Advertisement
कॉफी आणि बरंच काही…
कथा उद्योजकांच्या

कॉफी आणि बरंच काही…

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


पुण्याचे प्रदीप चौधरी आणि वर्षा चौधरी हे दांपत्य आज महिन्याला सहा लाखांची उलढाल एक वर्षाच्या आत उभी करून कॉफी शॉप चालवतात. डिसेंबर २०१७ मध्ये त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. एका वर्षात पाच शाखा सुरू केल्या आणि पुढील एका वर्षात शंभर शाखा सुरू करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. त्यांचा ‘कॅफे कॉफी एबीके’ कॉफी आणि बरंच काही… ही टॅगलाइन असलेला ब्रँड आहे.

प्रदीप चौधरी यांचा फुलांच्या डेकोरेशनचा व्यवसाय होता. आरबीआयसारख्या संस्थेला ते त्यांची ही सेवा देत असत. याशिवाय वेगळं काही तरी करण्याचा त्यांचा मानस होता; पण काय करावं, हा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. एक दिवस प्रदीप यांच्या डोक्यात कॉफी शॉप सुरू करण्याचा विचार आला. कॉफी शॉप सुरू करताना त्यांच्या अर्धांगिनी म्हणजे वर्षा चौधरी यांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिला आणि त्याही त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांच्यासोबत संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले ही खूपच उल्लेखनीय गोष्ट आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

सुरुवात कशी आणि कुठून करावी याविषयी योग्य ती माहिती घेऊन उद्योगात उतरायचे ठरले. उद्योग म्हटलं की गुंतवणूक आलीच. सुसज्ज असं कॉफी शॉप सुरू करायचे म्हणजे गुंतवणूकही त्या प्रकारची आवश्यक होती. बँकेला प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करून पंधरा दिवसांत बँकेने दहा लाखांचे कर्ज मंजूर केले आणि एक पल्ला पार पडला. ‘कॅफे कॉफी एबीके’साठी जागेची निवड, त्याची मांडणी आणि ग्राहकांना आकर्षक करणारी बैठक व्यवस्था अशा सर्व छोट्या छोट्या गोष्टींवर विशेष लक्ष देऊन ‘कॅफे कॉफी एबीके’ डिसेंबर २०१७ मध्ये सुरू झाले.

सुरुवात कॉफीने झाली. पहिल्या तीन महिन्यांच्या कालावधीत म्हणावा तसा जम बसत नव्हता. कॉफी शॉप तोट्यातच चालत होतं. काय करावे सुचत नव्हते; परंतु व्यवसाय नवीन आहे तर त्याला त्याचा योग्य वेळ दिला पाहिजे आणि आपणच त्याची घडी बसवली पाहिजे याची खूणगाठ मनाशी घट्ट बसवून आम्ही आमच्या चुका सुधारत जास्तीत जास्त नवीन नवीन गाष्टी करत गेलो. कॉफी सोबत ग्राहकांकडून विचारणा होणार्‍या विविध खाद्यपदार्थांना कॉफी शॉपमध्ये उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाऊ लागला.

चहा, कॉफी, पिझ्झा, बर्गर आदी जवळजवळ १७० प्रॉडक्ट आज या कॉफी शॉपमधून लोकांसाठी उपलब्ध करून दिले जातात. प्रदीप म्हणतात, जर आमच्या कॉफी शॉपमध्ये एखादा ग्रुप आला आणि त्या ग्रुपमध्ये चार लोक आहेत त्या प्रत्येकाची आवड ही वेगळी असू शकते. कोणाला चहा, कॉफी प्यायला आवडते, तर कुणाला काही खाण्यामध्ये रस असतो. अशा वेळी आपल्याकडे ते उपलब्ध नाही म्हणून कोणी परत जाऊ नये यासाठी ग्राहकाच्या रुचीचा जास्त विचार करून आम्ही विविध प्रॉडक्ट्स आमच्याकडे उपलब्ध करून दिले आहेत.

हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.

घरात कॉफी बनवण्याचा अनुभव आणि प्रत्यक्ष कॉफी शॉपमध्ये कॉफी बनवणं आणि त्याला कॉर्पोरेट स्वरूप देणं यात भरपूर अंतर होतं. युट्यूबवर पाहूनही अनेक गोष्टी शिकल्या. सुरुवातीला अनेक गोष्टींतून शिकत गेलो. एक वर्ष पूर्ण होता होता आज पाच शाखा चालू झाल्या आहेत. पहिल्या तीन महिन्यांत दिवसाचा गल्ला हा बाराशे ते तेराशेच्या जवळपास होता. सहा महिन्यांत महिन्याचा टर्नओव्हर सहा लाखांपर्यंत पोहोचला आहे. अद्ययावत उपकरणांचा वापर करून जास्तीत जास्त हायजिनिक पदार्थ ग्राहकांना देण्यावर चौधरी दांपत्याचा भर आहे. कॉफी शॉपच्या किचनची गुणवत्ता आणि पदार्थाची गुणवत्ता यावर काळजीपूर्वक लक्ष दिलं जातं. सकाळी १० वाजता कॉफी शॉप सर्वांसाठी खुले होते. संध्याकाळी ६ ते रात्री ११.३० पर्यंत ग्राहकांचा ओढा जास्त असतो. त्या वेळी कॉफी शॉपमध्ये भरपूर लगबग असते. शनिवार, रविवार या दिवशी ग्राहकांची संख्या जास्त असते.

 

आता या उद्योगात जम बसू लागलाय. पुढील वर्षात पुणे शहरात शंभर शाखा सुरू करण्याचा चौधरी दांपत्याचा मानस आहे. त्यासाठी ‘कॅफे कॉफी शॉप’ची फ्रॅन्चायझी उपलब्ध आहे. ज्यांना या संधीचा लाभ घ्यायचा आहे ते प्रत्यक्ष चौधरी दांपत्याला संपर्क करू शकतात. चौधरी दांपत्य म्हणते, जर एखाद्याकडे मनाची संपूर्ण तयारी असते आणि जिद्द व चिकाटीने काम करण्याची ऊर्मी असते त्या प्रत्येकाला या उद्योगात यश मिळू शकते. शिक्षण, प्रशिक्षण, या सर्व गोष्टी यापुढे दुय्यम ठरतात. ज्याला या उद्योगात उतरायचंय त्यांच्यासाठी, त्यांचा संपूर्ण सेटअप तयार करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास ते तयार आहेत. कॅफे कॉफीची टीम लोकेशन शोधायला मदत करते. कुठल्या लोकेशनला बिझनेस मिळतो याचे मॅपिंग केले जाते. रॉ मटेरिअल पुरवलं जातं. ‘कॉफी एबीके’चा हिंदुस्तान युनिलिव्हरसोबत करार झाला आहे. त्यामुळे जिथे कॉफी एबीके आपली शाखा सुरू करेल त्याठिकाणी हिंदुस्तान युनिलिव्हर कच्चा माल पुरवेल.

ऑनलाइन ब्रँडिंगसाठी त्यांना जी मदत लागते तीही संपूर्ण दिली जाते. एखाद्याला गुंतवणुकीची आवश्यकता असेल तर त्यासाठीही सर्वतोपरी मदत केली जाते. www.coffeeabk.com ही आमची वेबसाइट आहे. यावरही फ्रँचायझी घेण्याविषयी फॉर्म उपलब्ध आहे. तोही भरून पाठवल्यास तुम्हाला कॉफी एबीकेकडून संपर्क केला जातो. इच्छाशक्ती, मनाचा खंबीरपणा, जिद्द, चिकाटी आणि संयम या गुणांच्या आधारे उत्तम उद्योग उभा राहू शकतो हे ’कॅफे कॉफी एबीके’कडे पाहून कळते.

Franchise घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.
प्रदीप चौधरी : 7263878788
meeting@coffeeabk.com

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!