Advertisement
उद्योगसंधी

लेखनकौशल्यातून कमवा पैसे!

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


लेखन व्यवसाय हा प्रत्येकालाच जमू शकेल असा व्यवसाय नाही, पण ज्यांना लिहिण्या-वाचण्याची आवड आहे असे फक्त फेसबुक वा ब्लॉगपुरते लेखन न करता लेखन व्यवसायातून चांगले अर्थार्जन करू शकतात. ‘कंटेंट रायटर’ या शब्दाला आज खूप डिमांड आहे.

एखाद्या कंपनीला आपली वेबसाइट करायची म्हटली की पहिला प्रश्न पडतो, की त्यावर टाकावा लागणारा मजकूर लिहिणार कोण? अशा वेळी मदत घ्यावी लागते ती कंटेंट रायटरची. वेब डिझायनर, डिजिटल मार्केटर, जाहिरात एजन्सी, प्रकाशक अशा व्यवसायांना लेखन कौशल्य असलेल्यांची गरज नेहमीच भासत असते. एखाद्याच्या डोक्यातील कल्पना शब्दात मांडण्याचे कौशल्य तुमच्यात असायला हवे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

विविध मासिक व वृत्तपत्रांसाठी लेखन करणे हाही तुमच्या व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे, कारण त्यातून तुमची विनापैशाची प्रसिद्धी होते आणि तुम्हाला विविध प्रकारची कामं मिळू शकतात.

नाट्य, चित्रपट व दूरचित्रवाणी क्षेत्रालाही लेखकांची भरपूर गरज असते. संवाद लेखन, संहिता लेखन आदी अनेक गोष्टी तेथे रोज लागत असतात. कमीत कमी शब्दांत योग्य तो संदेश देणे तुम्ही शिकलात की तुम्ही मागाल ती किंमत द्यायला लोक मागेपुढे पाहत नाहीत.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!