लोकप्रिय युट्युबर्सची भेट होऊ शकते रहेजा महाविद्यालयाच्या ‘रीटेक’मध्ये!

मुंबईतील एल. एस. रहेजा महाविद्यालयाच्या बी.एम.एम. व बी.ए.एम.एम.सी. विभागातील विद्यार्थी दर वर्षी आयोजित करत असलेला ‘रीटेक’ हा प्रसिद्ध विद्यार्थी महोत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्यक्ष होणार नसून ऑनलाइन होणार आहे. 28 ते 30 जानेवारी दरम्यान तीन दिवसाचा हा ऑनलाइन महोत्सव होणार आहे.

‘व्हर्च्युअल ग्रँडस्टँड’ ही या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना म्हणजेच थीम असणार आहे. यामध्ये आपल्याला देशातील प्रसिद्ध युट्युबर्सची भेट होणार आहे. या प्रसिद्ध युट्युबर्सकडून आपल्याला युट्युबवर लोकप्रिय होऊन अधिकाधिक अर्थार्जन कसे करता येऊ शकते याचे मार्गदर्शन मिळणार आहे.

यंदाचा ‘रीटेक’ हा फक्त मुंबईच्या महाविद्यालयांनसाठी नसून पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर तीन स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे. शॉर्ट फिल्म, फोटोग्राफी आणि लघू कथालेखनाच्या या स्पर्धा असणार आहेत.

‘रीटेक’बद्दल

कोरोना महामारीच्या थैमानाला कोणीही विसरू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला कोरोना काळात अनेक समस्या उद्भवल्या. रोजगार नसल्याने अनेकांची अन्नान दशा झाली. अनेक नागरिकांचे जेवणाचे हाल अजूनही होत आहेत. या गोष्टीकडे पाहत एल. एस. रहेजा या महाविद्यालयातील बीएमएममधील विद्यार्थ्यांनी ‘रीटेक’च्या माध्यमातून गरजूंना अन्नाची मदत मिळावी यासाठी उपक्रम राबवला आहेत.

गेली अनेक वर्षांपासून या विद्यार्थी मित्रांच्या मार्फत असे सामाजिक उपक्रम होत असतात. या वेळी विद्यार्थ्यांकडून एका खाद्यपदार्थाच्या ‘फ्रिझ’चे आयोजन करण्यात आले असून. कोणीही त्या ‘फ्रीझ’च्या आधारे आपल्या पोटाची भूक भागवू शकतो. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून माणुसकी अजूनही शिल्लक आहे या वाक्याची जाणीव होतेय.

मुंबईतील वांद्रे व माटुंगा परिसरात खाद्यपदार्थ ‘फ्रीझ’ विद्यार्थी सामाजिक अंतर पाळून व कोव्हीड-19 चे नियम पाळून खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणार आहेत. अन्न पोहचवण्याचे मोलाचे काम हे विद्यार्थी करणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी अशा प्रकारचे उपक्रम राबवून समाजासाठी खर्‍या अर्थाने आदर्श बनले आहेत असेच म्हणावे लागेल.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?