे हवे तितकेसे तांत्रिक ज्ञान नसल्याने सिस्टममध्ये झालेले बिघाड लवकर कळून न आल्याने सोलार सिस्टमचा पूर्णपणे फायदा घेऊ शकत नाहीत.

आम्ही सोलार सिस्टमचे वार्षिक मेंटेनेंसचे कॉंट्रॅक्ट आणि सिस्टमची वेळोवेळी ऑडिट सर्विस प्रदान करतो. यामुळे ग्राहकांनी सोलार सिस्टममध्ये केलेल्या गुंतवणुकीचा पूर्ण लाभ घेऊ शकतात.

आम्ही सोलार पॅनलचे फॅक्टरी इन्सपेक्शन आणि फील्ड टेस्टिंग करतो. जर सोलार पॅनलमध्ये काही गुणवत्ता कमी असल्यास त्या पॅनल्सला रीजेक्ट केले जाते, जेणेकरून ग्राहकाने लावलेली सिस्टम तांत्रिकदृष्ट्या सक्षम असण्याची हमी मिळते. असेच अजूनही बरेच गुणवत्तेच्या दृष्टीने लागणाऱ्या सर्व्हिसेस आम्ही प्रदान करतो.

४. तुमच्या व्यवसायात वैशिष्टयपूर्ण काय आहे?

आम्ही ग्राहकांना वन स्टॉप एनर्जी सॉल्यूशन देतो. अशाप्रकारची सेवा देणारी आम्ही एकमेव कंपनी आहोत.

५. तुमचे व्यवसायाचे ध्येय काय आहे?

आपल्या सभोवतालच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी आमच्या 4R तत्त्वाचा प्रचार आणि उपयोग करणे.
आमचे 4R तत्त्व : Reduce – Reuse – Recycle – Renewables

६. तुमच्या व्यवसायाचे vision व mission स्टेटमेंट ठरले असेल तर सांगा.

Vision : सौरऊर्जा शाश्वत, विश्वासार्ह आणि प्रत्येकासाठी परवडणारी बनवणे जेणेकरून लोक जीवाश्म ऊर्जेकडून अक्षय ऊर्जेकडे सहजपणे वाटचाल करू शकतील.

Mission : आमच्या ग्राहकांना आर्थिक फायदा होण्यासाठी घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि कृषी वापरासाठी सौर ऊर्जा उपलब्ध करून देणे

७. तुमच्या व्यवसायात किती कर्मचारी काम करतात?

आमच्या कंपनीत सध्या दहा कर्मचारी आहेत आणि प्रोजेक्टनुसार आम्ही कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू शकतो.

८. तुम्हाला कधी अपयशाचा सामना करावा लागला का? आणि त्यातून तुम्ही काय शिकलात?

अपयश तेव्हा येते जेव्हा आपण प्रयत्न करणे सोडून देतो. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत आहात, तोपर्यंत तुम्ही यशस्वी झालेले नसले तरी अपयशी नसतात. जोपर्यंत आपण प्रयत्न करत असतो, तोपर्यंत आपला कठीण काळ असतो. हा कठीण काळ आपल्याला बरेच काही शिकवून जातो.

मी माझ्या नोकरी पेशात असताना अथवा व्यवसायात आल्यापासून मला बऱ्याच वेळा कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला आहे आणि आताही करावा लागत आहे. अशा वेळी बरेच जण तुम्हाला तुमच्या ध्येया पासून परावृत्त करून सोपा मार्ग निवडण्याचा सल्ला देतात.

अशा वेळी तुमची खरी सत्त्वपरीक्षा असते. अशा वेळी हिम्मत न हारता प्रयत्न करत राहणे फार महत्त्वाचे असते. अशा वेळी खरे मित्र तुमच्या मदतीस धावून येतात आणि तुम्हाला धीर देतात तुमचे मनोबल वाढवतात. अशा मित्रांना आपण जीवनात कधीच विसरू नये हेच मी माझ्या अपयश अथवा कठीण प्रसंगातून शिकलो आहे.

९. तुम्ही केलेल्या काही सर्वात मोठ्या चुका काय आहेत? आणि त्या चुकांतून तुम्ही काय शिकलात?

मी व्यवसाय सुरू करताना बऱ्याच चुका केल्या आणि त्या चुकांमधून बरेच काही शिकलो आहे. कोणताही व्यवसाय चालू करण्याअगोदर त्याचा पूर्णपणे अभ्यास करून उतरावे. व्यवसायात पहिल्यांदा प्रवेश करणाऱ्यानी शक्यतो ‘एक से भले दो और दो से भले तीन’ या म्हणीचा वापर केल्यास लवकर यश मिळू शकते. टीम वर्कशिवाय कोणताच व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही.

सुरुवातीला प्राथमिक व्यवसाया बरोबर जोडव्यवसाय असल्यास अती उत्तम, जेणेकरून उदरनिर्वाह चालू राहतो. फायनान्सची समज असणे फार गरजेचे असते. स्वत:च्या व्यवसायाची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न करावा, पण त्यासाठी सुरुवात लांबणीवर टाकू नये.

१०. नव्याने व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?

आपल्याला लहानपणी सांगितले जायचे की एकदा दहावी झाली की आयुष्य सोप होईल, नंतर बारावी, त्यानंतर कॉलेज झाल्यावर आयुष्य आनंदी होईल. त्यानंतर आपल्याला सांगण्यात येते की चांगली नोकरी मिळाली की आयुष्य सुखी होईल. पण या अनुभवातून आपण हे शिकतो की आयुष्यात नवीन प्रश्न उभे राहतात आणि आयुष्याची धडपड कधीच थांबत नसते.

बऱ्याच नोकरी करणाऱ्यांना असे वाटते की व्यवसाय सुरू केला म्हणजे आयुष्य खूप सुखी होईल. अशा सर्व होतकरू तरुणांना सल्ला आहे की व्यवसायातही बऱ्याच अडचणी येतात. व्यवसाय करणे हा एक जीवन जगण्याचा मार्ग आहे. त्या मार्गाची निवड करण्याचा निर्णय घेताना खडतर प्रवासाला सुरुवात करण्याची मानसिक तयारी महत्त्वाची आहे.

आर्थिक तयारी असेल तर उत्तमच आहे. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात या तयारीचा खूप लाभ होईल. कोणताही शॉर्टकट न घेता प्रयत्न करत राहिलो तर व्यवसायात यश हे निश्चित आहे. कधी लवकर तर कधी उशिरा, पण यश नक्कीच चाखायला मिळते. त्या यशाची गोडी काही वेगळीच असते. मी नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो.

चेतन देवीदास अमृतकर

व्यवसायाचे नाव : एयरफाइन एनर्जि प्रायवेट लिमिटेड
तुमचा हुद्दा : मॅनिजिंग डायरेक्टर
GST No. : 27AAWCA4976A1ZB
Business Formation : प्रायवेट लिमिटेड

विद्यमान जिल्हा : ठाणे
व्यवसायातील अनुभव : २० वर्षे
मोबाइल : ९८९२३७५०१०
Business Email ID: chetan@airfineindia.com

व्यवसायाचा पत्ता : 302/5, Sarvoday Ganden, Nr Bhnu Sagar Cinema, Kalyan West, Dist Thane, State Maharashtra 421301
संकेतस्थळ : https://airfineindia.com
LinkedIn : https://www.linkedin.com/company/airfine-energy-private-limited/

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?