इस्राएल हा समृद्ध खेड्यांचा देश म्हणून संबोधला जातो. खरंच या देशातील खेडी समृद्ध आहेत. घरांची सुंदर रचना, स्वच्छ रस्ते आणि सुंदर बागकाम हे या खेड्यांचे वेगळेपण. विशेष म्हणजे येथील डोळे दिपवणारी शेती, इस्राएल देशाचा दक्षिण भाग बराचसा वाळवंटी आहे आणि या भागात पर्जन्यमान खूप कमी आहे.
यावर्षी मागील काही वर्षांच्या तुलनेत चांगल्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. इस्राएलच्या उत्तर भागात हिरवळ आहे. मी उत्तर भागात झेरूफा या ठिकाणी राहत होतो. येथे फळभाजी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.
वांगी, काकडी, रंगीत ढोबळी मिरची टोमॅटो इ. यांतील काकडी हे पीक मोठ्या हरितगृहात तसेच लहानशा अर्धागोलकृती हरितगृहात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकात आधार देऊन उत्पादन कसे वाढवता येईल, याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते.
काकडी पिकात आधार देणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी नायलॉनच्या दोऱ्यांचा वापर केला जातो. लागवडीनंतर १५ दिवसांनी या दोऱ्या टोकाला खाच असलेल्या लोखंडी सळीने जमिनीत रोवाव्यात. रोवताना रोपाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)साधारणत: २१ दिवसांत रोप आधार देण्यायोग्य होते. त्यावेळी ती दोरी रोपाच्या बाजूने घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने रोपाला काळजीपूर्वक गुंडाळावी. कारण, रोपे कोवळी असल्यामुळे मोडण्याची भीती असते. आधार दिल्यामुळे पिकातील अंतर्गत कामे अनुपयोगी शेंडे खुडणे,फवारणी, काढणी ही कामे सोपी जातात.
महत्त्वाचे म्हणजे दर्जात्मक उत्पादनात वाढ होते. ही पद्धत भारतातील शेतकऱ्याने अवलंबली तर नक्कीच उत्पादनात वाढ होईल. पिकावर केल्या जाणाऱ्या औषध फवारणीचा विचार करता, शेतकरी हा फवारणी कशी टाळता येईल वा कमी करता येईल, याकडे लक्ष देतो. कारण शेतमाल स्थानिक बाजारपेठेत विकायचा असेल अथवा निर्यात करायचा असेल तर त्यासाठी काही अटी घालून देण्यात आल्या आहेत.
यासाठी कोणते औषध किती प्रमाणात वापरले जावे व ते काढणीच्या अगोदर किती दिवस वापरावे, त्याचप्रमाणे निर्यात करणाऱ्या संबंधित कंपनीच्या अटी वेगळ्या असतात. पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो व ती खते ठिबक सिंचनाच्या साहाय्याने दिली जातात.
युरोपियन देशात निर्यात होणारा शेतमाल व त्यांच्याकडून मिळणारे युरोपियन चलन यामुळे येथील शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी व भरभराट आली आहे; परंतु याला शेतकऱ्यांचे अपरिमित कष्ट, कौशल्य व तंत्रज्ञानाची जोड, नैसर्गिक स्त्रोतांचा प्रभावी वापर हेही तितकेच महत्त्वाचे आहे आणि यामुळेच इस्राएलसारखा लहानसा देश शेती विकासात जगात अग्रगण्य आहे.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.